डोंगरदऱ्यातील आणि जंगलातील हे आदिवासी अनेक वर्षे आपल्या संस्कृतीचा वेगळेपणा टिकवून होते. प्रथम प्रस्तापितांनी नंतर ब्रिटिशांनी आदिवासींच्या सहज जगण्याला सुरुंग लावला. आत्तापर्यंत जंगलात राहणाऱ्या आदिवासींची जंगलावर मालकी होती. ते जंगलात मुक्तपणे राहत होते. जंगलातील साधन संपत्तीवर त्यांचाच अधिकार होता. तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. जंगलावर सरकारचा अधिकार आल्याने अनेक वर्षे जंगलात राहत असलेली, जंगलातले मूळ रहिवासी असलेली आदिवासी जमात मात्र निराधार झाली. आदिवासींचे उदरनिर्वाहाचे साधने त्यात लाकूडफाटा, फळ, कंदमुळं आणि जनावरांसाठी चारा हे होते. हे तोडल्यास दंड केला जाऊ लागला. शिक्षा होऊ लागली आणि आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, ब्रिटिशांनी जंगलाचा कायदा करून आदिवासींच्या जगण्यालाच सुरुंग लावण्याचे काम केले होते. या अगोदरच जंगलातले हे आदिवासी फळं, डिंक, मध, तेंदूपत्ता आणि दुर्मीळ वनऔषधी विकूनच आपला चरितार्थ चालवीत होते. जंगलाच्या आजूबाजूच्या गावात या वस्तू विकून ते धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत होते. असे करताना दुकानदार-बनिये आदिवासींकडून जंगलातल्या वस्तू खरेदी करताना मुद्दाम कमी भाव देत असत आणि ज्या वस्तू आदिवासींना विकत देत त्यांचे भाव जास्त लावत असत. अशाप्रकारे बनिया, दुकानदार, महाजन, सावकार हे आदिवासींचे आर्थिक शोषणच करीत होते.

        आदिवासींनी प्रस्तापितांच्या व्यवस्थेविरूध्द अनेकवेळा विद्रोह केला. इ.स.१७८९ ते १८३२ दरम्यान मुंडा जनजातीने अनेक विद्रोह आंदोलने केली. यातील जास्त प्रभावशाली विद्रोह हा १८३१३२ चा 'कोल विद्रोह' या नावाने ओळखला जातो. या विद्रोहाचे कारण छोटा नागपूरचे राजा, यांचा लहान भाऊ हरनाथ सहाई याने बऱ्याच गावातील शेती जमीनदार, प्रस्तापित सावकार आणि आदिवासी नसलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिली. या शेतजमिनी मुंडा जनजातीच्या वडिलोपार्जित होत्या. साहजिकच त्यातूनच विद्रोह सक्रिय द्याला मुंडा जनजातीमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांबद्दल असंतोष वाढला. त्यातूनच विद्रोह सक्रिय झाला. विद्रोहाची आग गावागावात, परिसरात पसरत गेली. या विद्रोहात सर्व आदिवासी सहभागी झाले. त्यांनी परप्रांतीय व्यापाऱ्याकडून शेतजमिनी आपल्या ताब्यात घेतल्या. हा विद्रोह तब्बल एक वर्षे चालला. सर्व परप्रांतीयांना व्यापाऱ्यांनी छोटा नागपूरच्या भागातून हुसकावून लावले. या विद्रोहात ३००० ते ४००० मुंडा सहभागी झाले होते.

        १८५५ -५६ सिध्दू कानू हे दोघे विद्रोहाचे नेते होते. यांचा संथाल विद्रोह राजनितीक अभिव्यक्ती सारखा होता. जसे भगीरथ मांझी यांनी प्राचीन मूल्यांची पुर्नस्थापना करण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मागे सामाजिक जनजागृती करणे हा उद्देश होता. सिध्दू व कानू यांनी शोषणमुक्त जीवनाचे स्वप्न पाहिले होते. १८८८ ते १८९० चा जमिनीकरिता सरदार विद्रोह. या विद्रोहावरून आपल्या लक्षात येईल की, मुंडा आदिवासींनी विद्रोह फक्त इंग्रजांविरुद्ध केला नाहीतर त्यांनी प्रस्तापित व्यवस्थेविरूध्द सुध्दा विद्रोह केला आहे.

        इ.स. १८४५ आणि त्याच्यानंतर मुंडा आणि उराव यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे त्यांना वाटले की, आपली भूमी समस्या सुटेल. कारण गेल्या ५० वर्षापासून ते अत्याचाराचे शिकार झालेले होते. त्यांना विश्वास वाटला की, धर्मपरिवर्तन हाच मुक्तीचा मार्ग आहे. त्यांच्या धर्मपरिवर्तनाने १८५० ते १८५८ जमीनदार, प्रस्तापित आणि ठेकेदारांनी ख्रिश्चन झालेल्यांच्या शेतातील पीक कापून नेणे, त्यांची गुरेढोर पळवून नेणे, त्यांची घरेदारे जाळून टाकणे, एवढ्यावरच न थांबता त्यांच्यावर खोटे खटले न्यायालयात दाखल केले. ख्रिश्चनांवर हल्ले केले. त्यांच्यावर दडपण आणले. जमीनदारांनी सभा घेऊन मिशन व ख्रिश्नांना विरोध केला. त्याच जमीनदारांनी इ.स.१९५७ चे बंडामध्ये रांचीमध्ये जर्मन मिशन भवनांवर, चर्चवर हल्ला करून लूटमार आणि जाळपोळ केली. बरीच साधनसामुग्री लुटून नेली. इंग्रजांनी सैनिक कार्यवाही करून १८५७ चा विद्रोह शांत केला. परंतु याचा गैरफायदा घेऊन परप्रांतीय जमीनदार,प्रस्तापित व ठेकेदारांनी मुंडाची वडिलोपार्जित शेती आपल्या ताब्यात घेतल्यामुळे मुंडा जनजातीमध्ये असंतोष वाढत गेला. मिशनरीजने आपला कार्य सेवाभाव दाखवीत शिक्षणासाठी शाळा, वसतिगृहे सुरू केली, रोग्यासाठी दवाखाने, दळणवळणासाठी रस्ते, बेरोजगारांसाठी उद्योगधंदे सुरू करून छोटा नागपूर भागात जम बसविला. ज्या आदिवासींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला त्या शिक्षित आदिवासी लोकांनी आपल्या अधिकारासाठी आंदोलन केले, त्याला सरदारी आंदोलन म्हणतात. हे आंदोलन १८५८ पासून सुरू झाले. त्यांच्या मागण्या याप्रमाणे होत्या. ते या भागातील मुळनिवासी आहात. त्यामुळे या भागातील जंगल, डोंगर आणि शेत जमिनीवर त्यांचा अधिकार आहे. वेठबिगारी, प्रथा बंद झाली पाहिजे, स्त्रियांवरील अत्याचार बंद झाले पाहिजे.

        सरदारी आंदोलन तीन टप्प्यात झाले पाहिजे, आंदोलन १८५८-१८८१ जमिनीवरील आपल्या अधिकारासाठी झाले. तर दुसरे आंदोलन १८८१ ते १८९० ईसाई मिशनरिशी झालेले मतभेद व शेवटी तिसरे आंदोलन १८९० ते १८९५ राजनैतिक हक्कासाठी झाले. सरदारी आंदोलनाची सुरुवात १८५८ जमिनीवरील हक्कासाठी झाले. इ.स.१८७९ मध्ये मुंडा जनजातींनी सरकारला निवेदन सादर करून छोटा नागपूर प्रदेशाचे खरे मालक मुंडा आदिवासी आहेत. दोएसा येथे एका स्वातंत्र्य राज्याची स्थापना देखील केली. १८८६-८७ मध्ये मुंडांनी जर्मन लुथेरान चर्चच्या प्रमुख पादरी नरकोटला निवेदन देऊन त्यात त्यांनी मागणी केली, की छोटा नागपूर प्रदेशातील सर्व जमिनीचे मालकत्व मुंडानाच द्यावे. आंदोलनाचे पुढे १८९० ते १८९५ राजनैतिक स्वरूप धारण केले. इ.स.१८९० मध्ये सरदार आंदोलकांनी घोषणा केली, की मिशनरि प्रचारक, सरकारच्या विविध कार्यालयातील कर्मचारी, बंगाली बाबू, जमीनदार आणि ठेकेदार,प्रस्तापित ह्या सर्वांना विरोध केला जाईल. कारण हे सर्व आदिवासी विरोधी होते. त्यामुळे हे आंदोलन मुंडांनी पार पाडावे. ख्रिश्चन धर्म स्वीकारून मुंडा आदिवासींचे कल्याण होणार नाही, असे त्यांना वाटू लागले. इ.स.१८९२ मध्ये सर्व ठेकेदार आणि जर्मन मिशनऱ्यांना ठार करण्याचे आंदोलनकारी मुंडा सरदारांनी ठरविले. मात्र त्यांच्या संघटनेमध्ये प्रभावी नेता नसल्यामुळे ही योजना सफल झाली नाही.

            बिरसा मुंडाचे पूर्वज पूर्ती वंशाचे होते. ते उंदराला शुभ मानत म्हणून त्यांचे नाव चुरिया पूर्ती पडले. उंदराला चुरू म्हणत. या पूर्ती वंशामध्ये दोन भाऊ होते. त्यातील एकाचे नाव चुटू आणि दुसऱ्याचे नांव नागू होते. चुटू शब्दाला बदलून चुटिया झाले. नंतर चुटियाचा छोटा तर नागूचे नाग मध्ये बदल झाला. याप्रकारे मुंडा यांच्यानुसार छोटा नागपूर नाव दोन भावावरून पडले. बिरसा मुंडाचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलीहातू गावी झाला. त्याच्या जन्मतारखेत भिन्नता आहे. बर्लिनमध्ये गोरसनर मिशनच्या कागदपत्रानूसार जन्म २२ जुलै १८७२ रोजी झाला. परंतु २२ जुलै रोजी सोमवार होता. त्यामुळे जुलैच्या १८ आणि २५ ला गुरुवार येत असल्याने बाळाचं नांव बिरसा ठेवण्यात आलं. ७ मार्च १८८६ मध्ये बिरसाने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. त्याचे नांव दाऊदमुंडा ठेवण्यात आले होते. त्यांना दाऊद बिरसा सुध्दा म्हणत. त्यांच्या पित्याचे नाव सुगना मुंडा व आईचे नाव करमी मुडा होते.

        गरिबीच्या कारणाने बिरसा अयुबहातू या गावी त्याच्या मामाकडे रहावयास गेला, अयुबहातू गावावरून सालमा गावातील एक शाळा जयपाल नाग चालवीत होते. त्या शाळेत बिरसा मुंडाने प्रवेश घेऊन शिक्षणाची सुरुवात केली. तेथे शिक्षण घेत असताना त्याच्या मावशीने त्याला खटंगा या गावी घेऊन गेली. तेथे ख्रिश्चन धर्म प्रचारकाचा संपर्क बिरसा मुंडा बरोबर झाला. हा धर्म प्रचारक त्या गावातील ख्रिश्चन धर्माच्या परिवारात येत जात होता आणि तेथे मुंडाच्या धर्म व्यवस्था, सांस्कृतिक नीतीव्यवहारावरील टिका टिप्पणी करीत असे हे बिरसा मुंडाला आवडत नसे. तसेच आणखी एक घटना घडली की, बिरसाला त्या गावा थांबणे कठीण झाले. त्याला बकऱ्या चारण्याचे काम दिलेले होते. मात्र तो अभ्यासात इतका तल्लीन होत असे की, त्याच्याकडे सोपविलेल्या बकऱ्या दुसऱ्याच्या शेतात चरत असल्याने त्या शेताचा मालक बिरसाला मारझोड करीत परिणामत: मावशीने बिरसाला त्याच्या आई - वडिलांकडे परत पाठविले. त्यानंतर बिरसाच्या पुढील शिक्षणासाठी मोठे भाऊ पुढील शिक्षणासाठी कोमता हा राहत असलेल्या कुदी बरटोली येथे पाठविण्यात आले. तेथे जर्मन मिशनरि स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक शाळा पास झाल्यानंतर १८८६ मध्ये चाईबासा येथे जर्मन मिशनच्या उच्च माध्यमिक शाळेत दाखल झाला, चाईबासा येथे १८८६ ते १८९० पर्यंत राहत होते. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचा कालावधी होता, एके दिवशी चाईबासा मिशनमध्ये उपदेश देताना डॉ.नोट्रोट यांनी आश्वासन दिले की, ख्रिश्चन धर्माचा ज्यांनी स्वीकार करून ख्रिश्चन राहतील व ते आदेशांचे पालन करतील ह्यांना त्यांची हिसकावलेली जमीन परत करू. या गोष्टीवर बिरसाने लक्ष दिले व आठवण ठेवली. पण त्याला धक्का बसला जेंव्हा १८८६-८७ मध्ये मिशनरि व मुंडा सरदार यांचा संबंध तुटला आणि मिशनरींनी मुंडा सरदारांना धोकेबाज व चोर म्हणावयास सुरुवात केली. त्यावेळी बिरसा मुंडाने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्याचा परिणाम बिरसा मुंडाला शाळेतून काढण्यात आले. त्याच्या जीवनातील हा महत्त्वपूर्ण प्रसंग ठरला. यावरून त्याचे शिक्षण उच्च प्राथमिक झालेले होते. मिशन शाळेत वर्षे शिक्षण घेतल्याने त्यांना इंग्रजी थोडीफार जमत होती.

        बिरसा व त्याचे कुटुंबाने चाईबासा १८९० मध्ये सोडले. नंतर त्यांनी जर्मन ईसाई मिशनचे सभासदत्व सोडल्यानंतर रोमन कॅथोलिक धर्म स्वीकार केला व काही दिवस त्याच्याबरोबर राहिला. परंतु त्यात त्याचा मनोभंग झाला. चाईबासा सोडून बिरसा आपल्या बहिणीकडे दासकीर येथे गेला. तेथे एक वर्ष मुंडाच्या घरी नोकरी केली.

