Sunday

माझा शाळेतील पहिला दिवस

  tribalmahavikas.in       Sunday

        किती रम्य ते दिवस. शाळेचा पहिला दिवस आजही जसाच्या तसा आठवतोय. त्या वेळी शाळा म्हणजे के. जी. वगैरे काही प्रकार नव्हता वर्षाचा होतो. बाबांच्या स्कुटरवर समोर उभा राहून पोस्ट ऑफिस जवळच्या आमच्या शाळेत गेलो. सकाळचे १० वाजले होतो. बाबा मला सरळ हेडमास्तरच्या जवळ घेऊन गेले.

        आकाश गुरुजी वयाचे ४८ वर्ष पार केलेले, डोळ्यावर कमी झालेले पांढरे केस आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. जे की मी पुढचे चार वर्षे पाहणार होतो. किती वेगवेगळ्या तसबीरी भिंतीवर लावलेल्या होत्या. हा त्यातल्या दोन - तीन गृहस्थांना मी ओळखत होतो. पण मला एक फोटो आजही आठवतो. एका वृद्ध माणसाला एक छोटा मुलगा त्यांची काठी धरून ओढत चालला आहे. मला समजतच नव्हतं की हे नक्की काय आहे? बरेच दिवस मी संभ्रमात होतो. मी चौथ्या वर्गात असताना लांडे गुरुजीना हिंमत करून हा प्रश्न विचारला होता. मग मात्र त्यांनी मला आधी हाताचा चमत्कार दाखवला आणि नंतर माझ्या सामान्य ज्ञानात भर पडली. हा तर मी पहिल्या दिवशी जेव्हा हे फोटो बघण्यात दंग होतो त्यावेळीच माझा शाळेत दाखला झाला होता. मी मनात विचार केला ''काय राव मला वाटलं, अंतराळातून काही लोक येतील आणि माझा सत्कार करतील. मग मला काही खायला देतील आणि मग माझा दाखला होईल.

        आता मला या जागेची काय माहित पण भीती वाटायला सुरुवात झाली होती. ज्या मॅडमच्या हवाली माझ्या बाबांनी मला शाळेच्या पहिल्या दिवशी दिल होतं त्या मॅडम मला पुढचे तीन वर्ष आवडल्या नाहीत किंवा त्यांनी शिकवलेली एखादी कविताही आठवणीत राहिली नाही. हा, पण पहिल्या दिवशी मला एक मित्र भेटला. त्याच्याशी मी गप्पा मारल्या आणि तो मला वर्गात घेऊन गेला आणि त्यांनी मला त्याच्याजवळ बसायला जागा दिली. माझा पहिला दिवस घाबरण्यातच गेला आणि मी माझ्या शाळेत दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा माझ्या पोटात दुखायला लागल. आज तसं पाहिलं तर माझा आज शाळेचा पहिला दिवस होता आणि मी दहा वाजता शाळेत पोहोचलो होतो. शाळेच्या पटांगणात मुले खेळत होती. ते बघून मला खूप मजा वाटली.

        आमची दहा वाजता शाळा भरते आणि पाच वाजता सुटली की सर्व मुले बाहेर पळायला लागतात. मीही दरवाजाबाहेर पडतो. बाबांची स्कुटर दिसली की जाऊन बसतो. बाबा विचारतात, कसा गेला दिवस? मी बाबांना सांगतो की छान गेला दिवस. तेवळेच ऐकून बाबांना बरे वाटते.

शाळा सुटली, पाटी फुटली आई मला भूक लागली..

 

logoblog

Thanks for reading माझा शाळेतील पहिला दिवस

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment