महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग
अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींसाठी
शासकीय वसतिगृह योजना
अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च
शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरीता
विभागामार्फत विभागीय स्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि
ग्रामीण स्तरावर शासकीय वसतिगृहे
कार्यान्वित आहेत.
शासन निर्णय क्र. आवप्र-१२०४/प्र.क्र.५२/का-१२ दि. ०३.०८.२००४
शासन निर्णय क्र. - आवगृ-२०११/प्र.क्र. १७१/का-१२ दि. १०.०४.२०१३
सदर वसतिगृहामध्ये इ.८ वी पासून पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
देण्यात येतो:
प्रवेशित विद्यार्थ्यांस निवास, आहार, आवश्यक
शैक्षणिक साहित्य इत्यादी सोयी सुविधा मोफत पुरविण्यात
येतात.
योजनेंतर्गत अर्जाकरीता संकेतस्थळ http://swayam.mahaonline.gov.in
सद्यस्थितीत योजनेंतर्गत ४९५ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून सन
२०१९-२० मध्ये सुमारे ५४०००
विद्यार्थी प्रवेशित होते.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वस्तु स्वरूपात मिळणारे लाभ तसेच
आहार भत्ता रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न
बँक खात्यात थेट जमा करण्याबाबत (DBT).
१) स्टेशनरी व निवासी साहित्यासाठी थेट लाभ:
सर्व स्तरावरील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सन
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सतरंजी, चादर,
बेडशीट,
उशी
व उशी कव्हर, ब्लँकेट, वह्या व अभ्यासक्रमांसाठी आवश्यक
इतर शैक्षणिक साहितर, क्रमिक पुस्तके / संदर्भ पुस्तके, छत्री या बाबी
वस्तू स्वरूपात देण्याऐवजी त्याकरीता
विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्नीत बँक खात्यामध्ये रोख रक्कम थेट जमा करण्याबाबत दि. ०६/०५/२०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात
आला आहे.
शासन निर्णय क्र. आवगृ-२०१७/प्र.क्र.१८/का-१२ दि. ०६/०५/२०१७
उपरोक्त वस्तुंकरिता इयत्ता निहाय / अभ्यासक्रम निहाय देण्यात येणारी
रक्कम
इयत्ता |
रक्कम
(रुपयात) |
८ वी ते १० वी |
३,२०० |
११ वी ते १२ वी व पदविका अभ्यासक्रम |
४,000 |
पदवी अभ्यासक्रम (जसे कला/वाणिज्य/विज्ञान/कायदा/कृषी
इ.) |
४,५00 |
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम |
६,000 |
२) निर्वाह भत्ता
शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह
भत्ता-
वसतिगृहाचा प्रकार |
निर्वाह
भत्ता (रुपयात) |
विभागीय स्तर |
८०० |
जिल्हा स्तर |
६०० |
तालुका/ग्रामीण स्तर |
४00 |
३) भोजन भत्ता
महानगरपालिका, विभागीय व जिल्हा स्तरावरील शासकीय
वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना आहाराकरिता
आवश्यक रक्कम आधार क्रमांक संलग्नीत बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याबाबत दि.०५/0४/२०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. योजनेंतर्गत १२० वसतिगृहातील सुमारे २१००० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो.
अ.क्र. |
वसतिगृह
स्तर / दर्जा |
मासिक
रक्कम रुपये |
1 |
अ, ब व क वर्ग महानगरपालिका विभागीय
शहरातील वसतीगृहे |
३,५00 |
2 |
जिल्हास्तरावरील सर्व वसतीगृहे |
३,000 |
Post a Comment
Post a Comment