आई म्हणजे मायेची ऊब, ममता,जिव्हाळा, जखमांवरचं औषध, मैत्रीण, अंगणातली तुळस, देवीचं रुप, यातना, सहनशीलता,समर्पण,आणि बरेच काही. कुठलंही काम असो वा अडचण आपण आधी आईला हाक मारतो. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरे आहे.
आई या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशीच केली जाते. आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला, तरी काहीतरी राहतंय, अशीच जाणीव करून देणारा आहे. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही. आई मुलांवर संस्कार करते, शिकवते, स्वावलंबनाचे धडे देते; प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला ती तयार असते. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरे आहे.
मदर्स डेचा इतिहास काय?
मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला होता. जेव्हा एना जार्विस नावाच्या मुलीने तिच्या आईचे स्मारक बांधले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण, ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर, तिने आईच्या निधनानंतर तीन वर्षे असेच केले आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली आणि हा दिवस अमेरिकेत मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला.
हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी मोहीमही सुरु केली. मात्र, तिची ही विनंती नाकारली गेली होती. पण, 1941 मध्ये एका प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली आणि हे जाहीर करण्यात आलं की आजपासून मे महिन्याचा प्रत्येक दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जाईल.
आई म्हणजे मायेची ऊब, ममता,जिव्हाळा, जखमांवरचं औषध, मैत्रीण, अंगणातली तुळस, देवीचं रुप, यातना, सहनशीलता,समर्पण,आणि बरेच काही. कुठलंही काम असो वा अडचण आपण आधी आईला हाक मारतो. लागलं तरी तोंडून निघणारा पहिला शब्द आई गं असतो. आपल्या चुकांवर पांघरुन घालणं आणि वेळ प्रसंगी रागवणं हे देखील आईच करते. धाकही दाखवते आणि समजूनही घेते ती आईच असते.
मातृ दिवसाच्या विशेष शुभेच्छा
आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु… आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार...सर्वांना सुखदा पावे… अशी आरोग्यसंपदा आई तुला खूप खूप शुभेच्छा
सुरुवातील म्हटले तसे, आईविषयी कितीही लिहायचे ठरवले, तरी ते कमीच पडणार आहे. आईवर भाष्य करणाऱ्या अनेक कविता, गाणी, कलाकृती, चित्रपट काढण्यात आले आहेत. आईची महती विषद करण्याचा अनेकांनी आपापल्यापरिने प्रयत्न केला आहे. मदर्स डे निमित्ताने आपणही आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करूया.
मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो आहे. तेव्हापासून बहुतांश देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्येही मदर्स डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आईचं ममत्व प्रत्येकाला कळतं परंतु, करोना काळात तर ज्यांना आईचं महत्व नव्हतं अशांनाही आई कळाली असेलच. आई मुळे घरात प्रत्येकाला पूर्ण दिवस कुठे गेला कळाला नसेल तिने खाऊ घातलेले नवनविन पदार्थ आणि न थकता सर्वांसाठी धडपडणं हे आईच करू शकते.
आई ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मुलांवर प्रेम करते आणि त्यांना प्रत्येक सुख-दु:खात साथ देते.
चार्ल्स बेनेटो नावाच्या लेखकाने आईची एक सुंदर व्याख्या केली आहे, “जेव्हा आपण आपल्या आईकडे पाहाता, तेव्हा तुम्ही सर्वात निर्मळ प्रेम पाहात असतो”. आईबद्दल जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. एका मुलासाठी त्याच्या आईपेक्षा उत्तम आणखी काहीच नाही. दरवर्षी, मे महिन्याच्या दुसरा रविवार ही मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मातृदिन 9 मे रोजी साजरा केला जाईल.
हा दिवस कसा साजरा केला जातो
या दिवशी, लोक त्यांच्या आईचा आदर करतात, जिच्यामुळे त्यांना हे जग दिसू शकले. तसेच, त्यांना भेटवस्तू देतात आणि केक कापतात. दिवसभर त्यांच्यासाठी काहीतरी खास करतात. आईसाठी कुठला एक दिवस पुरेसा नाही, तरी मुलं यादिवशी आईला स्पेशल वाटावे म्हणून हा दिवस साजरा करतात, तसेच आईचे आवडते खाद्यपदार्थही तयार करतात.
No comments:
Post a Comment