पासपोर्ट मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  • पासपोर्ट साइज फोटोग्राफ- ४ प्रती, रेशनकार्ड (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)
  • फोटो आयडेंटिटी- निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)
  • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड) लग्न झाले असल्यास महिलांच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट आणि जर लग्नात नाव बदलले असल्यास पासपोर्टच्या अर्जात दिलेल्याप्रमाणे अ‍ॅफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) करून घ्यावे.


ऑनलाईन पासपोर्ट काढण्याची पद्धत :

  • प्रथम दिलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करावे लागेल.
  • तुमचा लॉग-इन आयडी तयार होईल. तो तयार करून नवीन पासपोर्ट काढण्यासाठीच्या लिंकवर (अप्लाय फॉर न्यू पासपोर्ट) क्लिक करा. जर तुम्ही पूर्वी पासपोर्ट काढला असेल तर (री-इश्यू ऑफ पासपोर्ट) या लिंकवर क्लिक करा.
  • दिलेल्या अर्जामध्ये आवश्यकता असेली माहिती भरा आणि अर्ज सबमिटकरा.
  • त्यानंतर पे अ‍ॅण्ड शेडय़ूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा. त्यावर व्हिव्ह सेव्ह्ड/ सबमिटेड अ‍ॅप्लिकेशनवर क्लिक करा.
  • पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सेवा अनिवार्य केली आहे.
  • तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डने ऑनलाइन पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंगद्वारेही तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता.
  • प्रिंट अ‍ॅप्लिकेशन रिसिप्ट या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन रेफरन्स क्रमांक असलेली पावती छापून येईल.
  • पासपोर्ट कार्यालयाला तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणि वरील नमूद केलेल्या पावतीसह ठरलेल्या दिवशी आणि वेळी भेटू शकता.
  • ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन जनरेट केल्यावर ९० दिवसांच्या आत तुम्हाला पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी लागेल.

Registration Link

Appointment Availability

Passport Offices

logoblog

No comments:

Post a Comment

ads