उत्तर हिंदुस्थानात मोवलांच्या खाचा वारखी झाल्यावर त्यांनी दक्षिण हिंदुस्थानकडे आपले लक्ष वळविले. त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचे राञ्च चालू होते. मोवलानी प्रथम देवगिरीच्या यादव राज्यात व नंतर महाराष्ट्रातील इतर विभागात वाचा करून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली, कल्याण, खिपूर हा देवगिरीचा मुलूख त्यांनी प्रथम काबीज केला. त्यानंतर मोगलांच्या स्वाया अहमदनगरच्या दिशेने वळल्या, हिंदू देवदेवतांची, तीर्थक्षेत्रांची नासधूस करणे, हिंदू लोकांना छळणे, बाटविणे, त्यांच्यावर झिजिया सारखे कर लाटणे हे प्रकार त्या भागात सुरू झाले. हिंदू धर्मभ्रष्टतेच्या वासाला सर्व लोक कंटाळले होते. हे लोण सह्याद्रीच्या दचाखोचात राहणाचा आदिवासी प्रदेशातही पोहोचले. सह्याद्रीच्या पठारी प्रदेशात आणि घाटमाथ्यावर नाशिक, नगर, अकोलेनेर, यंबकेश्वर, कातपुरी आणि जुकर प्रांतात राहणारी महादेव कोळी जमात या त्रासाला कंटाळली होती. त्यांच्या परंपरागत जीवनात ढवळाढवळ होत होती. त्याच सुमारास सदानंद महाराज नावाचे नाथपंथी साधुपुरूष त्या भागात प्रसिद्धीला आले. या साधुपुरुषाला धर्मब्रष्टतेची कल्पना सहन झाली नाही. साधुवेषात राहन धर्नद्रष्टतेविरुष्ट त्यांनी हालचाली सुरू केल्या. गावोगाव फिरून त्यांनी लोकजागृती केली. मुस्लिमांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने इगतपुरी तालुक्यातील मुकणी गावच्या जमीनदार आदिवासी मंडळीना संघटित होण्याचा व कोकणात जाऊन वारल्याच्या ताब्यात असलेले जव्हारचे राज्य घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. साधुमहाराजांचा सल सर्वांना पसंत पडला. महाराजांचा आशीर्वाद घेऊन देवराम मुकणे नावाच्या जमीनदाराने या कार्याला सुरुवात केली. पुढे हेच देवराम मुकणे जायबा नावाने जव्हारच्या राजघराण्याचे मूळ पुरुष म्हणून प्रसिध्दीला आले.
देवराम ऊर्फ जायबा मुकणे याला जव्हारच्या किल्ल्यावर हल्ला करणे सोपे नव्हते. प्रदेश पहाडी पर्वतांचा व जंगल दऱ्याखोऱ्यांचा होता. जायबाजवळ सैन्य, दारूगोळा, पैसा व इतर युध्द सामग्री काहीच नव्हती. जव्हारजवळचा भुपतगड किल्ला मलिक नावाच्या लढवय्या सुभेदाराच्या ताब्यात होता. सैन्य व पैशाची गरज भागविण्यासाठी देवराम ऊर्फ जायबा मुकणे यांनी त्याच्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने प्रथम सरत बंदरात जाऊन लटमार केली. पौपेरा नाव धारण करून जायबाचे लोक इ.स.१२९८ ते १३०६ पर्यंत पैसा व युध्दसाहित्य गोळा करत होते. काही दिवसांनी ही गोष्ट सुरतेच्या सुभेदाराच्या लक्षात आली. त्यामुळे त्या सर्वांना पकडण्यासाठी सुभेदाराने हुकूम काढला, सैनिकांनी महादेव कोळी पापुरा लोकांचा पाठलाग केला, पळता पळता सुरतेजवळच कोडद गावाच्या भट्ट घराण्याचा त्यांनी आश्रय घेतला. त्यामुळे सुभेदाराकडून आलेले गडांतर वेळीच टळले. पुढे जायबाला जव्हारचे राज्य मिळाल्यावर राजघराण्याचे पुरोहित म्हणून भट्ट घराण्याला पुरोहिती देण्यात आली. ती आजपर्यंत जव्हार घराण्यात चालू आहे. सुरतेहून आल्यावर जायबाच्या लोकांनी प्रथम जव्हारजवळील भुपतगड किल्ल्यावर चाल केली व मलिक सुभेदाराच्या हातून तो किल्ला काढून घेतला. त्यानंतर जव्हारच्या किल्ल्यावर चाल करनू तेथील सुभेदार सुभांटे याचाही त्यांनी पराभव केला. अशारितीने जव्हारचे राज्य जायबा मुकणे नावाच्या महादेव कोळी आदिवासी नायकाच्या हाती आले. सुभाटे हा वारली सुभेदार पुढे जव्हारकरांनाच येऊन मिळाला. जव्हारकरांनी त्याला गंभीरगडची सुभेदारी दिली, हा काळ इ.स.१३०६ चा होता. इ.स.१३४१ पर्यंत जव्हारचे आधिपत्य कोणीही मान्य केलेले नव्हते. पण पुढे इ.स.६ जून १३४२ रोजी मुबारक खिलजीने जायबाचा मुलगा धुलबाराव यांना राजा ही पदवी बहाल करून उत्तर कोकणावरील त्यांचे आधिपत्य मान्य केले. जायबाच्या ऐवजी जायबाच्या मुलाला (धुलबाराव मुकणे) राजा ही पदवी दिल्लीच्या बादशहाने बहाल केली व नेमशहा या नावाने त्याला गादीवर बसविण्यात आले, त्यावेळी जव्हारच्या राजाच्या ताब्यात जव्हारचा किल्ला वसह्याद्रीच्या डोंगरदयांतील २२ किल्ले व ५ हजार चौरस मैलांचा प्रदेश होता जव्हारच्या राज्यातील एकूण २२ किल्ल्यांपैकी ५ किल्ले अहमदनगर जिल्ह्यात होते, राज्याची हद हरिश्चंद्रगडापर्यंत होती. राज्याचा महसूल ९ लक्ष रुपये होता. भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमुळे येथील स्थानिक राजे विजयनगरच्या हिंदू राजाचे व गोवळकोंड्याच्या बहामनी राजाचे सार्वभौमत्व मान्य करीत असत. सोळाव्या शतकापर्यंत जव्हारचे है, राज्य निर्वेधपणे चालू होते.
त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील बंदरात पोर्तुगिजांनी प्रवेश केला. जव्हारच्या राज्याची हद्द त्यावेळी थेट वसई बंदरापर्यंत होती. त्यामुळे साहजिकच पोर्तुगिजांनी जव्हारच्या राजाचे संबंध आले. जव्हारच्या राजाचा पोर्तुगिजांवर दराराही होता. शिवाजी महाराजा जव्हारच्या मार्गानेच सुरतेस गेले. सुरत लुटण्यासाठी जव्हारच्या राजाने महाराजांना सैन्य देऊन मदत केली होती. इ.स.१६७१ मध्ये मोगलांशी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांना जव्हारच्या राजाने मदत केली होती, चिमाजी आप्पाला वसई सर करण्यासाठीही जव्हारकरांनी सैन्य पाठवून हातभार लावला होता. प्रारंभी जव्हारचे राज्य सर्व जंगलपट्टीत पसरलेले होते. त्याची हद उत्तरेला धरमपूर संस्थानास जाऊन भिडली होती. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पेशव्यांनी जव्हारच्या राजाकडून खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली. जव्हारच्या राजाने आपल्या राज्यातील उत्तम जमिनी पेशव्यांना दिल्या. पेशव्यानंतर इंग्रज आले, इ.स.१८२६ मध्ये जव्हारच्या राजाने कंपनी सरकारशी वाटाघाटी करून तह केला, त्या तहानुसार भारत स्वतंत्र होईपर्यंत जव्हारचा कारभार चालत आला. भारत स्वतंत्र झाल्यावर आदिवासींचे सहाशे वर्षाचे हे जुने राज्य १० जून १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.
No comments:
Post a Comment