सध्या इतरांच्या अभ्यासाबरोबर आपली तुलना करू नका कारण जितके यशस्वी लोक तितके यशाचे मार्ग असतात. त्यामुळे कदाचित इतरांच्या तुलनेत तुमचा अभ्यास कमी असूनही तुम्ही पास होऊ शकता.
 
MPSC/UPSC चा अवाका खूप मोठा असल्या कारणाने या परीक्षांचा अभ्यास कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे पास होण्यासाठी अभ्यास पूर्ण असण्याची गरज नाही. त्यामुळे यावर्षी माझा अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून मी यावर्षी पास होऊ शकत नाही ही नकारात्मक भावना मनात आली नाही पाहिजे.
 
सर्वात महत्वाची बाब म्हणजे आत्मविश्वास, तो कधीही कमी होऊ द्यायाचा नाही. Result ची कोणतीही काळजी न करता आपण आपले Best द्यायचे,
 
सध्या परीक्षेची भीती, Rivision चा त्रास इत्यादीमुळे परिस्थिती आणखी बिकट होत जात असते. काही भाग तर आतापर्यंत वाचलेलाचनसतो त्याचे टेन्शन येत राहते. एखादा भागवाचून पूर्ण झाला नाही तर काही फरक पडत नाही.
 
जसजशी परीक्षेची वेळ जवळ येऊ लागते तसे तसे हृदयाचे ठोके वाढू लागतात. जेवढा जास्त अभ्यास तेवढी जास्त भीती वाटू लागते. कारण खूप अभ्यास केला आहे पण एवढे सर्व परीक्षेत आठवेल का? हा विचार मनात पुन्हा पुन्हा येत राहतो.
 
खरेतर आपल्याला 4 पर्यायापैकी उत्तर निवडायचे असते. आपल्याला उत्तर लिहावे लागत नाही, त्यामुळे परीक्षेत आठवेल का याची काळजी करू नका, तसेच आपण आजपर्यंत खूप काही वाचले आहे आणि परीक्षेत फक्त GS चे 100 प्रश्न आणि C-SAT चे 80 प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे बिनधास्त रहा.
 
आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न येण्याची गरज नाही.
 
ही माझी शेवटची संधी आहे असा विचार केल्यास Exam Pressure वाढून Performance कमी होऊ शकतो. त्यामुळे ही माझी शेवटची संधी आहे असा विचार न करता या परीक्षत मी माझे सर्व बेस्टस्ट देणार आहे असा निश्चय करा
 
मला परीक्षेत विशिष्ट स्कोर आणावयाचा आहे, असा निश्चय करण्यापेक्षा येणाऱ्या परीक्षेत मी माझी पूर्ण ताकत लावणार आहे असा निश्चय करायचा.
 
मी पास नाही झालो तर पुढे काय याची नेहमी भीती वाटत राहते.
आपल्या मनात एका बाजूला आपली इच्छाशक्ती कार्यरत असत तर दुसऱ्या बाजूला नकारात्मक भावना.
आपण नहमी इच्छाशक्तीच्या बानुनच विचार करायचा म्हणजे नकारात्मक भावनेचा विजय होणार नाही
 
पाठीमागचे न आलेले Result आठवत राहतात. त्याची पुन्हा पुनरावृत्ती होती की काय अशी भीती वाटत राहते. पाठीमागच्या Result चे टेंशन घ्यायचे नाही कारण आपल्याला पास होण्यासाठी फक्त एकच Attempt लागतो हे लक्षात असू द्या,
 
परीक्षाहा एक उत्सव आहे या भावनेने खूप आनंदाने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामाोरेजा.
दिवाळी दसऱ्याप्रमाणे नटूनथटून प्रसन्न भावनेने परीक्षेला जायचे.
 
परीक्षेचे टेन्शन अजिबात घ्यायचे नाही.
 
परीक्षा, Result, Post या सर्व गोष्टी आपल्यासाठी आहेत. आपण त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे बिनधास्त राहायचं.
कशाचाच लोड घ्यायचा नाही.
 
सद्या फक्त वाचत राहायचे, काही आठवायचे नाही.
 
सद्या अभ्यासाचे अतिमहत्त्वकांक्षी नियोजन डोक्यात ठेवायचे नाही. जेवढे स्पीड ने वाचता येईल तेवढे वाचत राहायचे.
 
सध्या कोणी म्हणते पेपर सोडवा , कोणी म्हणते आपापल्या नोट्स वाचा, कोणी म्हणते परीक्षेच्या आदल्या दिवशी काहीच वाचूनका. मित्रांनो अभ्यास थांबवायची आजिबात गरज नाही, कारण निवांत बसले की फक्त परीक्षाच आठवते आणि मगटेशनयेत राहते.
 
टेशन येत आहे म्हणून सोशल मिडियावर टाईमपास करू नका. कारण त्यामुळे परीक्षेचे गांभीर्य कमी होऊ लागते.
 
