सन १८५७ नंतर बिटिजकिदन दिल्यानमा सुष्याची आर्थिक प्रक्रिया सुरू झाली. यंत्रीत्पादीत पका माल बिदुल्यानव्या बाजारपेटत व लागला, कच्च्या मालाची निर्यात बाटली, देशातील मूल आर्थिक प्रक्रिया त्यामुळे दुबळी हीरुल नामव्यवल्या कौडलमडली. देशातील संपत्तीचा आधशकलाकटे, बळला औषण करणाऱ्या वर्गाची देवाणघेवाण वाढली, बरसाटी उत्पादन बाद लागले. त्यामुळे कन्या मालाला मागणी वाढली, लाल दयान मालाची खरेदी होऊ लागली, पैशावर संबंध प्रस्थापित होक लागले, त्याचा परिणाम माणुसकीचा लोप होण्यात झाला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या मानसलेल्या लोकांचे शोषण वाढू लागले. या आर्थिक प्रक्रियामुळे सावकालाहीचा पाय झाला, अज्ञानी आणि गरीब जनतेची सावकार लूटमार करू लागले, आदिवासी भागात आदिवासींच्या शेतीचे उत्पादन, जंगलाचे उत्पादन लुटण्यासाटी सावकाराच्या झुंदीकर झुंडी जाक लागल्या, त्यांच्या गरीब परिस्थितीचा, अज्ञानाचा आणि अगतिकतेचा फायदा घेऊन थोड्या पैशाच्या सावकारीपायी महादेव कोळी, ठाकर, वारली, कातकरी, मिल, आदिवासी लोकांच्या जमिनी प्रत्यक्ष जमीन कसणाचा आदिवासींकडून हजर मालकांकडे जाण्याची प्रक्रिया वाढली. त्याचा परिणाम देशातील आदिवासी भागातील जमिनी सावकारांच्या ताब्यात गेल्या, सावकार जमिनीचे मालक झाले, प्रत्यय जमीन कल्लागार मात्र मूळचे आदिवासीच राहिले. त्यामुळे साहजिकच जमिनीतील उत्पादनावर जमीनमालकांचा हक प्रस्थापित झाला आणि मूळचा मालक मजूर कूल, म्हणून काटकरू लागला. त्यातून अन्याय, अत्याचाराचा भस्मासुर वाढत गेला. काही ठिकाणी अन्यायाची परिसीमा झाली. हे आता कुठेतरी थांबविले पाहिजे, याची लोकांना जाणीव होऊ लागली, महादेव कोळी जमातीने सावकारशाही विरुद्ध आवाज उठविला. इतिहासात लढवय्या आणि क्रांतिकारक ठरलेली ही जमात ! त्यांच्यातील अनेक तरुण बेलभंडार उचलून सावकाराच्या विरुद्ध आवाज उठवू लागले, काहींनी घरादारावर संसारावर पाणी सोडले आणि सावकाराविरुद्ध लढाण्यासाठी ती तयार झाले, जबली तर भेटू आणि मैलो तर लो, अशा भावनेने त्यांनी घरदार सोडले, हा वणवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि घाटपायथ्याला पेटला, भीमाशंकरचे घाटापासून त्याचे लोण बैट नाशिकपर्यंत जाऊन पोहोचले. दुःख सर्वांचेच होते. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील महादेव कोळी जमात त्या काळात देखील सावकाराविरुद्ध संघटित झाली. जुन्नर, आंबेगाव, राजूर आणि आजूबाजूच्या परिसरात महादेव कोळी जमातीच्या जमिनी जुन्नर, आंबेगाव शहरातील सावकारी करणाऱ्या मारवाडी, गुजर, मुसलमान, परदेशी, तेली, ब्राह्मण आणि लिंगायत समाजाच्या सुमारे २०० ते ३०० कुटुंबांनी हस्तगत केल्या होत्या. सावकार मंडळी लोकांच्या चरिखीचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन कागदोपत्री खोट्या रकमांच्या नोंदी करत, त्यावर २०० ते ८०० पटीने व्याजाची आकारणी करत. त्यामुळे व्याजाचा भरणा करता करताच गरीब लोक मेटाकुटीस येत आणि मुद्दल त्यांच्या माथ्यावर कायम राहील, अशा सावकारीपायी गोरगरिबांची अब्रू चव्हाट्यावर आली. अशी परिस्थिती केवळ जुन्नर मावातच होती असे नव्हे तर अकोले, इयतपुरी, पेट, घोटी, त्र्यंबकेवर, राजूर, कोतूळ, ओतूर, आंबेगाव, खेड आणि मावळ या आदिवासी भागातही निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातील आदिवासी जमाती सावकारांच्या गुलाम बनल्या होत्या.
सावकारशाही विरुद्ध बंडाचे पहिले निशाण आंबेगाव तालुक्यातील (जि.पुणे) जांभोरी गावच्चा होनाजी भानुजी केंगले नावाच्या क्रांतिकारकाने १८७८ मध्ये उभे केलं. त्याचे बंड भीमाशंकर घाट, आहुपेघाट या परिसरात डोंगरदांच्या आश्रयाने चालले, सावकाराच्या कृष्णकृत्याविरुद्ध लोकजागृतीचे हे लोण त्यांनी जुन्नर, आंबेगाव आणि कर्जत तालुक्यात पोहोचविले. त्याच्या भीतीने या भागातील व्यापाऱ्यांनी सरकारचा आश्रय घेतला, होन्या केंगल्याच्या बंदोबस्तासाठी सरकारी कुमक आणली गेली. १८७० मध्ये होनाजी कर्जत जवळ नांदगाव येथे पकडला गेला, त्याच्यावर बंडखोरीचा गुन्हा ठेवण्यात आला आणि शेवटी त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. होनाजीच्या या चळवळीचे पडसाद बरेच दूरवर उमटले. सावकारशाही विरुद्ध उठा केला पाहिजे असे विचारमंथन सुरू झाले. त्याचा परिणाम तीन ठिकाणाहुन अशा चळवळी उभा राहिल्या. वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वाखाली पुंदरच्या परिसरात अशी चळवळ उभी राहिली, सातारा जिल्हातही लोण पोहोचले. तेथील रामोशी लोकांनी बंडाचा झेंडा उभारला. त्यांच्या बंडाचे नेतृत्व उमाजी नायकाकडे होते. जुन्नर, आंबेगाव, राजूर आणि कोतूळ भागात महादेव कोळी लोक संघटित होन त्यांनीही उठाव चालू ठेवले. जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील बंडाचे नेतृत्व कृष्णा साबळे यांनी केले.
१८८९ सालचा दुष्काळ महाभयंकर होता. जंगल-दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांची या दुष्काळात मोठी उपासमार झाली, त्यात आदिवासी समाजाची हजारो कुटुंबे नष्ट झाली. मुलाबाळांचे उपासमारीमुळे होणारे हाल लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहावत नव्हते, मिळेल तेथून, मिळेल त्या मार्गाने, पडेल तेवढी किंमत देऊन लोक अन्नधान्य मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. लोकांच्या या असहाय्य, परिस्थितीचा फायदा त्या वेळच्या सावकारशाहीने घेतला. दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी महादेव कोळी, ठाकर लोकांनी स्वत:च्या जमिनी मामुली किंमतीला सावकारांना विकल्या. त्यामुळे सावकार आणि धनिक मंडळी आदिवासींच्या जमिनींचे मालक बनले. पुढील वर्षी दुष्काळ संपला. भाताची पिके भरघोस आली, सावकारांच्या झुंडीच्या झुंडी धान्यवसुलीसाठी आदिवासी भागात आल्या. हे दुष्टचक्र पुढे सतत चालू होते. कष्ट करणारा एक आणि त्याच्या कष्टावर फुकट जगणारा दुसरा असा नवा वर्ग तयार झाला. या दुष्टचक्रात सापडल्यामुळे महादेव कोळी जमातीचे दिवसेंदिवस हाल वाढत गेले. परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी लोकांनी बंडखाऱ्या केल्या. या बंडाचे नेतृत्व अनेक नेत्यांकडे होते. राघोजी भांगरे, रामा किरवा यांना बंडखोर मंडळी आदर्श पुरुष मानत असे. त्यांचीच परंपरा पुढे चालवावी; असे त्याला वाटे. त्यासाठी महादेव कोळी जमातीची त्यांनी संघटना करण्याचा प्रयत्न केला. सावकारांचा बंदोबस्त केला पाहिजे; असे त्याला मनापासून वाटे. त्यासाठी त्याने आयुष्यभर सावकारशाहीशी लढा दिला. शेवटी गुन्हेगार म्हणून पकडून त्याला देहदंडाची शिक्षा दिली.
No comments:
Post a Comment