इग्रजांविरूध्द स्वातंत्र्यासमराचे वर्ष १८५७ मानले जात असले तरीही इंग्रजांची सत्ता उलथवण्याच्या योजना खूप पूर्वीपासून आखण्यात येत होत्या. इंग्रजी सत्ता उलथून पाडण्यासी राजे तख्तसिंह बहादूर, बिकानेरचे राजे सरदारसिंग, जयपूरचे राजे सवाईरामसिंग, रेवाचे राजे रावराज तेलसिंग बहादूर आणि गढा मंडल्याचे गोंड राजे शंकरशहा यांनी गुप्तपणे योजना आखली होती. रशियातील झार राजांची मदत घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा पुकारायचे त्यांनी ठरविले होते. परंतु ही योजना अंमलात येण्याचे लांबणीवर पडल्याने गोंडराजे शंकरशहा यांनी आदिवासी क्रांतिकारकांच्या मदतीने इंग्रजांविरूध्दच्या युध्दाला अगोदरच तोंड फोडले.

        महाराष्ट्रात इ.स.१८१८ पासूनच भिल्ल, गोंडांनी इंग्रजांच्या विरुद्ध बावटा उभारला होता. कॅप्टन ब्रिज, कॅप्टन मोरीन, एल्फिन्स्टन इ. इंग्रज अधिकाऱ्यांना हैराण करणाऱ्या भिल्ल-गोंड आदिवासी नेत्यांना पकडण्यात येत होते, पंड्या, बंदी, सुखा, हरिया, उमाजी, नाईक, हरिनायक रामोशी इ. आदिवासी क्रांतिकारकांना फाशी दिले गेले होते. महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा, बिहार व मध्यप्रदेशामधील आदिवासींनी इंग्रजाविरूध, रणशिंग फुकले होते, गढा मंडल्याचे गौंडराजे शंकरशहा यांनी इंग्रजांविरूध्द दिलेला लढा उल्लेखनीय आहे. शंकरशहाने चौरागढचा गोंड नेता चैनशहा, सातपुड्याचा गोंड नेता सीतारामशहा, नर्मदाखोऱ्यातील आदिवासींचे प्रमुख सोहनशहा, यशवंतशहा इ. क्रांतिकारकांचे संघटन करून इंग्रजाविरूध्द समर्थ आघाडी उभारली. यापैकी प्रत्येक नेता मरे पर्यंत देशासाठी व स्वातंत्र्यासाठी झुंजत राहिला. या वीरांच्या प्रेरणे ने च मौलमपल्लीचे बापूरावशहा शषडमाके, घोटचे व्यंकटेश्वर शेडमाके, रामगढच्या गोंडराणी करणावंती इ. क्रांतिकारकांनी इंग्रजाविरूध्द लढे पुकारले. आदिवासींच्या इतिहासात राजे शंकरशहा व त्यांचे सुपुत्र रघुनाथशहा यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

        गढा मंडल्याच्या सुप्रसिध्द गोंड, राजघराण्याचे मूळपुरुष यदोराय (जदोराय), ५२ गड जिंकणारे महाप्रतापी गोंड राजे संग्रामशहा, मदनमहालासारखे अप्रतिम शिल्प उभारणारे मदनशहा, मोगल सम्राटांशी लढून रणांगण गाजविणाऱ्या महाराणी दुर्गावती यांचेमुळे गढा मंडल्याचे गोंड राजघराणे मोठ्या लौकिकास चढले. याच नामांकित राजघराण्यात राजे नरहरशहांच्या पोटी सन १७७५ मध्ये शंकरशहा यांचा जन्म झाला, या काळात त्या परिसरातील स्वतंत्र राज्ये काबीज करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न चालू होते. नरहरशहाचे गोंडवन राज्य काबीज करण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण नरहरशहाने प्रत्येकवेळी या प्रयत्नांना खंबीरपणे तोंड दिले होते. एकदा असेच इंग्रजसैन्य गढामंडल्यावर चाल करून आले. त्यावेळी नरहरशहा अत्यंत शिताफीने शंकरशहाला घेऊन गुप्त मार्गाने किल्ल्याबाहेर निघून गेला व पुढचा काळ त्याने रानावनातच काढला. शंकरशहाचे बालपण रानावनातच अत्यंत हालअपेष्टात गेले. नरहरशहाने शंकरशहाला युध्दविद्या शिकविली व आपले गढामंडलाचे इंग्रजांनी गिळंकृत केलेले राज्य परत मिळविण्याची प्रखर आकांक्षा त्याच्या मनात निर्माण केली. शंकरशहानेही इंग्रजांशी लढा देऊन आपले राज्य परत मिळविणे हेच आपले जीवितकार्य आहे असे ठरविले. शंकरशहाच्या तरुण वयातच त्यांचे वडील नरहरशहा १७८९ मध्ये मरण पावले.

