मी संगीता सुनिल म्हात्रे. मु. बोर्वे,
पो. शिर्की, ता.
पेण, जि.
रायगड, महाराष्ट्र. शिक्षण एस.एस.सी. खरं पाहिलं तर आजकाल इंजिनिअर, डॉक्टर,
एम.बी.ए. सारखे उच्च शिक्षण पाहता शिवणकलाचे सर्टीफिकेट म्हणजे कुठेतरी अडगळीत टाकलेले आणि आयुष्यात त्याचा काहीही उपयोग नाही असे कित्येक जणांना वाटतं. पण... कमी शिक्षण म्हणून कधीही न खचता मनाची हिंमत धरून काहीतरी तरी करण्याची जिद्द ठेवली...
खरं पाहता लग्नानंतर कुठलाही पती आपल्या पत्नीला कोणते आणि किती कोर्सेस करण्याची परवानगी देईल. पण मी आजपर्यंत एकूण १०
कोर्सेस ते पण लग्नानंतर पूर्ण केले. ग्रंथपालाचा कोर्स पूर्ण करण्यासाठी रोज १६० कि.मी. प्रवास असे सहा महिने. तरी पण कुठे काम मिळाले नाही. पण न कंटाळता काहीतरी करण्याची जिद्द होतीच.
आणि एक दिवस अशीच एक सरकारी संस्था आली आणि गावामध्ये त्यांनी शिवणकला कोर्स सुरू केला. तेथे मी शिवणकला हा कोर्स पूर्ण केला आणि मी पुढे कामाच्या शोधात असताना मला माहिती मिळाली की कौशल्य सेतूमध्ये एक शिवणक्लास शिकवण्यासाठी
एका शिक्षिकेची आवश्यकता आहे. असे कळाल्यानंतर तेथील प्रियंका मॅडम त्यांनी माझे प्रमाणपत्र त्यांच्या वरिष्ठ भारती मॅडम यांच्याकडे पाठवले. माझ्याकडे असलेल्या कामाच्या अनुभवावरून मला नियुक्त केले.
आज कौशल्य सेतूमुळे माझे कुटुंबास आर्थिक मदत झाली. तसेच ट्रेनिंगसाठी पाठवून मला अजून चांगल्या प्रकारे शिवणकला कशी शिकवता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले. त्याबद्दल मी कौशल्य सेतूचे आभार मानते. आजकाल नोकरी हा विषय आणि फक्त एस.एस.सी.
पास खूप कठीण गोष्टींना सामोरे जावे लागते. परंतु कौशल्य सेतू मुळे मुलींसाठी आणि महिलांसाठी एक आशेचे किरण म्हणून आणि स्वतःचं कौशल्य दाखवण्यासाठी एक योग्य जीवनाचा मार्ग म्हणून आज आणि भविष्यात विचार केला जाईल, असं मला वाटतं. कौशल्य सेतूमध्ये काम करताना मला खूप अभिमान वाटतो.
कौशल्य सेतूमुळे स्वयंरोजगार आणि नोकरी असे दोन्ही मार्ग खुले झालेत. म्हणून कौशल्य सेतूचे मी खूप ऋणी आहे. मनापासून मेहनत करून इतरांना पण माझ्याकडे असणारे कौशल्य शिकवण्यासाठी खूप खूप प्रयत्न करीन.
लख्ख पडला प्रकाश जळत्या मशालीचा हे खरं आहे. ठेच लागल्यानंतर कळलं की चालताना खाली दगड पाहून चालावं,
मी माझ्याच धुंदीत चालत होतो.
असंच काहीसं आपल्या विद्यार्थ्यांबरोबर झालं आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये अचानक वीज समोरून जमिनीवर पडतांना दिसली आणि बघतो तर काय चक्क जमिनीतून पाण्याचे तुषार वर उडताना दिसले. जेथे पाण्याचा अंश सुद्धा दिसत नव्हता तेथे मात्र एक पाण्याचे सरोवर तयार झाले आहे.
अशाच प्रकारची वीज प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून दिसली. ती म्हणजे नैराश्यात असलेल्या दहावी नापास विद्यार्थ्याला स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्याची संधी या व्यवसाय प्रशिक्षणातून मिळाली आहे. मिळालेली संधीचे सोने करण्यासाठी आपला विद्यार्थी
कौशल्य योजनेतून व्यवसाय प्रशिक्षणाचे धडे गिरवायला शिकला. धडे गिरवता गिरवता आपल्याकडे व्यवसाय प्रशिक्षण कौशल्य कशाप्रकारे येईल याकडे लक्ष केंद्रित करू लागला आहे.
विद्यार्थ्याला कळले की या व्यासपीठाने मला माझ्या स्वतःच्या व्यवसायाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन मी पुढे कसा जाऊ शकतो याबाबतचे धडे, मार्गदर्शन आम्हाला आमचे शिक्षक पूर्णतः देत आहेत आणि यामुळेच आमचे पाऊल प्रगतीकडे जाणार आहे.
No comments:
Post a Comment