केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दर वर्षी नोव्हेंबर
महिन्यामध्ये जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (हयात प्रमाणपत्र) द्यावे लागते. हयातीचे
प्रमाणपत्र आपापल्या बँकेमार्फत कोषागारामध्ये जमा करण्यात येते. मात्र, त्यामुळे निवृत्त
कर्मचाऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देण्याची सुविधा
सुरू करण्यात येणार आहे.
Jeevan praman Application सुरू करावे. त्यामध्ये मोबाइल क्रमांक आणि आधार
क्रमांक भरावा. त्यावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल.
ओटीपी
नंबर टाकल्यानंतर Operator Authentication Screen उपलब्ध होईल. त्यावर निवृत्त
कर्मचाऱ्यांनी ई-मेल आयडी भरावा. त्यानंतर Scan ins / Scan Finger यावर क्लिक करावे.
त्यानंतर
बायोमेट्रिक यंत्राचा वापर करून नोंदणी करता येणार आहे.
नोंदणी
झाल्यावर Pensioner Authentication Screen उपलब्ध होईल. त्यावर मोबाइल क्रमांक आणि आधार
क्रमांक भरल्यावर ओटीपीवर क्लिक करावे.
मोबाइलवर
ओटीपी मिळाल्यावर निवृत्त कर्मचाऱ्यांनी नाव, पीपीओ क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, निवृत्तीवेतनाचा प्रकार, ई-मेल आयडी आदी
माहिती भरावी. त्यानंतर Screen Finger Button वर क्लिक केल्यावर प्रक्रिया पूर्ण होईल.
प्रक्रिया
पूर्ण झाल्यावर एमएसएस मिळेल. त्यामध्ये पर्मनंट आयडी मिळू शकेल. निवृत्त कर्मचारी
तो पर्मनंट आयडी हा हयातीचा दाखला म्हणून दाखवू शकणार आहे.
No comments:
Post a Comment