जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी
दोन वेळा हमखास पैसे देणारा प्लॅन
वैशिष्ट्ये : हयातीमध्ये स्वतः व हयातीनंतर वारसास रक्कम मिळण्यासाठी 'जिंदगी के साथ भी... जिंदगी के बाद भी...! हा प्लॅन आजीवन व एण्डावमेंट ह्या दोन्ही प्लॅनचे सुरेख मिश्रण आहे. सदर योजनेमध्ये खात्रीशीर परिपक्वतेला विमाधारक जिवीत असल्यास रक्कम दोनवेळा मिळेल. एकदा परिपक्वतेस व दुसऱ्यांदा मृत्यूपश्चात, परिपक्वतेनंतर हप्ते न भरता आजीवन विमा संरक्षण मिळेल. इतर रायडर्सबरोबरच अॅक्सिडेंट बेनिफीट (AB) हा रायडरही उपलब्ध असेल.
परिपक्वता लाभ : परिपक्वतेस विमेदारास मूळ विमा रक्कम + बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (लागू झाल्यास) इतकी रक्कम देय असेल. कोणतेही हप्ते न भरता विमेदारास जिवंत असेपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. ह्या प्लॅनमध्ये सेटलमेंट ऑप्शन देऊ केला आहे. त्यानुसार परिपक्वता रक्कम विमेदार हा महामंडळाला परिपक्वता दिनांकापूर्वी 90 दिवस अगोदर कळवून 10, 15, 20 वर्षे मुदतीतही घेऊ शकतो.
नैसर्गिक मृत्यू : मृत्यू देय विमा रक्कम + बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (लागू झाल्यास) इतकी रक्कम दिली जाईल. मृत्यूदेय रक्कम ही मूळ विमा रकमेच्या 125% किंवा वार्षिक हप्त्याच्या (रायडर्स वगळून) 7 पट या पैकी जी जास्त असेल ती दिली जाईल. मृत्यू लाभ हा एकूण भरलेल्या हप्ता रकमेच्या 105% पेक्षा कमी नसेल. वारसदारास 10, 15, 20 वर्षे मुदतीतही मृत्यूदावा रक्कम हप्त्याहप्त्यात मिळण्याची तरतूद केली आहे.मात्र या लाभासाठी प्रपोजल फॉर्ममध्येच तशी नोंद केली गेली पाहिजे. अर्थात पॉलिसी मुदतीत यात बदलही करता येतो.
अपघाती मृत्यू : नैसर्गिक मृत्यूलाभ मध्ये मिळालेली दावा रक्कम बरोबरच अपघाती विमा रक्कम दिली जाईल. (दुप्पट अपघाती लाभ)
अपगत्व लाभ : पॉलिसी चालु असलेल्या स्थितीत महामंडळाने केलेल्या व्याख्येनुसार विमेदारास कायमचे अपंगत्व आल्यास, पुढील हप्ते माफ केले जातील व मूळ विमा रक्कम 10 समान वार्षिक मुदतीत दरमहा दिली जाईल तर परिपक्वतेस पुर्वोपेक्षित लाभही देय असतील.
नियम व अटी
प्रवेशाचे वय : किमान : 18 वर्षे कमाल : 50 वर्षे
परिपक्वता वय : 75 वर्षे
मुदत : किमान : 15 वर्षे कमाल : 35 वर्षे
विमा रक्कम : किमान: 1 लाख, कमाल : अमर्याद (उत्पन्नानुसार) रु. 5000 च्या पटीत
विमा रक्कमसूट :
रु. 2 लाख ते 5 लाख विमा रकमेस रु. 1.50 दर हजारी
रु. 5 लाख ते 10 लाख विमा रकमेस रु. 2.50 दर हजारी
रु. 10 लाखावरील विमा रकमेस रु. 3.00 दर हजारी
हप्ताप्रकार : वार्षिक / सहामाही / तिमाही/ पगारातून/ NACH
हप्ता प्रकार सूट : वार्षिक हप्ता -2% सहामाही हप्ता - 1%
वैद्यकीय : नॉन मेडिकल/जनरल/व्यावसाईक/स्पेशल
वयाचा दाखला : प्रमाणित / अप्रमाणित
स्त्रियांचा विमा : देता येतो.
प्रपोजल फॉर्म : 300/340
बॅक डेटींग : आर्थिक वर्षात करता येते
कर्ज : पॉलिसीच्या 2 वर्षानी घेता येते
ही पॉलिसी असाईनमेंट, रिव्हायव्हल, सरेंडर, नॉमिनेशनसाठी पात्र आहे.
उदाहरण :-
30 वर्षे वय असलेल्या श्री. अनिरूद्ध यांनी 21 वर्षे मुदतीचा ₹. 10,00,000/- रकमेचा न्यू जीवन आनंद प्लॅन घेतला. त्यांना वार्षिक हप्ता र. 56,130/-(53,713 + 2417 GST) इतका आला. दर त्यांना दुसऱ्या वर्षापासून ₹.54,922/- (53,713 + 1209 GST) असा प्रिमियम द्यावा लागेल.
•परिपक्वता लाभ.
अर्थात 21 वर्षे मुदतीनंतर श्री. अनिरूद्ध यांच्या वयाच्या 51 व्या वर्षी असा मिळेल.
विमा रक्कम : ₹.10,00,000
+ बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस : ₹.10,66,000
(प्रचलित दराप्रमाणे, लागू झाल्यास)
एकूण - ₹.20,66,000
येथे लक्षात घ्या, 21 वर्षाच्या संरक्षण कवचाच्या मुदतीत श्री. अनिरूद्ध यांनी भरलेला एकूण प्रिमियम आहे. ₹.11,54,550 याशिवाय श्री. अनिरूद्ध यांना एकूण 21 वर्षे मुदतीत सध्याच्या आयकर कायद्यानुसार प्रति वर्ष ₹.16,597 इतका कर बचतीचा लाभही झाला आहे. एकूण पॉलिसी मुदतीत त्यांना झालेला कर बचत लाभ ₹.3,48,537. त्यांना आजीवन (मुदतीनंतरही) ₹.10,00,000 चे विमा संरक्षण कवचही आहे.
विपरीत परिस्थितीत : दुर्दैवाने श्री. अनिरूद्ध यांना वयाच्या 40 व्या वर्षी मृत्यू आला.
तर वारसांना मिळणारी रक्कम -
• नैसर्गिक मृत्यू.
125% विमा रक्कम : ₹. 12,50,000
+ बोनस + अंतीम अतिरिक्त बोनस : ₹.4,60,000
एकूण - ₹. 17,10,000
अपघाती मृत्यू
वरील विमा रक्कम : ₹. 17,10,000
+ मूळ विमा रक्कम : ₹. 10,00,000
एकूण - ₹. 27,10,000
उदाहरणे देण्याचा हेतू प्लॅन समजावणे / समजून घेणे हा आहे. रकमांमध्ये फरकही पडू शकतो. काही गृहितकांवर आधारीत.
- Insurance l Gas l Electricity l Loans l Mortgage l Attorney l Lawyer l Donate l Conference Call
Harrah's Atlantic City - MapyRO
ReplyDeleteFind the best Atlantic City hotels 의왕 출장마사지 in Atlantic City with MapyRO's reviews, photos & prices. 안양 출장샵 남원 출장샵 Atlantic City Casino Hotel, Resort & Spa, Atlantic 광주광역 출장안마 City, NJ 창원 출장안마