Tuesday

शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व

  tribalmahavikas.in       Tuesday

प्रखर बुध्दीमत्ता व अलौकीक शौर्य यामुळे शिवरायांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते. शिवरायांचे शरीर बालपणापासून काटक लवचिक सडपातळ बनले होते.

प्रौढ वयातही शरीर सडपातळच होते. राजांचा वर्ण निमगोरा, नाक अणुकुचीदार, उंची साडेपाच फुट तर प्रौढपणी वजन ७२.५७ किलो इतके होते. बोलण्यात वेग व स्पष्टपणा, वेगात चालणे या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच राजांची समोरच्या माणसावर क्षणातच छाप पडत असे.

बुध्दीमत्ता, जिज्ञासूपणा, शौर्य,चातुर्य, युक्तिवाद या गुणांनी युक्त असलेल्या शिवरायांनी, उभ्या आयुष्यात कोणतेही व्यसन केले नाही व आपल्या मावळ्या साथीदारांनाही कोणत्या व्यसनाच्या आधीन होऊ दिले नाही. आपल्या आयुष्याचा एक क्षणही व्यर्थ जाऊ नये अशी महाराजांची नेहमी उत्कट इच्छा असे. जो मनुष्य मेहनती व हुशार असून आपल्या कामात दक्ष असे तो महाराजांस आवडत असे. केवळ कोणी मर्जीतला असला किंवा स्नेहीसंबंधी असला किंवा कोणी त्याची शिफारस केली असली तरी तेवढ्यावरून त्यास एखादा हुद्दा किंवा बढती महाराज

महाराज सभेस बसले म्हणजे तेथे हास्यविनोदादी प्रकार कोणी बिलकूल करू नयेत असा त्यांचा दरारा असे. खुषमस्करे, नकले, खुशामते यांचा महाराजांस पुरा तिटकारा असे. बिभत्स व अश्लिल गोष्टी त्यास कधीही आवडत नसत. त्याचप्रमाणे कोणाही व्यसनी किंवा छंदी मनुष्यास ते आपल्याजवळ कधीही येऊ देत नसत. सर्वदा युध्दप्रसंग, घोडी, शस्त्रे व परराज्यसाधन यांच्या चर्चेत त्यांचा काळ जात असे.

आपल्या नोकरांनी एकमेकांशी सलोख्याने वागावे, कोणी कोणाचा द्वेष मत्सर करू नये अशी त्यांची सक्त ताकीद असे. कोणाही नोकराने दुसऱ्याची नालस्ती देत नसत.सांगण्याचा प्रयत्न केला असता महाराज त्याला ती बाल देत नसत.

शिवाजी महाराजांचे कार्य आणि कतृत्व एवढे प्रभावशाली होते की समकालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, मोगल अशा सर्व लोकांकडील इतिहासकार, कवी, प्रवासी यांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे भरभरून वर्णने केली आहेत. यातील काही निवडक वर्णने पहा.

कोस्मी-द-गार्द याने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्व संदर्भात केलेले वर्णन पहा. एखाद्या पराक्रमी पुरुषाच्या यशाचा झंझावात कसा असतो, The question is still unsolved whether he substituted others for himself or whether he was a magician or devil acted in his place. Such has been said about it in India and there is much divergence of opinion as usual.

(महाराज एकाचवेळी अनेक ठिकाणी स्वाऱ्या करीत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गाद्रने म्हटले आहे की, महाराज आपल्याऐवजी दुसऱ्या कोणास स्वायऱ्यांवर पाठवी की ते जादूगार होते अथवा काही भूतपिशाच्च त्यांच्याऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजून उकललेले नाही. हिंदुस्थानात सर्वत्र याच विषयाची चर्चा असून विभिन्न मतांचा गोंधळ उडालेला आहे.)

शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वासंदर्भात भूषण कवीने म्हटले आहे,

त्यही भूषण असाम रूम बलख बुखारे जे हैं।

चिन सिलहठ तरी जलधि जहाज पै

सब उमरावनकी हट कुरताई देखो, कहै नवरंगजेब साहिसिरताज पै।

भीख माँगी खै हैं बिन मनसब रहैं पै न जैहैं हजरत

महाबली सिवराज पै।

( मोगली सरदार बादशहाला म्हणाले की, म्हणाल तर आसाम सयामच काय पण हिंदुस्थान बाहेर असलेले रूम बलख बुखारापावेतो जाऊ, जहाजात बसून समुद्र उल्लंघन करून चीन, सिल्हटसारख्या देशामध्ये जाऊ, भीक मागून खाऊ, मनसबीशिवाय राहू पण त्या महाप्रतापी शिवराजावर मात्र चाल करून जायला सांगू नका.)

म्हणून आज गल्लीबोळात व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणारे जे क्लासेस निघाले आहेत ती काळाची गरज ओळखूनच. शिवाजी महाराजांसारखा युगपुरूष निर्माण करणाऱ्या त्यांच्या आई आणि एकमेव मार्गदर्शक जिजाऊसाहेब यांच्या व्यक्तीमत्वाबाबत जयराम पिंड्ये या समकालीन कवीने पहा किती यथार्थ शब्दात वर्णन केले आहे.

जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई।

भली शोभली ज्यास जाया जिजाई।।

जिचे कितींचा चंबु जंबुद्विपाला।

करी साउली माउलीशी मुलाला।।

जिजाऊसाहेबांच्या कर्तुत्वशाली व्यक्तीमत्वाचे वर्णन करताना डॉ. बाळकृष्ण यांनी यथार्थ शब्दात म्हटले आहे की, 'She had the head of a man over the shoulders of a woman. She remained a guide, philosopher and friend to Shivaji thourgh out her life. She anxiously watched the rising sun of the glory of her son and was fortu-nate to witness it's climax in the form of his coronation as an independent King and an ornament of the Kshatriya race.'

(जिजाऊ साहेबांचे शरीर स्त्रीचे पण डोके (मुत्सद्दी) पुरूषाचे होते. संपूर्ण आयुष्यभर ही माऊली शिवरायांची मार्गदर्शक, तत्वज्ञ व खऱ्या मित्राप्रमाणे राहिली. अतिशय उत्सुकतेने तिने आपल्या पुत्राच्या भाग्यसूर्याचे चढते वैभव पाहिले. एवढेच नव्हे तर, क्षत्रियकुलावंतास व सिंहासनाधिष्ठित सार्वभौम नृपतीच्या रूपात आपल्या पुत्राच्या भाग्यरवीचा दैदिप्यमान माध्यान्हही या भाग्याशालिनीने (याचि देही याची डोळा पाहिला.)

१६६४- रेव्हरंड एस्कालिअट याने महाराजांचे केलेले वर्णन नाकामा

'His personality is described by them, who have seen him, to be of mean stature (i.e. medium height), lower some what than I am (when) erect and of an excellent proportion. Actual (i.e. active) in exercise and whenever he speaks seems to smile, a quick and pierc-ing eye and witter than any of his people.'

१६६६ परकलदासाने लिहून ठेवलेले महाराजांचे वर्णन, “अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जी। अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो रावजी देसौ जी। हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जु बहुत  मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो। सेवाजी के दाढी छ।” (प्रथमदर्शी पाहणारांना महाराज काहीसे कमी उंचीचे व सडपातळ वाटतात. मात्र त्यांचा चेहरा गोरापान असून चौकशी न करताही ते राजे आहेत हे चटकन ओळखू येते. पाहिल्याबरोबरच हा माणूस हिम्मतवान व मर्दाना असल्याचे लक्षात येते. महाराजांना दाढी आहे.) इ. स. १६६६ साली थेव्हनाने सुरतेहून माहिती गोळा करून लिहीलेल्या वर्णनानुसार, “This Raja is short and tawny, with quick eyes that shew a great deal of wit. He eats but once a day commonly and is in good health.' ( हा राजा ठेंगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे. नेत्रं तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक आहेत. तो मातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे.)

१६७३ साली फ्रेंच अँबे कॅरेने महाराजांचे केलेले वर्णन, “महाराजांची बुध्दीमत्ता एवढ्या श्रेष्ठ प्रतीची आहे की, त्यांच्या बुध्दीला अनाकलनीय असे जगात काहीच नसेल. त्यांची कर्तुत्वशक्ती तर त्यांच्या बुध्दीमत्तेपेक्षाही वरचढ आहे. ते अतुलनीय पराक्रमी योध्दे आहेत, थोर मुत्सद्दी आहेत. वाटेल ती गोष्ट हाती घेण्याला आणि करून दाखविण्याला समर्थ आहेत. महाराजांना दगदगीचे काहीच वाटत नाही. कार्यात विघ्ने आल्यास त्यांना विशेष अवसान चढ़ते आणि कधी कधी तर कित्येक मोहिमा केवळ अवघड म्हणून अंगावर घेऊन त्यांनी पार पाडून दाखविल्या आहेत. स्वराज्य संस्थापनेसाठी त्यांचा जन्म असल्यामुळे सेनापतीच्या अंगी कोणते गुण असावे लागतात, सैनिकाच्या ठिकाणी कोणते गुण असावे लागतात याचा त्यांनी बारकाईने विचार केलेला आहे. चांगल्या चांगल्या तज्ञांची अक्कल गुंग व्हावी एवढा त्यांनी गडाच्या तटबंदीचा अभ्यास केला आहे. भूगोलाचा त्यांचा विशेष व्यासंग आहे. देशातील केवळ लहान-मोठी शहरेच त्यांना माहित आहेत असे नव्हे तर प्रत्येक जागानजागा व झुडुप न झुडुप त्यांना ठाऊक आहे. अशा सर्व मुलुखाचे त्यांनी नकाशे तयार केलेले आहेत.