        आदिवासींना जंगलावरील आपल्या अधिकारापासून वंचित करणाऱ्या १८७८ चा भारतीय वन कायद्याविरूध्द निवेदन घेऊन सिंगरिदा गावचे लोक बिरसा मुंडाकडे आले होते. तेव्हा बिरसा मुंडा त्या गावकऱ्यांसोबत चाईबासाकडे गेले. तेथे त्यांनी वनासंबंधी सवलती बाबत निवेदन दिले. मात्र त्यांचा कोणताही फायदा झाला नाही. ही घटना १८९४ मध्ये घडली. येथूनच बिरसा मुंडा यांनी जीवनातील महान इतिहास निर्माण करण्यास सुरुवात केली.

        इ.स.१८९५ मध्ये बिरसा मुंडा यांच्या लक्षात आले की, प्रस्थापितामुळे मुंडा जनजातीला काहीही मिळणार नाही. सरदार आंदोलन सन १८५८ पासून सुरुवात होऊन सुध्दा काही ठोस लाभ मिळाला नाही म्हणून बिरसा मुंडाने निर्णय घेतला की स्वत: पुढाकार घेऊन मुंडा आदिवासीसाठी लढावे लागेल. तसेच मुंडा जनजातीच्या परंपरागत जीवन पध्दतीमध्ये धर्मामध्ये काही परिवर्तन आवश्यक आहे. बिरसा मुंडा मुंडा जनजातींना उद्देशून सांगत की, मुंडा आदिवासींमध्ये हडळ जादू मंतरवाले, अलौकीक शक्तीवर विश्वास ठेवणारे व अंधविश्वासात जखडलेली आहे. ब्रिटीशाविरूध्द लढायचे असेलतर ज्या प्रकारचे युध्द होईल तसेच कौशल्य दाखविण्याची गरज असते. नवीन धर्म मुंडांना युध्द करावयास शस्त्र हातात घेण्याचे शिक्षण देईल. बिरसा आपल्या नव्या धर्माचा प्रसार करीत होता. त्यानुसार सर्वांनी बिरसा भगवान यांचे धार्मिक नियमांचे पालन करावे.ते नियम याप्रमाणे

(१) चोरी करणे, खोटे बोलणे, हत्या करणे अन्याय आहे.

(२) भिक्षा कोणीही मागू नये.

(३) आपला सर्व समाज गरीब आहे. आणि इतरांच्या आज्ञेवर विश्वास ठेवून बळी देणे, पुजा करणे बंद करा.

(४) भूतप्रेत, हडळ, पिशाच इत्यादीवर विश्वास ठेवू नका,

(५) ताडी, हंडिया, महुआ हे सर्व मादक पदार्थ सैतानाचे घर आहे. या मादक द्रव्यांमुळे बुध्दी जड होते, लोक नशाखोर होतात. लोक नशेच्या अवस्थेत अमानवीय कृत्य करतात. अशा कोणत्याही प्रकारच्या द्रव्यांचे सेवन करू नकाते बंद करा,

(६) मुंग्याप्रमाणे सतत परिश्रम करीत रहा,

(७) पशु-पक्षाप्रमाणे एकजुटीने जीवन जगा.

(८) सर्वांवर प्रेम करा.

        या नवीन नियमांकडे मुंडा आदिवासी व ईसाई मुंडा आकर्षित होऊन त्या नियमांचे पालन करू लागले. त्यामुळे मुडा आदिवासीमध्ये एकतेची भावना जागृत झाली होती. बिरसा मुंडाने मनोवैज्ञानिकसारखे समाजातील अंधविश्वास आणि कुप्रथांविरूध्द आंदोलन उभे केले. बिरसा मुंडा यांनी आदिवासींना संघटित करून एकसंघ बांधण्याचा प्रयत्न केला,

        न्यायाधीश आणि वकील, जमीनदार, ठेकेदार प्रस्तापित दलाल इत्यादी सर्व मंडळी आहे. या सर्व लोकांनी मुंडाचे शोषण केले आहे. त्यामुळे या सर्व लोकांना ठार मारणे आवश्यक आहे. या संदर्भात माहिती फादर हाफमनने रांची येथे कमिशनरकडे कळविली की, धर्म जागरणाची ही लाट केव्हाही राजकीय आंदोलनाचे रूप घेऊ शकते. कारण मुंडा पारंपारीक शस्त्र व पुरेशी शिधा सामुग्री बरोबर घेऊन चालकदला येऊन तेथे मुक्काम ठोकू लागले. बिरसा मुंडा आपल्या अनुयायांना शिकवण देऊ लागले की, आपले राज्य येत आहे आणि इंग्रजांचे राज्य समाप्त होत आहे. त्यांनी अनुयायांना विश्वास दिला की, इंग्रज जर गोळीबार करतील तर बंदुकीच्या गोळ्यांचे पाणी होईल. त्यांनी प्रजेला सरकारला कर देण्याची मनाई केली आणि जमिनीचे मालक मुंडा आदिवासीच आहेत. अशाप्रकारे फार हाफमनने सरकारला सावधान केले म्हणून सिंहभुमी येथील डेप्युटी कमिशनरने तामाड पोलीस ठाण्यात बिरसा मुंडाला कैद करण्याचा आदेश दिला. बिरसा मुंडाला अटक करण्यासाठी तमाडच्या पोलीस अधिकारी व काही पोलीस कर्मचारी चालकद येथे गेले परंतु बिरसाच्या अनुयायांनी या पोलिसांना हाकलून लावले. नंतर बंदगांव येथून पोलीस डेप्युटी सुपरीटेडेंट मिवारनि रांचीहून २० बंदूकधारी पोलिसांच्या तुकडीला पाचारण केले. मुरहू मिशनचा रेव्हरंड लास्टी, जमीनदार जगमोहनसिंह एक हत्ती घेऊन चालकदला पोहचला, रात्रीच्या घनदाट अंधारात चोरपावलांनी घरात शिरून त्यांनी बिरसाला अटक केली व हत्तीवर बांधून रातोरात से बंदगावकडे निघाले. बिरसाने कोणताही प्रतिकार केला नाही. आपल्या साथीदारांना पण त्याने त्यापासून परावृत्त केले. परिसरातील सर्व आदिवासी मुंडाने बंदगावच्या पोलीस ठाण्याला वेढा घातला, तणाव वाढू नये म्हणून बिरसाला खुंटीला या गावी नेण्यात आले. परंतु तेवही तणाव वाढला मन सैन्याच्या पहान्यात रांचीला नेण्यात आले. रांचीला कालीकृष्ण मुखर्जी न्यायाधीश यांचेसमोर खटला चालला त्यांनी सर्वांना निर्दोषमुक्त केले. तेव्हा सरकारने त्या न्यायाधीशाची बदली करून टाकली व बिरसासह इतर पंधरा मुंडा यांना परत कैदेत टाकले. नंतर त्यांच्यावर खटला सुरू केला. विरसाची बाजू न्यायालयापुढे मांडताना कोणताही वकील दिला नाही. त्यामुळे बिरसाविरूध्द एकतर्फी निकाल देण्यात आला, १९ नोव्हेंबर १८२५ रोजी बिरसा मुंडाला दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. बिरसाला हजारी बाग जेलमध्ये ठेवण्यात आले.

        सन १८९५-९७ या कालावधीत छोटा नागपूर भागात दुष्काळ पडला. त्यामुळे वस्तूंचे भाव वाढून महागाई प्रचंड वाढली. त्यातच इंग्रज सरकारने कर वाढविला. मुंडाच्या वतीने बरिस्टर जेकब याच्या सहकार्याने केस टाकून कर देणे बंद करण्यात आला. सरदारांनी आंदोलन बिरसाच्या नावाने सुरू केले. बिरसा मुंडाच्या सुटण्याची वाट पाहत इकडे बिरसाचे अदिोलन सुरू होते. ३० नोव्हेंबर १८९७ रोजी अखेर बिरसा मुंडाची कारागृहातून सुटका झाली.