सध्या Revision चा त्रास होत असेल तर एक Best पर्याय सांगतो, पाठीमागील 2012 ते 2019 चे पेपर घ्या. त्यामधील प्रश्नांच्या उत्तराला खुणा करुन तेच प्रश्न-उत्तरे पुन्हा पुन्हा वाचा. त्यातून उत्तरांचे Logic Develop होईल आणि परीक्षेची भीती मरेल. तुम्ही हे पेपर पुन्हा पुन्हा वाचाल तर कमी अभ्यासात उत्तरापर्यंत कसे पोहचायचे हे कळेल.
 
मागील पेपरचे Analysis केल्यास सहसा कोणते पर्याच बरोबर असतात, परीक्षक नेमके काटे फसवतात या गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतील.
 
प्रश्न नीट वाचा कारण काही वेळा प्रश्नातच उत्तर असते.
तसेचसोप्या प्रक्षालाOver Excited होऊ नका,
 
आपल्याला या वर्षी Mains द्यायची आहे हे डोक्यात ठेवा म्हणजे पूर्व परीक्षेचे टेंशन येणार नाही.
 
सध्या कोणाबरोबर सुध्दा Discussion करायचे नाही आणि कोणाला प्रश्न विचारू द्यायचा नाही. तुम्हाला येत नसलेला एखादा पॉईंट आपल्या मित्राला येत असतो आणि आपण त्याच्या बरोबर आपली तुलना करू लागतो.
 
परीक्षच्या काळात तणावाखाली असल्यान सहनशीलता कमी होऊन चिडचिड वाढलेली असते. त्यामुळे भांडण, वादावादी होण्याची शक्यता असते. (विशेषत Roommate बरोबर)
 
लक्षात ठेवा असे कोणतेही कृत्य करू नका की ज्याचा तुमच्या पेपरवर वाईट परिणाम होईल.
 
ज्या व्यक्तीमूळे आपला परीक्षेचा कॉन्फिडन्स वाढेल अशाच व्यक्तीच्या सानिध्यात रहायचे.
लक्षात ठेवा ही परीक्षा केवळ अभ्यासाची नाही तर अभ्यासाबरोबरच तुमच्या आत्मविश्वासाची आणि Tempramen(ची सुध्दा परीक्षा आहे.
 
कोणीतरी म्हणते पास होण्यासाठी किमान 3-5.10 Revision लागतात असे काही नाही. तुमच्या आहे या अभ्यासावर Logic लावून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आपण आतापर्यंत खूप वाचलेले आहे त्यामुळे 4 पर्याय पुढे दिल्यानंतर काहीतरी सुचते. मानवी मेंदू एवढा दगाबाज नाही.
 
अभ्यास करताना लक्षात येते की 2 तास झाले तरी दोनच पाने वाचतोय आणि आज दोन-तीन विषय वाचून संपवायचे हे ठरवलेले असते. मग आत्तापर्यंत गेल्या वर्षभरात आपण काहीच अभ्यास केला नाही असे वाटत राहते. सध्या परीक्षान देणारी सर्व लोक सुखी वाटतात. खूपटेन्शन येते, मधूनच पाय थरथर कापतात, वॉशरूम-टॉयलेटच्या चकरा वाढतात. लक्षात ठेवायचे अभ्यास करणान्यांची कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असते. आपण अभ्यास केलेला आहे तर या गोष्टी आपल्या बाबतीतसुद्धा निश्चितपणे घडणार आहेत,
 
या काळात कुणाला 'बेस्ट लक' देत बसायचे नाही आणि कुणाच्याही 'बेस्ट लक'ची वाट बघायची नाही. पेपरची शेवटची बेल होईपर्यंत स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करायचा.
 
पेपरच्या आदल्या दिवशी लवकर तसेच 7 ते 8 तास झोपा, म्हणजे पेपर साठी खूप ऊर्जा निर्माण होऊन पूर्ण जीव ओतून पेपर सोडवता येईल आणि प्रयत्न करून पण झोप नाही लागली तर टेंशन घेऊ नका. एक दिवस कमी झोप झाली म्हणून फरक पडत नाही.
 
शरीराची काळजी घ्या.
प्राणायाम ध्यान करत असाल तर खूप छान.
 
ग्लुकोजमुळे मेंदूला Instant Stimulation मिळते त्यामुळे पेपर सोडवताना अधूनमधून खाण्यासाठी कॅडबरी वगैरे घेऊन जा.
 
परीक्षेच्या दिवशी आपल्या मनाचे सतुलन बिघडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या.
 
Exam Centre दूर आल्याने पौनक होऊ नका, कारण त्याचा आपल्या Result वर कोणताही परिणाम होत नसतो.
 
परीक्षेच्या दिवशी जास्त खर्च झाला तर होऊ द्या. पुन्हा वर्षभर काटकसर करू.
 
Hallticket, Pen, Identity Card व तसेच इतर आवश्यक साहित्य घेऊन Exam Centre वर वेळेत पोहचा. आपली फक्त Answer sheet आयोगाकडे जाणार आहे त्यामुळे Answer sheet वर कोणतीही चूक करूनका. तुमचा RolINumber, Series No,Question Booklet No, Sign, Attempt इत्यादी व्यवस्थितीत काळजीपूर्वक भरा.
 
उत्तराला गोल करताना घाई करू नका कारण एक Silly Mistake आपल्याला खूप महागात पडू शकत.
 
बरेच प्रश्न आपणन वाचलेले येतात. त्यामुळे Logic आणि Elimination Techniques द्वारे तसेच हजरजबाबीपणे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
 
GS च्या पेपरला खूप वेळ आहे. त्यामुळे तो पेपर अत्यंत शांततेत सोडवा.
 
पेपरचे चारही Set शक्यतो असे सेट केलेले असतात की जेणेकरून पाहिले प्रश्न कठिण असतील (विशेषतः A series), त्यामुळे पाहिले काही प्रश्न सोडवता आले नाही तर टेंशन घेऊ नका नाहीतर मग पुढचे प्रश्न सोपे असून सुद्धा चुकत जातात.शेवटचे प्रश्न सोपे असण्याची शक्यता असते. त्यामुळे Round च्या माध्यमातून शेवटपर्यंत पोहचा.
 
C-SAT चा पेपर वादळाप्रमाणे असतो. दोन तास कधी संपले हे कळायच्या आत बेल होते. Passage च्या बाबतीत पहिल्या दोन ओळींमध्येच आपल्याला कळू शकते की, आपण या Passage बरोबर Familiar आहोत की नाही? Familiar असलेले Passage अगोदर सोडवायचे. उदा. Polity, Environment, Economy इ.
 
ज्या Passage वर जास्त प्रश्न आहेत आणि ज्या Passage बरोबर आपण Farmiliar आहोत असेच Passage अगोदरसोडवा.
 
एका Passage वरील सर्व (3-4-5) प्रश्न वाचून झाल्यावर उत्तराला गोल करा. कारण पॅसेजच्या बाबतीत पुढील प्रश्नांवरून मागील प्रश्नाचे उत्तर सापडू शकते.
 
GS चा पेपर सुटल्यानंतर मधल्या सुटीत GS च्या प्रश्नाबाबत इतरांबरोबर चर्चा करू नका. कारण त्याचा C-SAT वर परिणाम होऊ शकता.
पेपरच्या अगोदर काहीही नाही वाचले तर चालेल पण पेपरच्या अगोदर शांत राहण्याचा प्रयत्न करा
 
विशेष करून C-SAT च्या पेपरसाठी खूप Concentration लागते. तसेच या पेपरची वेळ दुपारची असल्याने तुलनेने आपली क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे दुपारच्या पेपरसाठी उर्जा टिकविण्यासाठी मधल्या सुटीत जेवढे शात रहाल तवढ उत्तम.
 
पेपर सोपा यईल की अवघड यईल? Conceptual यईल की Factual यईल? याचा विचार करू नका कारण तो सर्वांसाठी तसाच असणार आहे.
 
जो विषय तुम्हाला तुलनेने सोपा वाटतो त्या विषयाचे प्रश्न पहिल्यांदा सोडवा. म्हणजे तुमचा Confidence वाढेल.
 
आपला ज्या विषयाचा अभ्यास झाला नाही तो विषय आठवण्यापेक्षा आपला ज्या विषयाचा अभ्यास झाला आहे, तो विषय आठवा म्हणजे तुम्ही नकारात्मक भावनेत राहणार नाही.
 
आपल्याला सत्य विचारले आहे की असत्य विचारले आहे ते काळजीपूर्वक पहा.
 
खूप मोठे असणारे प्रश्न शेवटी सोडवा कारण अशा प्रश्नाला वेळ जास्त लागतो.
 
C-SAT चा पेपर हातात आल्यानंतर Speed यायला वेळ लागतो. त्यासाठी पुढील गोष्टी करू शकता.

हॉल मध्ये जाण्यापूर्वी 20 मिनिटे एखादा आयोगाचा C-SAT चा पेपर घेवून त्यामधील प्रश्न-उत्तरे Speedने वाचातसेच परीक्षा हॉल मध्ये गेल्या गेल्या Answersheet आणि Question paper वरील सूचना Speedने वाचा.
 
Aptitude आणि Reasoning चे सोपे आणि कमी वेळेत सुटु शकणारे प्रश्न अगोदर सोडवा.
 
एखादा प्रश्न वेळेत सुटत नसेल तर मोहात न अडकता पुढच्या प्रश्नाकडे जा.
 
पेपरच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला पास होण्याची संधी आहे या भावनेने परीक्षेच्या शेवटच्या सेकदापर्यंत हार न मानता आणि अतिउत्साही न होता पेपर सोडवा.
 
तुम्हा सर्वांना परिक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा...!

logoblog

No comments:

Post a Comment