Wednesday

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना

  tribalmahavikas.in       Wednesday


आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी व सुदृढ बालकांचे जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी, अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना

क्षेत्रासाठी योजना -

टप्पा १: या योजनेंतर्गत शासन निर्णय दि. १८/११/२०१५ अन्वये सदर योजना १ डिसेंबर २०१५ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून बाळंतपणापर्यंत व त्यानंतर ६ महिन्यांपर्यंत एक वेळेचा चौरस आहाराचा प्रति लाभार्थी सरासरी खर्च रु.३५/- असून राज्यातील १६ आदिवासी बहुल जिल्ह्यातील १०५ एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत १४,७६८ अंगणवाड्यांमधून दरमहा १.२७.६९५ महिलांना लाभ देण्यात येत आहे.

टप्पा २ : अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ७ महिने ते ७ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना अंडी/केळी/स्थानिक फळे इत्यादींसह अतिरिक्त आहार पुरविण्यासाठी या योजनेचा टप्पा - २ योजना दि. ५ ऑगस्ट २०१६ पासून सुरु करण्यात आला आहे. यामध्ये ६,४६.६२६ बालकांना लाभ देण्यात येत आहे.



logoblog

Thanks for reading भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment