प्रस्तावना:

आदिवासी हे संबोधन १९३० साली आदिवासी नेते जसपालसिंह यांनी छोटा नागपूर चळवळीत आणले असले तरी या संबोधनामागे पस्तीस करोड वर्षाचा इतिहास आहे. आदिवासींना वेगवेगळ्या अभ्यासकांनी निरनिराळ्या संबोधनाने संबोधले आहे. याशिवाय रानटी, मागास, लंगटे, भटके, जंगली, गबाळे, भोळे, व्यसनी, महाकाव्य कालात तर राक्षस अशी संबोधने वापरली गेल्याचे डॉ.तुमराम सांगतात, तर काहींनी त्यांना आदिम संबोधले तर काहींनी जंगलाचे राजे संबोधले आहे. अलीकडे मात्र त्यांना वनवासी संबोधून संस्थांकडून त्यांचे मुलत्व नाकारले जात आहे. अलीकडे मात्र त्यांना वनवासी संबोधून संस्थांकडून त्यांचे मुलत्व नाकारले जात आहे. आदिवासीच्या बाबतीत आर्यआक्रमणापासून अशाच संभ्रम निर्माण करणाऱ्या संकल्पना, संज्ञा संबोधने दिली जात आहे. आदिवासींच्या बाबतीतही खेदाचीच बाब म्हणावी लागेल, आदिवासींच्या अस्मितेचे प्रश्न अजूनही जेथे सुटलेले नाहीत, अशी ही जगाच्या पाठीवरील आदिवीसी संस्कृती तिच्यासंबंधी अभ्यास मांडण्याआधी काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील पैकी एक म्हणजे डॉ.शैलजा देवगावकर म्हणतात त्याप्रमाणे भारतात ज्या काही गोष्टींचे निर्विवाद स्पष्टीकरण झालेले नाही, त्यातील एक बाब म्हणजे आदिवासी कोणाला म्हणावे, याची सर्वसामान्य परिभाषा करण्यात आलेली नाही, भारताच्या राज्यघटनातील कलम ३४२ (१) अन्वये राष्ट्रपती एखाद्या जमातीला अनुसूचित जमातीत टाकू शकतात किंवा काढू शकतात. त्यामुळे या जमातीला आपण अनुसूचित जमात(Scheduled Tribe) असे म्हणतो. मात्र मुळात आदिवासी कोणाला म्हणावे याचा उल्लेख राज्यघटनेत नाही. त्यामुळे मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यांच्या अधारेच हे ठरवावे लागते. अर्थात जगभरात लागू पडेल अशी व्याख्या गवसली नाही, असे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे इ.स.१९५३ साली प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलेले आहे, या संबंधाने दुसरी बाब म्हणजे गुजरात मधील प्रसिध्द अभ्यासक डॉ.गणेश देवी म्हणतात त्याप्रमाणे आदिवासी कोण व आदिवासी समाजाची व्याख्या कशी असावी याबद्दल गेल्या दीडशे वर्षात अनेक घोटाळे होत राहिले आहेत. सर्वसामान्य भारतीय नागरिक असे मानतो की, सारे आदिवासी जंगलवासी असतात. किंबहुना जंगलात राहणारे सर्वच आदिवासी असावेत, असेही म्हणण्यात येते. पुन्हा तेथे केंव्हापासून रहात असावेत याबद्दल नक्की निदान नाही. इतर सर्व शहरी व ग्रामीण जनांचा संस्कृती प्रवाह एका विशिष्ट दिशेने निघाला असताना मात्र याच जंगलवासियांचा यात विशेष समावेश का झाला नाही ? याचे काहीच उत्तर नाही. प्रगत तंत्रज्ञानापासून आदिवासी वंचित राहिले असे मानण्यात येते. पण आदिवासींच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत पुष्कळच तांत्रिक विचार झाला असल्याचे पुरावे मिळतात, अर्थात प्रचंड यंत्रे बनवून त्यासाठीचे कारखाने त्यांनी उघडले नाहीत हे खरे. पण ज्या रितीने ते औषधे व बियाणे, वनस्पती व धातू इ. समजू शकतात त्यावरून ते अतिप्राचीन काळातील रानटी समाजापेक्षा नव्हे तर बऱ्याचवेळा कथित, मुख्य समाजाच्या प्रवाहापेक्षाही पुढे असावेत असे वाटते. काही आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहाप इतिहासाच्या कोणत्यातरी काळात विभक्त पडले असावेत असे मानता येईल. तशा प्रकारच्या जुळणाऱ्या वाटा त्यांच्या मौखिक साहित्यात दिसून येतात. कितीतरी आदिवासी इतिहासाच्या कोणत्यातरी कालखंडात दर्यावर्दी असावेत व इतर देशातही त्यांची फिरती होत असावी असेही पुरावे मिळतात, काही आदिवासी जमाती भटक्या, काही स्थिर, काही फार बुध्दीमान, काही साहसी व काही कल्पक, काही शेतीशी निगडीत तर काही व्यवसाय व्यापार करणाऱ्या आहेत. या साऱ्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीवर भारतातील आदिवासींची एक किंवा सर्वसामान्य व्याख्या करणे अशक्य आहे. तथापि, गेल्या दीडशे वर्षामध्ये ही व्याख्या करण्याच्या वांझ प्रयत्नापायी आपण आदिवासींच्या संस्कृतीतील बरेच काही हरवून बसलो आहोत. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी राजवटीमध्ये मानववंशशास्त्राचा आधार घेऊन आदिवासींचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू झाले.