        इ.स.१८१० मध्ये शंकरशहाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रघुनाथ शहा. त्याच्या जन्मामुळे शंकरशहाच्या आशा पालवल्या आणि इंग्रजाकडून आपले हडप झालेले राज्य परत मिळवून घेण्याचा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. सिलापरीच्या घनदाट अरण्यात रघुनाथ शहा लहानाचा मोठा होऊ लागला. दोघे पितापुत्र इंग्रजांची राजसत्ता कशी उलथून पाडता येईल याची योजना आखू लागले. आजूबाजूच्या संस्थानिकांना व आदिवासी क्रांतिकारकांना संघटित करून इंग्रजाविरूध्द ते लढा पुकारू लागले. सागर, झाशी, छत्तीसगडात इंग्रजाविरूध्द क्रांतीची लाट उसळली. त्याचा फायदा शंकरशहा रघुनाथशहा यांनी करून घेतला. जंगलकपारीत राहणाऱ्या आदिवासींची मोठी सेना त्यांनी उभारली. या सेनेच्या साहाय्याने शंकरशहाने इंग्रजांच्या ताब्यातील अनेक ठाणी काबीज करून घेतली. यामुळे इंग्रज अधिकीरी बेचैन झाले , शंकरशहाला जिवंत अगर मृतावस्थेत पकडून देणाऱ्यास त्यांनी मोठे इनाम जाहीर केले. पण क्रांतीची लाट उसळली. त्याचा फायदा शंकरशहा रघुनाथशहा यांनी करून घेतला. जंगलकपारीत राहणाऱ्या आदिवासींची मोठी सेना त्यांनी उभारली. या सेनेच्या साहाय्याने शंकरशहाने इंग्रजांच्या ताब्यातील अनेक ठाणी काबीज करून घेतली. यामुळे इंग्रज अधिकीरी बेचैन झाले, शंकरशहाला जिवंत अगर मृतावस्थेत पकडून देणाऱ्यास त्यांनी मोठे इनाम जाहीर केले. पण यास न जुमानता शंकरशहा इंग्रजाविरूध्द लढतच राहिला. एवढेच नव्हे तर आपण स्वतंत्र राजे आहोत, इंग्रजांनी हा मुलूख सोडून निघून जावे, अन्यथा शंकरशहा तो तलवारीने लढून जिंकून घेईल; असे त्याने जाहीर केले. यामुळे इंग्रजांचा तिळपापड होणे स्वाभाविकच होते. त्यांनी रेसीडेन्ट जेकिन्सच्या नेतृत्वाखाली सशस्त्र सैन्याची तुकडी शंकरशहावर पाठवली, शंकरशहाने रेसिडेंट जेकिन्सचा धुव्वा उडविला. सिलापरीच्या जंगलात जेकिन्सच्या नेतृत्वाखाली गेलेली तुकडी पुन्हा परत येऊ शकली नाही. यामुळे इंग्रज सरकार हादरून गेले.

        मेजर ओब्रायनच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक सैन्यपथक पाठविण्यात आले. या पथकाला चौरागढच्या गोंड राजा चैनशहा सामोरा आला. चैनशहाने सर्वशक्तीनिशी ३००० गोंडसेना उभारून इंग्रजांशी लढा दिला, पण चैनशहाला मेजर ओब्रायनने जिवंत पकडले व चांद्याच्या तुरुंगात डांबले. तुरुंगातच छळामुळे चैनशहाचा अंत झाला.

            चैनशहाचा दारुण पराभव व अंत यामुळे शंकरशहाला अत्यंत दुःख झाले. इंग्रज सैन्यामध्ये आपले विश्वासू हेर ठेवून इंग्रजांचे बेत उधळून लावण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. रघुनाथ शहा जबलपूरच्या ५२ व्या नेटिव्ह रेजिमेंटमध्ये गुप्तपणे भरती झाला. इंग्रज सेनेतील गुपिते तो शंकरशहाला कळवीत असे. शंकरशहा इंग्रज सेनेवर बाहेरून नेमके व अचूक हल्ले करून इंग्रज सैन्याला बेजार करीत असे. रघुनाथशहाची कामगिरी अत्यंत जोखमीची होती. जबलपूरचा रेसिडेंट मॅक्ग्रेगर हा इंग्रज अधिकारी एका समारंभास हजर रहात असल्याची बातमी रघुनाथशहाने शंकरशहाला कळवली. या समारंभात मॅक्ग्रेगरसाहेबाचा वध करण्याची योजना शंकरशहा व रघुनाथशहाने आखली. या योजनेप्रमाणे शंकरशहाने शिताफीने हल्ला करून मॅक्ग्रेगरचा भर समारंभात वध केला. त्यावेळी शंकरशहाचे सहकारी व इंग्रजांमध्ये चकमक उडाली. शंकरशहाने फार हुशारीने आपली सुटका करून घेतली. त्यांचे सहकारी मारले गेले. केवळ एक सहकारी जिवंत राहिला पण त्याला पकडण्यात आले. या कैद केलेल्या सहकायाजवळ सरकारने शंकरशहा विषयी विचारपूस केली. पण सरळ रीतीने तो काहीही सांगेना तेव्हा त्यास कडक शिक्षेच्या धमक्या देण्यात आल्या. मारझोड करण्यात आली. हा छळ उत्साह झात्यामुळे त्याने शंकरशहाला पकडून देण्याचे वचन दिले.

        शंकरशहा कालीमातेचा भक्त होता. दररोज सायंकाळी तो आपल्या आराध्य देवतेची पुजा, प्रार्थना करीत असे आणि प्रार्थनेनंतर आपल्या साथीदारांसह सलामसलत करत असे. अशाच एक प्रसंगी फितूर सहकायाने इंग्रज सैन्याला शंकरशहाची गुहा दाखविली. इंग्रज सैन्याने गुहेला वेढा टाकून शंकरशहा व त्याचा पुत्र रघुनाथशहा यांना त्यांच्या काही साथीदारांसह पकडले.

        शंकरशहा स्वत: कवी होता. त्याने इंग्रजाविरूध्द रचलेल्या कविता जत करण्यात आल्या. रघुनाथशहा इंग्रजी सेनेत कशाकरिता भरती झाला होता याचेही गुपित इंग्रजांना समजले. शंकरशहा व रघुनाथशहा यांना चाबकांनी अमानुष झोडण्यात आले. अतिशय कठीण देहदंडाच्या शिक्षा त्यांना देण्यात आल्या. परंतु त्या वीरांनी आपली मस्तके नमविली नाहीत. त्यांना बुलामीपेक्षा मृत्यू प्रिय होता. इंग्रजांनी त्यांचेवर राजद्रोहाचे खटले भरले. १८ सप्टेंबर १८५७ रोजी राजे शंकरशहा व रघुनाथशहा या पितापुत्रांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी दोघे पितापुत्र शहीद झाले. इतिहासात अजरामर झाले. शंकरशहाने आपले ८०-८५ वर्षाचे संपूर्ण संघर्षमय जीवन स्वराज्यप्राप्तीच्या तपश्चर्येत व्यतीत केले. त्याचबरोबर आपला वीरपुत्र रघुनाथशहा यास इंग्रजांविरूध्द लढण्याची प्रेरणा दिली. यामुळेच राजे शंकरशहा यांना 'आदिवासी क्रांतिकारकांचे मेरुमणी' म्हणून गौरविणे सार्थच ठरेल. राजे शंकरशहाचे त्यागी व पराक्रमी जीवन आदिवासी युवकांना स्फूर्तिदायक ठरणारे आहे, यात शंकाच नाही, राजे शंकरशहांच्या अमर आत्म्याला उद्देशून आदिवासी युवक खचितच म्हणतील...

            मुक्या मनाने उधळावे कितीशब्दाचे बुडबुडे तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे

logoblog

No comments:

Post a Comment