त्यांच्या चपळतेचा वा दक्षतेचा शत्रूला ठाव लागणे कठीण असते. ते आज इथे असतील तर उद्या उलट दिशेला दुसरीकडे लांब जातील. स्वत:च्या शौर्यावर व सैनिकांवर त्यांचा पूर्ण विश्वास असला तरी, संपुर्ण देशातील प्रत्येक राजाच्या दरबारात महाराजांचे गुप्तहेर आहेत. हेरांसाठी ते प्रचंड धन खर्च करतात,... देशाला वैभवाच्या मार्गावर आणून सोडण्यासाठीच महाराजांचा अवतार आहे".

महाराजांबाबतची ही माहिती अँबे कॅरेला एका मराठा सरदाराने दिली होती. ती त्याने व्यवस्थित नोंद केली म्हणून आपल्याला मिळाली बरं!

१६७४ हेन्री ऑक्झेंडन याने महाराजांचे केलेले वर्णन, राज्याभिषेक प्रसंगी हेन्री ऑक्झेंडने महाराजांना नजराणा दिला होता. त्याचवेळी त्याने नजरेत टिपून ठेवलेले महाराजांचे वर्णन असे - "चेहरा सुंदर व पाणीदार, इतर मराठ्यांच्या मानाने वर्ण गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब, बाकदार व जरासे खाली आलेले, दाढी कापून हनुवटीचे खाली टोकदार केलेली, मिशी बारीक असून, मुद्रेत त्वरा, निश्चय, कठोरपणा व जागरूकता हे गुण स्पष्ट दिसतात.

कॉस्म द गाई या पोर्तुगीज लेखकाने महाराजांचे केलेले वर्णन आहे. इ.स. १६९५ साली तो लिहीतो, ‘With a clear and fair face nature had given him the greatest perfections specially the dark big eyes were so lively that they seemed to dart rays to fire. To these was added a quick, clear and acute intelligence.' HERIGE चेहरा मोहक होता. निसर्गाने त्यांना असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती. विशेषत: त्यांचे काळेभोरे व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिंग बाहेर पडत आहेत.)

महाराज कायम डायरी नोंद करीत असत याचे इतिहासात काही पुरावे आहेत ते खालील प्रमाणे.

इ. स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूर वखार उध्वस्त केली. कारण आपल्या सगळ्यांना माहित असेलच, महाराज पन्हाळ्यामध्ये अडकल्याचे पाहून इंग्रजांनी पन्हाळ्यावर तोफा डागल्या होत्या, वखारीची झालेली नुकसान भरपाई मागण्यासाठी इंग्रजांनी १ ऑक्टोबर १६७३ रोजी जॉन चाईल्ड याच्या घरी महाराजांचा वकील भिमाजी पंडीत याच्याशी बोलणी केली. तिथे जो युक्तीवाद झाला त्याबाबत इंग्रज काय म्हणतात ते पहा,

या सर्वावर आम्ही उत्तर दिले की, जरी त्याच्या धन्याला चार हजार पॅगोड्याहून अधिक काही मिळाले नाही असा युक्तीवाद त्याने केला असला आणि या प्रकरणी प्रेसीडेंट व कौन्सिल यांनी शिवाजीकडे नेमलेला नारायण शेणवी याला जिच्यात(लुटीचा) तपशील नोंदवला होता अशी एक जुनी वही स्वतः शिवाजी राजांनी दाखविली होती म्हणून तो (भिमाजी) नारायण शेणवी याची साक्ष त्याला (महाराजांना) अधिक काही मिळाले नव्हते असे आम्हाला पटवून देण्याकरीता काढीत असला आणि जरी हे (म्हणजे शिवाजी महाराजांना राजापूरच्या वखारीतून चार हजाराहून पॅगोड्याहून अधिक किंमतीची मालमत्ता मिळाली नव्हती हे) खरे आहे असे मान्य केले तरी शिवाजी राजांनी न्यायाच्या दृष्टीने आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई देण्यास हवी कारण त्यांनी राजापूर लुटले नसते तर कंपनीचे हे नुकसान कधीच झाले नसते.

"To all which we answered that although he pleaded his master received no more than about 4000 pagodhas and brings noransimy, who was employed in this affair by the president and council to sevagee, as a witness to persuade us that he received no more, sevagee rajah himselfshowing Noransimay an old book wherei the articulars were mentioned, which although granted to be true, yet Sevagee Rajah ought in justice to make a full satisfaction for had not he robbed rajapure the company had never sustained the lost.”

"तो लोकांमध्ये पायी फिरला. त्याला त्यापैकी (म्हणजे शत्रूपैकी) कोणी ओळखले नाही. आपल्या तलवारीवर रेलून तो घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत असे. जे महत्वाचे मुद्दे तो (एस्हवी) विसरला असता ते तो आपल्या तळहातावर टिपून घेत असे. त्याकरीता तो स्वतः बरोबर नेहमी दौत बाळगीत असे."

-कॉस्म द गार्द्र

logoblog

Thanks for reading शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment