Wednesday

आपले ग्रामपंचायत कार्यालय कशाप्रकारे चालते पहा संपूर्ण माहिती

  tribalmahavikas.in       Wednesday

 

ग्रामपंचायत संबंधित माहिती :

महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ व त्याअंतर्गत केलेले नियम यानुसार ग्रामपंचायतीने काम करणे बंधनकारक आहे.


ग्रामपंचायतीची कामे:- 

ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता, रस्ते, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीय कल्याण महिला व बालकल्याण विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जन्म-मृत्यू, उपजत, मृत्यू विवाह इत्यादींच्या नोंदी घेणे, शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील ग्रामस्थांच्या निकडीनुसार ग्रामसभा घेणे क्रमप्राप्त आहे.

ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या प्रत सात दिवसात देणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतीकडे सोपवलेली योजनांची अंमलबजावणी करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.

आता ग्रामपंचायतीत संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) केंद्रावरून ग्रामस्थांना नाममात्र रुपये रु.२० विविध अर्जांचे नमुने व त्या मागणीनुसार दाखले देण्याचे प्रायोगिक काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यांसाठी शासनाकडून आकरण्यात येणारी फी जमा करणे आवश्यक आहे तसेच जमा रकमेची पावती घेणे योग्य राहील. ग्रामपंचायतीशी संबंधित काही कामाची माहिती व त्यांच्या कार्यपूर्ती चा कालावधी यांची माहिती खालील नमूद केली आहे


सरपंचांची कर्तव्ये:-

अधिनियमानुसार सरपंच यांनी कार्यकारी शक्ती प्रदान केली असून ते ग्रामपंचायतींचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहतातो. सरपंच पंचायतीच्या सभेचे विनियमन करेल व पद पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केली कृती व कार्यवाहीवर देखरेख व नियंत्रण ठेवेल.

अधिनियमानुसार आवश्यक असलेली सर्व विवरणे व अहवाल तयार ठेवण्याची व्यवस्था करेल. अधिनियमानुसार तसेच शासनाच्या आणि दिशानिर्देश खाली देणे आवश्यक असते तशी प्राप्ती प्रमाणपत्रे आपल्या सहीने व पंचायतींच्या मुद्रेने देतील. प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अन्य कार्य पार पाडेल.गाव पातळीवर विविध विकास कामे अभियान व योजनेत लोकांचा सहभाग घेऊन गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न केले.


ग्राम सेवकाची कामे:-

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो.

१) ग्रामसभेच्या व मासिक सभेचा अनुषंगे ग्रामसभा व मासिक सभेसमोर जमा व खर्च मंजुरीसाठी ठेवणे.

२) विविध स्वरूपाचे ग्रामस्थांना दाखले देणे

.३) ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळी कर वसूल करणे त्यांची नोंद घेऊन कराची रक्कम बँकेत भरणे आगामी वर्षासाठी karachi मागणी तयार करून मागणी देयके पाठवणे.

४) ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक विहित मुदतीत अधिनियमानुसार तयार करून पंचायत समितीकडे सादर करणे. गावातील 

५) पिकावरील विविध रोगाबाबत ग्रामस्थांना जाहीर दवंडीद्वारे माहिती देणे.

६) रोगप्रतिबंधक उपयोजना करणे, पुरेसा TCLसाठा ठेवणे व त्यांचा पाणी शुद्धीकरणासाठी नियमित वापर करणे.

७) साथीच्या आजारांबाबत प्राथमिक माहिती आरोग्याधिकारी व गट विकास अधिकारी यांना देणे.

८) गावातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरूस्ती व यंत्रणा व्यवस्थित ठेवणे.

९) जन्म-मृत्यू उपजत मृत्यू व विवाह यांची नोंदणी करणे व त्या अनुषंगाने निबंधक म्हणून काम पहाणे.


ग्रामपचायत दप्तर नमुने


ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत व सुगम चालावा म्हणून ग्रामपंचायतीच्या दप्तरांची नमुना नंबर 1 ते 27 अशी विभागणी केलेली असते. हे साधारणता पुढीलप्रमाणे असतात. जागरूक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती अधिकारात निरीक्षणासाठी अर्ज करून विविध नमुन्यातील दप्तरांचे निरीक्षण करून सरपंच ग्रामसेवक व्यवस्थित कारभार करतात की नाही याची पडताळणी करू शकतात हे नमुने केवळ पथदर्शक आहेत या ग्रामपंचायतीवर थोडाफार बदल असू शकतो.

नमुना १ अंदाजपत्रक

नमुना 2 पुरवणी अंदाजपत्र

नमुना 3 जमा

नमुना 4 खर्च

नमुना 5 रोकड वही कॅश बुक याला ग्रामपंचायत चा आत्मा ही म्हणतात.

नमुना ६ वर्गीकरण रजिस्टर

नमुना ७ सामान्य पावती

नमुना 8 कर आकारणी रजिस्टर(assessment रजिस्टर)

नमुना 10 कर पावती

नमुना 11 किरकोळ जमा रकमांची रजिस्टरनमुना बारा तेरा चौदा हे रद्द झाले आहेत

नमुना 15 प्रमाणक वाउचर किंवा बिलबुक

नमुना 16 कर्मचारी वेतन मानाचे रजिस्टर सर्विस बुक

नमुना 17 पोस्टाचे तिकीट रजिस्टर

नमुना 18 stock book

नमुना 19 मृतसाठा रजिस्टर (deadstock book)

नमुना 20 अनामत रक्कम परत रजिस्टर

नमुना 21 किरकोळ जमा रकमांचे रजिस्टर

नमुना 22 मजुरांची हजेरी.

नमुना 23 मूल्यांकन पुस्तिका (मेजरमेंट book)

नमुना 24 कर्मचारी वेतन रजिस्टर.

नमुना 25 स्थावर मालमत्ता.

नमुना 26 रस्त्यांची माहिती.

नमुना 27 जमिनीची माहिती.


जन्म नोंदणी रजिस्टर:- 
या नोंदवहीत गावातील जन्मलेल्या प्रत्येक बाळाची नोंद घेतली जाते.


विवाहनोंदणीचे रजिस्टर:- विवाह नोंदणीचे अधिकार आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत त्यामुळे गावपातळीवर ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे विवाह निबंधक म्हणून काम पाहतात ग्रामस्थांच्या अवेदना नुसार वाहन उभे करून दिली जाते.

मृत्यू नोंदणी रजिस्टर:- या नोंदवहीत गावात मृत्यू पावलेले व्यक्तींची नोंद केली जाते.

उपजतमृत्यू नोंद रजिस्टर:- या नोंदवहीत गावात जन्मतःच मृत्यू पावलेल्या बालकांच्या नोंदी घेतल्या जातात.

पशु नोंदवही:- यामध्ये गावातील पशु सखी ची गणना करून नोंदी घेतल्या जातात व गाय बैल म्हैस आधी पशुपालकांना मागणीनुसार पशु नोंदीचे दाखले करून दिले जातात.

ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महिन्यास मासिक मिटीग होणे आवश्यक आहे सरपंच व निवडून गेलेल्या प्रत्येक पंचांनी या मीटिंगसाठी हजर राहणे आवश्यक आहे मासिक मिटींगचे ठराव लेखी माहिती अधिकारात प्रत्येक नागरीकरणात मागता व पाहता येतात.


महत्वाच्या लिंक :-

logoblog

Thanks for reading आपले ग्रामपंचायत कार्यालय कशाप्रकारे चालते पहा संपूर्ण माहिती

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

ads