-->

11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET


Application For Common Entrance Test For 11th Std Admission Year 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे


11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET 2021

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 26/07/2021 वेळ : दुपारी 03:00 पासून

अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : 02/08/2021

सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक : 21/08/2021


राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा उत्तीर्ण /प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

१)विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास) भरावा.

२) विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.

३) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.

४) उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.

५) उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.


Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter