गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही
गुंठेवरी बंदी कायदा
गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी का आली पार्श्वभूमी.
गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे गुंठेवरी करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे त्यानुसार गुंठेवरी नुसार एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून त्यांची दस्त नोंदणीही होत आहे. मध्यंतरी राज्य सरकारने या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते.
यात असे अनेक प्रकार झाल्याचे निदर्शनास आले होते. यास्तव दुय्यम निबंधक यांना दस्त नोंदणी करतांना वर नमुद केलेल्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे गुंठेवरी पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ कलम ८ब मधील परंतुक मध्ये नमुद केल्याप्रमाणे मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन दस्ता सोबत न जोडता दस्त नोंदणीस स्वीकारता येणार नाही असे आदेश मा. श्रावण हर्डीकर नोंदणी महा निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यानी दिले आहेत.
गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी परिपत्रक
विषय: महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५.
महाराष्ट्र नोंदणी (सुधारणा) नियम, २००५ नुसार महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ चे नियम ४४ मध्ये खंड ‘ई’ दाखल करण्यात आलेला आहे. सदर सुधारणेनुसार या कार्यालयाने ने सविस्तर परिपत्रक निर्गमित केलेले आहे व परिपत्रका सोबत विवरण पत्र जोडून त्यातील अनुक्रमांक ५ मध्ये मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मधील तरतुदी नमुद केलेल्या आहेत.
दिनांक ०१/०१/२०१६ च्या शासन सुधारणेनुसार, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमामध्ये कलम ८ब नव्याने सामाविष्ठ करण्यात आलेले आहे. सर्व दुय्यम निबंधक यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव देण्यात आलेली आहे.
दुय्यम निबंधक हे दस्त नोंदणी करताना, महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ चे नियम ४४ मधील खंड ई प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास गुंठेवरी (Gunthewari Bandhi Kayada) प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ मधील कलम ८ब नुसार.
परंतु कोणतीही व्यक्ती, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ अंमलात आल्याच्या दिनांकापूर्वी अधिसूचित केलेल्या प्रमाण क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या, उपरोक्त विनिर्दिष्ट क्षेत्रांमध्ये स्थित असलेल्या जमिनीच्या कोणत्याही
खंडाचे, असा खंड, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ या अन्वये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये, नियोजन प्राधिकरणाने किंवा यथास्थिती, जिल्हाधिका-याने मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन यामुळे निर्माण झाला असल्याखेरीज, हस्तांतरण करणार नाही,”
या तरतुदीप्रमाणे आवश्यक असलेली परवानगी दस्ता सोबत जोडत नाहीत. ही बाब मा. न्यायालयाच्या PIL मध्ये झालेल्या आदेशान्वये निदर्शनास आलेली होती. सदर PIL च्या अनुषंगाने या कार्यालयाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे
महत्वाच्या लिंक :-
तुकडेबंदी/ गुंठेवरी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदीं खालील प्रमाणे.
१) एखाद्या सर्वे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्वे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल, तर त्यांची दस्त नोंदणी होणार नाही. मात्र त्याच सर्वे नंबरचा ‘ले-आउट करून त्यामध्ये एक, दोन गुंठयांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधीकरणाची मंजूरी घेतली असेल तर अशा मान्य ले-आउट’ मधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.
२) यापुर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी घेतली असेल. अशा तुकड्याच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा उक्त कायद्यातील कल नुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.
३) एखादा वाद निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागा मार्फत हद्दी निश्चित होऊन / मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू राहतील.
No comments:
Post a Comment