उठाव                              वर्ष

१७७८          छोटानागपूरच्या पहाडिया सरदारांनी

                            ब्रिटीश सरकार विरूध्द केलेला उठाव.

१७८४-८५              कोळी लोकांचा उद्रेक (महाराष्ट्र)

१७८९                   छोट्या नागपुरच्या तमरचा उठाव

१७९४-९५             छोट्या नागपुरचा उठाव

१७९५-१८५०         बिहारमधील चौरी चळवळ

१७९८                   पांचेत मालमत्ता विक्री उठाव

१८०१         बिहारमधील तमर उठाव

१८०३         आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी एजन्सीच्या रामप्या भागातील कोवा चळवळ

१८०७-०८      छोटा नागपूर आदिवासी उठाव

१८०९-२८      गुजरातमधील भिल्ल उठाव

१८११-१८१७-१८२० बिहार कृषक आदिवासींचे उठाव

१८१८         कोळी उठाव (महाराष्ट्र)

१८२५         सादिया येथील ब्रिटीश मासिकावर सौगोंचा हल्ला व आग लावणे,

१८२७         शोधकर्ता विल्कॉक्स याची मिश्मीव्दारा हत्या,

१८२८         गोमधर कोंवाराच्या नेतृत्वात आसामी आदिवासींचा ब्रिटीशांविरुध्द पराभव,लेफ्टनंट रुदरफोर्डकडून पराभव.

१८२९         टेरूत सिंग (आसाम) यानं ब्रिटिश जनरल्स् आणि त्यांच्या भारतीय शिपायांची केलेली हत्या

१८३१-३२      द ग्रेट कोल बंड

१८२०-३२-६७   बिहारमधील मुंडा उठाव

१८३२-३३      बिहारमध्ये भगीरथच्या नेतृत्वात पोलतातथला उद्रेक

१८३५         नेफा(आसाम) इथल्या डफलांनी ब्रिटिश नागरीकांवर हल्ला केला आणि ब्रिटिशांनी त्याचा बदला घेतला

१८३५         जैन्तिया हिल्स (आसाम) इथल्या राजाला, ब्रिटीश विरोधी कारवायांबद्दल पदच्युत करून पेन्शन देण्यात आली.

१८३६         वनस्पतीशास्त्रज्ञ ग्रिफीथ याला आसामच्या मिश्मींनी संशयावरून ठार केलं.

१८३८         गुजरातमधील नाईकांचा उठाव

१८३९-४३      खाम्प्टी (आसाम) उठाव

१८३९         खाम्प्टींनी ब्रिटीश एजन्ड अॅडम व्हाईट आणि ८० इतर अधिकारी आणि सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारलं.

१८४२         लुशाई (आसाम) यांनी अराकन, सिल्हेतच्या ब्रिटीश प्रदेशांवर हल्ला करून ब्रिटीश फौजांना हरवलं.

१८४३         सींगफो प्रमुख निरग फिदू यान ब्रिटीश सैन्यावर हल्ला करून अनेक सैनिकांना ठार केलं.

१८४४         लुशाईनी मणिपुरी गावावर हल्ला केला. ब्रिटीशांनी प्रतिहल्ला केला. लुशाई नेता लाल सुक्ला याला अटक करून जन्मठेपेची शिक्षा दिली.

१८४६         कुँवर जीवो वसावो यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये मिल्ल उठाव

१८४९         कदमा सींगफो यानं आसामध्ये फौजावर हल्ला केलात्यात तो पकडला गेला.

१८५०         ओरिसातील कोंध आदिवासी नेता चक्र विशोईचा उठाव.

१८५५         दोन धर्मप्रचारकांच्या हत्येचा बदला घेण्यासी एडन यानं मिश्मी विरूध्द दंडात्मक मोहिम काढली.

१९१२-१४-१९२१ बिहारमध्ये ताना भगतची बंडे

१९२२         अलुरी श्री रामा राजू याच्या नेतृत्वात ब्रिटीशांविरूद्ध कोयाच राम्पा बंड,

१९२५-४७      जादोनांग आणि रानी गैदीनलीऊ यांच्या नेतृत्वात इलीयांयांग चळवळ.

१९४१         आंध्रच्या अदिलाबाद जिल्ह्यात भिमूच्या नेतृत्वात ब्रिटीश सरकार विरूध्द गोंड आणि कोलम उठाव.

१९४२         ओरीसातील लक्ष्मण नाईकचा कोरापुट उठाव.

१९४२-४५      अंदमान बेट समुहांवरील जमातीव्दारा जपानी लष्करांविरूध्द बंड

१९५०         झारखंड चळवळीची सुरूवात.

१९५६-५८      वारली उठाव (महाराष्ट्र)

१९६३-७१      नागा बंड

१९६६-७१      मिझो बंड

१९७२         बोडो चळवळ सुरू (आसाम)

१९७६-८५      त्रिपुरातील आदिवासी चळवळ

१९८४-८६      कोल्हन चळवळ (बिहार)


logoblog