-->

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना (पारेषण विरहित सौर कृषि पंप)



मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे ST कॅटगरी साठी अर्ज भरले जात आहेत,आपल्या जिल्ह्याचा कोटा असेल तर भरा

योजनेची ठळक वैशिष्टे लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (३ व ५ अश्वशक्ती ) :

शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.

पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.

५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्ती सौर कृषीपंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल. यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.

अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.

वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.

“धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.


लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता:

विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.

खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.२ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.

कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

1) 7/12 उतारा प्रत

2) आधार कार्ड

3) कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)



Related Posts

Post a Comment

Subscribe Our Newsletter
close