आज भारतात ज्या जमातींना गोंड म्हणून ओळखले जाते अशा २५ जमातीचा समावेश अॅथ्नॉलॉजिकल कमेटीने गोड या संबोधनात केला आहे. परंतु हे गोंड स्वत:ला गोंड न संबोधता कोया, कोईतूर संबोधतात. यावरून गोंड हे जमातनाम नसून प्रदेशवाचक संबोधन आहे, असा निष्कर्ष काढता येतो. आदिवासींचे प्रसिध्द अभ्यासक व्यंकटेश आत्राम यांनी हे प्रदेशवाचक व प्रजावाचक नाम असल्याच्या मांडलेल्या मताला सबळ पुरावा मिळतो. म्हणजेच गोंड हे नाम/संबोधन केवळ विशिष्ट समूहापुरते मर्यादित न राहता मद्रास राज्याच्या उत्तर पूर्व भागात त्यांच्यात बेबनाव होऊन गोंड लोकांचा फार मोठा जत्था मध्य भारताकडे हाकलला गेला. हेच लोक उत्तरेकडे जाऊन आपले जीवन स्थिर करून जगू लागले. पुढे हेच लोक सिंधू संस्कृतीच्या नावाने आढळून आले. गोंड लोकांची चेहरेपट्टी, त्यांचे बसके नाक, त्यांचा काळा वर्ण, लांब डोके, मध्यम बांध्याचे शरीर हे सर्व वर्णन मेडिटेरानियन वंशाच्या लोकांच्या शरीर वर्णनाशी एकरूप आहे असे साधारणत: सर्व विद्वानांचे मत आहे. उपरोक्त मुद्याच्या आधाराने आदिवासींच्या सांस्कृतिक संदर्भाचा विचार केल्यास त्यांच्या गतकालीन वैभवाचा अंदाज बांधता येतो.

आदिवासीभाषाकुलसंकल्पना...

आज आदिवासी भाष्यासंबंधी अनेक समज-गैरसमज झालेले दिसतात. आदिवासी भाषांना लिपीच नाही, आदिवासी भाषा लयात जात आहे वगैरे.. आदिवासींचा अजूनही खऱ्या अर्थाने एकत्रितपणे शास्त्रशुध्द मूळ अभ्यास झाला नाही ही आदिवीसी भाषांची शोकांतिका आहे. भारतातील आदिवासी भाषांचा संबंध दक्षिणेतील द्रविडीनयन भाषांशी जोडला जातो. कॅनडातील भाषा अभ्यासक सूजी आद्रेस भरतात येऊन त्यांनी गोंड जमातींच्या भाषाशास्त्रांची मांडणी करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे. गोंडी भाषेतील शब्दांचा अगदी बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लॉज याने गोंडी भाषेची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या अकाली निधनामुळे गोंडी भाषेचे अमूल्य कार्य तसेच राहून गेले. असे व्यंकटेश आत्राम आपल्या गोंडी संस्कृतीचे संदर्भ या ग्रंथात सांगतात. इंग्रजी व गोंडीतील उच्चार व शब्द साम्य सुध्दा व्यंकटेश आत्राम यांनी सिध्द केले आहे, यावरून गोंडी ही सर्वात प्राचीन अशी आदिवासी भाषा व द्रविडपूर्व भाषा असे म्हणता येईल.



