Friday

LIC Insurance Policy l न्यू एन्डोमेंट प्लॅन नं.914

  tribalmahavikas.in       Friday

वैशिट्य : ह्या हयातीच्या विमा प्रकाराला आता अपघात विमा लाभ (AB) आणि हप्ता माफी सूट (PWB) चे अतिरिक्त लाभ देऊ केले आहे. तर परिपक्कतेस / मृत्यूलाभ 10, 15, 20 वर्षे मुदतीत हप्त्या-हप्त्याने घेण्याचा विकल्प देऊ केला आहे. हे लाभ एकरकमीही घेता येऊ शकतात. मालमत्ता निर्माण करणारा प्लॅन अशी ओळख असलेल्या या प्लॅनला (AB) आणि (PWB) मुळे अधिक झळाळी प्राप्त झाली आहे.

परिपक्वता लाभ : परिपक्वतेस विमेदाराला मूळ विमा रक्कम + सिंपल रिव्हर्शनरी बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (लागू झाल्यास) दिला जातो. ह्या प्लॅनमध्ये सेटलमेंट ऑप्शन देऊ केला आहे. त्यानुसार परिपकता रकम विमेदार हा महामंडळाला परिपक्वता दिनांकापूर्वी 90 दिवस अगोदर कळवून 10, 15, 20 वर्षे मुदतीतही घेऊ शकतो.

मृत्यू लाभ : विमेदाराच्या मृत्यू पश्चात वारसास मृत्यूलाभ विमा रक्कम + त्या मुदतीपर्यंतचा सिंपल रिव्हर्शनरी बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (लागू झाल्यास) इतकी रक्कम मृत्यूलाभ रक्कम म्हणून दिली जाईल. येथे मृत्यूलाभ रकमेची व्याख्या वार्षिक प्रिमियच्या 7 पट किंवा मूळ विमा रक्कम यापैकी जी जास्त असेल ती अशी केली आहे. वारसदारास 10, 15, 20 वर्षे मुदतीतही मृत्यूदावा रक्कम हप्त्याहप्त्यात मिळण्याची तरतूद केली आहे. मात्र या लाभासाठी प्रपोजल फॉर्ममध्येच तशी नोंद केली गेली पाहिजे. अर्थात पॉलिसी मुदतीत यात बदलही करता येतो.

अपंगत्व लाभ : पॉलिसी चालु असलेल्या स्थितीत महामंडळाने केलेल्या व्याख्येनुसार विमेदारास कायमचे अपंगत्व आल्यास, पुढील हप्ते माफ केले जातील व मूळ विमा रक्कम 10 समान वार्षिक मुदतीत दरमहा दिली जाईल तर परिपक्वतेस पुर्वोपेक्षित लाभही देय असतील.


नियम व अटी

प्रवेशाचे वय : किमान - 8 वर्षे, कमाल - 55 वर्षे

परिपक्वता कालावधी : 75 वर्ष

मुदत : किमान: 12 वर्षे, कमाल : 35 वर्षे

विमा रक्कम : 1लाख

विमा रक्कम सूट : हमा प्रकार :रु.2 लाख ते 5 लाख विमा रकमेस वार्षिक हप्ता - 2% सहामाही हप्ता- 1% दर हजारी. रु.5लाख पेक्षा अधिक विमा रकमेस 3% दर हजारी

हप्ता प्रकार : वार्षिक / सहामाही/तिमाही/ पगारातून (SSS)/ NACH

हमा प्रकार सूट : वार्षिक हफ्ता २% सहमाई १%

वैद्यकीय : नॉन मेडीकल / जनरल / व्याव्सायेक /स्पेशल

वयाचा दाखला : प्रमाणित / अप्रमाणित

स्रियांचा विमा : प्रपोजल फॉर्म : 300/340/360

बँक डेटींग : आर्थिक वर्षात करता येते

कर्ज : पॉलिसीच्या 2 वर्षांनी घेता येते

ही पॉलिसी असाईनमेंट, रिव्हायव्हल, सरेंडर, नॉमिनेशनसाठी पात्र आहे.



उदाहरण :-

30 वर्षे वय असलेल्या श्री. अविनाश यांनी 21 वर्षे मुदतीचा २. 10,00,000/- रकमेचा न्यू एन्डोमेंट प्लॅन घेतला. त्यांना वार्षिक हसार,48,142/- (46069+2073 GST) इतका आला. तर दुसऱ्या वर्षापासून र. 47,106/- (46069 + 1037GST) त्यांना प्रिमियम द्यावा लागेल.

• परिपक्वता लाभ - Insurance 

अर्थात 21 वर्षे मुदतीनंतर श्री. अविनाश यांच्या वयाच्या 51 व्या वर्षी असा मिळेल.

मूळ विमा रक्कम + बोनस रु.10,00,000

+ अंतिम अतिरिक्त बोनस रु. 10,45,000

(प्रचलित दराप्रमाणे, लागू झाल्यास)

₹.48

एकूण-₹.20,45,000

श्री. अविनाश यांनी 21 वर्षात दिलेला एकूण प्रिमियम - ₹.9,90,242 याशिवाय श्री. अविनाश यांना एकूण 21 वर्षे मुदतीत सध्याच्या आयकर कायद्यानुसार प्रति वर्ष ₹. 14,235 इतका कर बचतीचा लाभही झाला आहे.

Loans

विपरीत परिस्थितीत : दुर्दैवाने श्री. अविनाश यांना 41 व्या वर्षी मृत्यू आला. तर वारसांना मिळणारी रक्कम -

• नैसर्गिक मृत्यू

मूळ विमा रक्कम ₹. 10,00,000 +10 वर्षांचा बोनस *. 4,50,000

₹.48

एकूण -₹. 14,50,000



• अपघाती मृत्यू .

दुप्पट विमा रक्कम ₹. 20,00,000 + 10 वर्षांचा बोनस ₹.4,50,000

एकूण - ₹. 24,50,000

उदाहरणे देण्याचा हेतू प्लेन समजावणे / समजून घेणे हा आहे. रकमांमध्ये फरकही पडू शकतो. काही गृहितकावर आधारीत.

  • Insurance l Gas l Electricity l Loans l Mortgage l Attorney l Lawyer l Donate l Conference Call 
logoblog

Thanks for reading LIC Insurance Policy l न्यू एन्डोमेंट प्लॅन नं.914

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment