अहेरी जामीनदारीमधील किष्टापूर परगण्यामध्ये वीर बापूरावांचा जन्म अठराव्या व एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात झाला. वीर बापूरावांच्या वडिलांचे नांव पुल्लीसूर शेडमाके असे होते. गोंडी भाषेत पुल्लीसुर याचा अर्थ सिंहाप्रमाणे शक्तिमान असुर असा होतो. गोंड लोक स्वत:ला असुरांचे वंशज मानत असत हे सर्वश्रुत आहेच. शेडमाके यांचे गोत्र चारदेवे आणि त्यांचे कुलचिन्ह सोडूम म्हणजेच सिंह हेच असल्याने पल्लीसूर हे नाव त्यांना चांगले शोभत असे. बापूरावांचे वडील मोलमपल्लीची जमीनदारी सांभाळत होते. हे मोठे कर्तबगार पुरुष असल्यामुळे गोंडी भाषेत त्यांचे गुणगान करणारे अनेक पोवाडे व गीते प्रसिध्द आहेत.
गोंडवन विभागात इंग्रजी सत्तेचे वर्चस्व वाढू लागल्यावर त्कालीन ठेकेदार, सावकार यांनी इंग्रजांशी संगनमत करून गोंडवनातील शेतकऱ्यांवर जुलूम जबरदस्ती करून त्यांचे शोषण चालू केले. शेतात आलेले आयते पीक हडप करण, मनमानी सारा वसूल करणे, शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जात त्यांच्या जमिनी व मालमत्ता हडप करणे, बेमाप व्याज घेणे इ, मार्गांनी त्यांनी शोषण सुरू केलेले होते. या कामात सरकारी यंत्रणा व पोलीस यांचाही हात असे. त्यामुळे लोक भयानक त्रस्त झालेले होते.
बापूरावांचा लहानपणाचा काळ असा गेला. पुढे ते मोठे झाल्यावर गोरगरीब जनतेच्या शोषणाबद्दल त्यांचा चीड येऊ लागली. क्षणाक्षणात शोषण असहाय्य होऊन सावकारांविरूध्द व नंतर ब्रिटीशांविरूध्द मोठा लढा सुरू केला. इंग्रजांनी २१ ऑक्टोबर १८७८ रोजी चंद्रपूरच्या कारागृहात फाशी देण्यात आली.
No comments:
Post a Comment