विशेष...

आदरणीय मातृशक्तीयो.., पितृशक्तीयो...

भारतीय संविधानाची आठवी अनुसूची मध्ये स्वातंत्र्याचे सहा दशक झाले तरी सुध्दा आदिवासी धर्म/संस्कृती सुची मध्ये समावेश केला नाही. अनेक सामाजिक संघटनांनी ही मागणी राज्यस्तर देशाची संसदपर्यंत ही मागणी लावून धरली / पोहचवली. सोबतच मध्यप्रदेशाकडून गोंडवाना महासभेच्या माध्यमाने हजारो वेळेस आदिवासी धर्माची मागणी केली गेली. परंतु देशाच्या संसदेत आमच्या समाजाचे खासदार बसलेले आहेत त्यांनी कधीच ही मागणी उचलून धरली नाही. त्या दृष्टीने समाजाला अशा जनप्रतिनिधींची आवश्यकता आहे. जे आदिवासी धर्माला मान्यता मिळवून देतील. १) आदिवासीची आमसभा रायपूर २७ फेब्रुवारी २०१० मध्ये घोषणा केली की समस्त आदिवासी समुदाय येणाऱ्या २०११ च्या जनगणनेमध्ये पुढच्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलम मध्ये हिंदू धर्म न लिहिता आदिवासी धर्म लिहावे. त्याप्रमाणे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मिटींग १ जानेवारी २०१० मध्ये रायपूरच्या गोंडवाना भवन टिकरापारा मध्ये सुध्दा आदिवासी हिंदू नाही अशी घोषणा केली गेली. आदिवासींनी दुसऱ्या कोणत्या धर्माच्या आधारावर न राहता संस्कृतीवर आधारीत जीवन जगले पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांची संस्कृती हीच आदिवासी धर्म आहे. आदिवासी या शब्दापासूनच त्यांच्या आदिधर्माचा बोध होतो. आमच्या सांस्कृतिक विधीमध्ये उत्सव, विवाह संस्कार, जन्म मरणची मान्यता, देवी देवताची मान्यता-परंपरा, गोत्र निर्माण, टोटेम, सगोत्र व्यवस्था, कुळदेवी देवीता, प्राचीन मातृसत्ताक परिवार व समाज आणि त्यांचे तत्त्वज्ञान/तत्वदर्शन तथाकथित. हिंदू धर्मापेक्षा जमीन अस्मानाचा फरक आहे. परंतु हे सत्य आहे, की हळू हळू त्यांचे आमचे देवीदेवतांना अवतारवादच्या घेरले जातात. आणि ब्राह्मणीकरण केले जात आहे. आदिवासींचे गुसई-पुसई, लिंगो-जंगो, म्हतारादेव, मोठा देव व डीवहरीन, सातबहीणी, म्हैसासूर, वाघाई, राजाराव, बधरपाट इ. चे वर्णन हिंदूच्या एकूण धर्मग्रंथामध्ये कोठेच मिळत नाही. याशिवाय गावातील, पाड्यातील कोणतेही कार्य, शुभकार्याची देवीदेवता शिवाय संपन्न होत नाही.

ज्याप्रमाणे आपले पूर्वज आणि आई-वडिलांच्या फोटोवर फुल, हार, दिवा, अगरबत्ती लावली पाहिजे, दुसऱ्याकडून करून घेऊ नये. तसेच आपल्या देवी देवतांची अर्चा सुध्दा स्वत: केली पाहिजे. भटा, ब्राह्मणाकडून करून घेऊ नये. धार्मिक, सांस्कृतिक आंदोलन हे सामाजिक आणि राजनितीक आंदोलन उत्तरदायित्व असते. भारतातील समस्त आदिवासी बांधवांना विशेष विनंती आहे, की आपण आपल्या नातेवाइकांना या विषयी माहिती अवश्य द्यावी. त्यामुळे आपण समाजातील या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये सहकार्य करून आपण संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये आदिवासी धर्म सूचीबध्द करून आदिवासी धर्माला मान्यता मिळवून देऊ.

logoblog