        दि.३०/११/१८९७ ला कारागृहातून सुटल्यानंतर बिरसा चालकद येथे परतला, ७/१२/१८९७ रोजी रांची च्या डेप्युटी कमिशनर स्वत: बिरसाला भेटायला चालकद येथे आले से बिरसाला म्हटले की, तुम्ही मला वचन द्या की, यापुढे तुम्ही गडबड करणार नाही. बाबर बिरसा यांनी सांगितले की, मी कधीच कुणाला चिथावणी दिली नाही व देणार नाही. खरे काय ते लोकांना सांगण्याचे माझे कर्तव्य आहे व ते मी करीत राहणार नंतर बिरसा मुंडाने घोषणा केली की, नये रूप घेऊन त्यांचा धर्मप्रसार होईल. धर्म आणि राजनीती आमच्या धर्माचे अभिन्न अंग असणार. न धर्मात मुक्ती संग्रामात शख हाती घ्यावे लागेल. बिरसा मुंडाचे आंदोलन भूमिगत होऊन जास्त गती घेत प्रारंभी धार्मिक वाटणारे आंदोलन हळूहळू राजनीतीकडे वाटचाल करीत होते. बिरसा यांनी आंदोलनाला तीन भागात विभागले. पहिल्या भागात प्रचारक होते. त्यांना गुरू म्हणत ते अत्यंत विश्वासास पात्र अनुयायी होते. त्यांचे घरी प्रत्येक गुरुवार आणि रविवार रोजी प्रचाराची बैठक होत होती. दुसऱ्या भागात पुराणक होते. हे जुने अनुयायी कुटुंबवत्सल असल्याने बाहेरगावी प्रवास करू शकत नसत. गावातच थांबायचे कुठेही जायचे-यायचे नाही. शस्त्रांचा साठा करायचा व युध्दाचे प्रशिक्षण द्यायचे ही त्यांची कामे होती. तिसऱ्या भागात नानक होते. धर्माच्या नावाने लोकांना जागृत करायचे सर्वस्व समर्पणासाठी तयार करायचे हे काम यांचे असायचे. अशाप्रकारे ही सारी योजना मोठ्या प्रमाणात अत्यंत गुप्तपणे सुरू होती. त्यामुळे बाहेर काय चालले आहे याचा संशयसुध्दा कुणाला वेत नसे. मुंडाच्या जुन्या मूल्यांची पुर्नस्थापना करण्यासाठी मुंडाच्या पुरातन स्थळाची, तीर्थक्षेत्राची यात्रा करून पुर्वजांचे स्मरण करण्याची, ते मंदिरे पुन्हा स्वत:च्या ताब्यात घेण्याची योजना आखण्यात आली. जुन्या कल्पना शक्तींना जागृत करून चुटीया, जगन्नाथपंथी व नवरत्नगढ ही तिन्ही ठिकाणे मुंडा आंदोलनाची प्रधान ठिकाणे केलीत तर डोमबारी प्रदेश हा बिरसा मुंडाच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र राहिले, या डोंगराभोवती शैलरकाब, केराओरा, बिचा, बुरू, तिरिलकुटी बुरू असे अनेक उंच उंच डोंगर आहेत. फक्त एकाच बाजने डोमबारीवर जाण्याची वाट आहे तेथे घनदाट व दुर्गम्य अरण्य आहे. येथे जाण्याची जी पायवाट होती. तिचा उपयोग करणे फक्त आदिवासीच्या आवाक्यात होते, डोमबारी पर्वतमालेत काही कोठारे बनविण्यात आली, त्यामध्ये पुरेसे धान्य, शस्त्रास्त्रे इत्यादीचे भांडार ठेवण्यात आले ही तयारी वर्षेभर चालली.

        फेब्रुवारी १८९८ मध्ये डोमबारी येथे सभा बोलावली. सरदार आंदोलनातील कार्यकर्त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई सुरू करण्याचे ठरविले. ऑक्टोबर नोव्हेंबर १८९९ मध्ये डोमबारी पुन्हा येथे सभा घेतली. बिरसाने दोन झेंडे आणले एक पांढरा, दुसरा लाल, पांढऱ्या रंगाचा झेंडा मंडांचे प्रतिक होते तर लाल रंगाचा झेंडा आदिवासींचे शोषण करणाऱ्यांचे प्रतीक होता. पूर्वेला पांढरा झेंडा गाडला तर लाल झेंडा पश्चिम दिशेला गाडला. इंग्रजांना शस्त्र प्रतीक म्हणून केळीचे एक झाड रोवले त्याला धनुष्यबाणाने मारले नंतर त्याला जाळण्यात आले. दि.२२ डिसेंबर १८९९ मध्ये एका स्मशानभूमीत बैठक झाली. यात साठ गुरूप्रमुख बिरसा अनुयायी होते. अशाप्रकारे ठिकठिकाणी सोळा सभा घेऊन एकता संघटित केली. सुरुवातीस बिरसा मुंडानी हिंसेचा मार्ग अस्वीकार केला. नंतर मात्र हिंसेच्या मार्गाचा स्वीकार केला, २५ डिसेंबर १८९९ पासून बिरसा मुंडानी आंदोलन सुरू केले. या मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेत उल गुलान म्हणतात. यात ठेकेदार, जमीनदार, पादरी आणि महाजन, ब्राह्मण बनिया या सर्वांची हत्या करून या हत्येपासून त्यांचे उल गुलान आंदोलन सुरू झाले. २४ डिसेंबर १८९९ च्या रात्री रांचीपासून चाईबासापर्यंतच्या ४०० चौ. मैलाच्या विस्तीर्ण भागात ठिकठिकाणी पोलीस चौक्या, चर्च, इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरावर, क्लबांवर अंधारात धनुष्यबाणाचा जोरदार वर्षाव झाला. सर्व अधिकारी, पोलीस यंत्रणा गोंधळात पडली की, बाण कोठून येत आहेत? कोण सोडतो आहे? काहीच कळत नव्हते. बाहेर निघाले तर कोठून बाण येईल त्याचा नेम नव्हता. २४ डिसेंबरच्या पहिल्या आंदोलनात बिरसाने परिणामकारकता दाखविली होती. रांची शहरात ३/४ दिवस अघोषित संचारबंदीच होती. सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर ठाणे आणि रांची जिल्ह्यातील खुंटी, कर्रा, तोरणा, तमाड आणि बसिया ठाण्यांच्या परिसरात बंडाची ठिणगी पडली. खुंटी च्या घटनेमुळे इंग्रज राज्यकर्ते खडबडून जागे झाले. वेळीच जर याचा बंदोबस्त झाला नाहीतर या जंगलातून नव्हे तर या भागातून आम्हाला हे लोक पळवून लावतील, अशी भीती त्यांना वाटू लागली. चारशे सैनिक रांची शहराच्या रक्षणाकरिता बोलावण्यात आले. त्यामुळे १६ जानेवारी १९०० रोजी १५० बंदूकधारी सैनिक खुंटी येथे आले. या फौजेचे नेतृत्व डेप्युटी कमिशनर अँडरसन करीत होता, एंटकाडीह गावचा बिरसाचा सहकारी गया मुंडाने खुंटी पोलीस चौकीच्या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. म्हणून फौजेने एटकाडीह गावांच्या गया मुंडाच्या झोपडीला वेढा घातला. झोपडीजवळ जाण्याची शिपायांना हिंमत होईना. अखेर जळता पलिता (दिवटी) फेकून झोपडीला आग लागली. जळत्या झोपडीतून बाहेर आलेल्या गया मुंडाला धरण्यासाठी जे शिपाई पुढे घुसले त्यांच्यापैकी एकाला गया मुंडाने तलवारीने जखमी केले. तेव्हा डेप्युटी कमिशनरने गोळी झाडली. तेवढ्यात गया मंडाच्या पत्नीने डेप्युटी कमिशनरच्या डोक्यावर काठी मारली. या गडबडीत गयाने दोन शिपायांना ठार केले. डी.सी. ने पुन्हा गोळी झाडली. त्यातच गया मुंडा शहीद झाला व उलगुलानचा पहिला हुतात्मा ठरला. ९ जानेवारी १९०० रोजी डोमबारीच्या डोंगरामध्ये मुंडा अनुयायांची एकत्र मोठी बैठक असल्याची बातमी इंग्रज सरकारला मिळाली. त्यांच्या फौजेने डोमबारी डोंगरांना वेढा घातला, कमिशनर फॉलर्स, डेप्युटी कमिशनर स्ट्रॅटफिल्ड आणि कॅप्टन रॉश यांनी फौजेचे नेतृत्व केले होते. चार हजार मुंडा तेथे एकत्र आले होते. त्यांच्या जवळच्या शस्त्रांनी इंग्रजाबरोबर झुंज घेण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. इंग्रजांनी मुंडांना शरण येण्यासाठी आवाहन केले. तेंव्हा मुंडा सरदार नरसिंह मुंडा जोराने विचारू लागला, की.. कोणाला शरण यायला सांगत आहात तुम्ही ? जे आक्रमण करतात ते शरण जातात. आम्ही तर येथीलच मुळनिवासी आहोत, तुम्ही बाहेरचे आहात. तुम्ही शस्त्रे खाली ठेवा किंवा लढायचे असेलतर आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्यास तयार आहोत, अशाप्रकारे समस्या वाढत गेली अखेर फौजेने गोळीबार सुरू केला परंतु पहिली फैरी निष्फळ ठरली. मुंडाचा उत्साह वाढला. नंतर पुन्हा गोळीबार झाला. तो तीन तास सतत चालला. यामुळे चार हजार मंडा आदिवासींना वीरगती प्राप्त झाली. त्यात पुरुषांबरोबर स्त्रिया व मुलेही होती. त्यात कोणी सुटले नाही. रक्ताचे पाट वाहू लागले. शैलरकाव पर्वताच्या मातीला आजही रक्ताचा वास येतो असे म्हणतात. डोमबारीचा पर्वत उंच हिरव्यागार वक्षांनी झाकलेला दिसतो मान्न एका वक्षारवाली पाच-पाच मुडाच्या हाडाचे खत आहे.

        डोमबारी संहारानंतरही बिरसामुंडा यांनी मुंडा आदिवासी जनतेला जागृत करण्याचे कार्य थांबविले नाही, इकडे इंग्रज सरकारने बिरसा मुंडाला जिवंत किंवा मृत पकडून देणाऱ्यास किंवा माहिती सांगणाऱ्यास ५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तरीपण दोन महिने बिरसा मुंडा इंग्रजांना हुलकावणी देत राहिला. परंतु मानमारू. व जरीकेल गावाच्या सात लोकांनी बक्षिसाच्या लोभामुळे बिरसा मुंडाचा शोध सुरू केला. ३ फेब्रुवारी १९०० रोजी या सात लोकांना सेतराच्या पश्चिमेला जंगलात धूर दिसला. तो धूर पाहून ही सात माणसे तेथे पोहचली व बिरसामुंडाला पकडून बनगांव डेप्युटी कमिशनरकडे आणले. बिरसा मुंडाच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मुंडा आदिवासी लोकांनी बनगावला वेढा दिला, काही दगा फटका होऊ नये म्हणून पोलिसांनी बिरसा मुंडा यांना रांचीच्या तुरुंगात बंद केले. बिरसा मुडा अनुयायांना सांगत होता की, ममदिशा दाखविण्याची माझी जबाबदारी मी पार पाडली आहे. येथून सहीसलामत बाहेर पडून तुम्हाला त्याप्रमाणे कार्य करायचे आहे. त्यासाठी गरज वाटली तर माझी ओळखसुध्दा दाखवू नका. माझ्या सांगण्याप्रमाणे वागाल तर तुम्हाला तुमचे अधिकार परत मिळतीलच, बिरसा मुंडाची ओळख कुणीच दाखवीत नव्हता. त्यामुळे सरकार समोर संकट उभे राहिले की, बिरसावर खटला कसा भरणार त्यामुळे चार महिने सरकार ठरवू शकले नाही की कोणते आरोप ठेवावे. कलकत्त्याचे बॅरिस्टर जेकब यांनी मुंडा आदिवासींच्या वतीने खटला लढविण्यासाठी रांची येथे प्रयाण केले. साक्षीपुराव्याच्या अभावामुळे सारेजण निर्दोष सुटणार असे सरकारच्या लक्षात आले. बिरसा मुंडा बरोबर एकूण ५८१ लोकांना अटक केलेली होती. बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. सात जून पर्यंत बिरसा ठीक होता. मात्र ९ जून १९०० रोजी बिरसाला रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण एशियाटिक कॉलरा हे शासनाने दिले. परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देऊन जसे ठार मारण्यात आले तीच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दहन करून मृत्यूचा पुरावा नष्ट केला.

        बिरसाच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपूर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले. तसेच बिरसा मुंडा यांच्यामुळे मुंडा आदिवासी शिक्षण, खेळ, विज्ञान, राजकारण अशा अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली.

        बिरसा मुंडाने आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडाने सिध्दत्थ बुध्द कधीच चला नाही पर सिध्दत्थ बुध्दांची शिकवण त्यांच्या तत्त्वज्ञानात प्रखरतेने जाणवत होती. त्यांनी महात्मा फुले, कबीर वाचला नाही तरी सामाजिक, वैज्ञानिकतेचे ते प्रसारक होते. बिरसाचे प्रश्न समोर घेऊन आले ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली. ती भारतीय क्रांतीच आधारभूमी आहे. बिरसा मुंडांनी इ.स.१९०० च्या शेवटी अन्याय, अत्याचार, अंधविश्वासाला प्रतिकार करण्यासाठी एक नवीन कठोर नीती बनवून असामाजिक तत्त्वांना विरोध केला. समाज बदलाचा बिरसा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पूर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता.
    
        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आदिवासींना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाच्या आधारावर नागरिकत्व, मतदान, आरक्षण, शिक्षण, स्वशासन आणि मालकांचे जे अधिकार दिले त्यामध्ये डॉ.बाबासाहेबांना जयपालसिंग या आदिवासी नेत्याने साथ सह्योग दिला होता. जयपालसिंग हे संविधान सभा आणि आदिवासी कमिटीचे सदस्य होते. ते मुंडा जमातीचे असल्यामुळे आदिवासींचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी संविधान सभेमध्ये महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आणि आदिवासीकरिता महत्त्वाच्या बाबी प्रतिपादीत केल्या.

(१) आदिवासी मुलनिवासी आहेत आणि त्यांची संस्कृती लोकशाही पध्दतीची आहे,

(२) मला आदिवासी म्हणण्यात गर्व आहे.

        डॉ.बाबासाहेबांनी आदिवासींना भारतीय संविधानामध्ये आदिवासींची ओळख संस्कृतीच्या आधारावर संवैधानिक अधिकार आणि संरक्षण सुनिश्चित केले. यापूर्वी इतिहासात असे कधीही घडलेले नाही. ही भारतीय इतिहासातील सर्वात मोठी क्रांतिकारी घटना होय.

        आदिवासींनी इंग्रजाविरूध्द विद्रोह केला नाही तर प्रस्तापितांनी व्यवस्थेविरूध्द विद्रोह केला आणि त्याच शृंखलेमध्ये बिरसा मुंडा यांचा १८७५ ते १९०० पर्यंतचा उलगुलान (विद्रोह) होय. बिरसांचा विद्रोह इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे. बिरसाच्या विद्रोहमध्ये विचारधारेचा प्रभाव दिसून येतो. बिरसा मुंडा यांनी आपल्या आंदोलनाचा आधारस्तंभ बनविला आणि आदिवासींना नवसंजीवनी दिली. बिरसा मुंडा यांचा त्याग आणि संघर्षाचा मार्ग दीपस्तंभ ठरला आहे.

logoblog

No comments:

Post a Comment

ads