ऑनलाईन पीएफ कसा काढावा (PF Withdrawal Rules in Marathi) हे बहुतेक लोकांना माहित नसते. त्यामुळे आपण एखाद्या एजन्ट किंवा टॅक्स कंसल्टंट/CA कडे जाऊन त्यांचा सल्ला घेतो, त्याप्रमाणे ते त्यांचे कमिशन पण घेतात. पण PF काढण्याची प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी आहे.तुम्ही स्वतः घरबसल्या मोबईल अथवा लॅपटॉप च्या साहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकता. जाणून घेऊया, PF कसा काढावा.
ऑनलाईन प्रोसेस :
UAN लॉगीन
सर्वात आधी या लिंक वरती क्लिक करून UAN लॉगीन करा https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ईपीएफ. आपला १२ अंकी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
KYC अपडेटेड असणे
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे KYC पूर्ण अपडेटेड असणे. या मध्ये आपले आधार, पॅन, बँक खाते हे सर्व ग्राह्य असले पाहिजे. नसेल तर आपण “Manage” या पर्याय मध्ये जाऊन KYC मध्ये लगेच सर्व माहित भरून अर्ज करू शकता. अर्जानंतर ते मंजूर झाले अथवा नाही हे त्याच page वरती पाहता येईल. तुम्ही काम करत असलेली संस्था आणि PF कार्यालय यांच्या कडून हे मंजूर/ना मंजूर केले जाते.
PF साठी अर्ज कसा करतात
PF साठी अर्ज लेखन करण्याची गरज नाही कारण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. KYC मधील माहितीची पूर्तता केल्यानंतर तुम्ही थेट अर्ज करू शकता. “Online Services” या पर्याय मध्ये Claim या वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला आपले बँक खाते व्हेरिफाय करावे लागेल. बँक खाते क्रमांक जो आपण KYC मध्ये दिला आहे तो टाकून “verify” वर क्लिक करा, स्क्रीन वर आलेल्या yes हा पर्यायावर क्लिक करा
आणि “Proceed for online claim” या बटनावर क्लिक करा.
अर्जाच्या शेवटी भरावयाची माहिती
अगदी शेवटची स्टेप, येथे आपल्याला “PF advance” हा पर्याय निवडायचा आहे. यापुढे पीएफ काढण्याचे कारण निवडा (कोणतेही कारण निवडू शकता). शक्यतो Covid-19 हे कारण सध्याच्या स्थितीमध्ये जास्त योग्य राहील. या नंतर जितकी रक्कम काढणार आहेत ती टाकावी. आपला पत्ता, पासबुक चे पहिले पानं अथवा एक चेक अपलोड करावे.
आधार OTP वरती क्लिक करून आलेला OTP टाकून “Validate OTP and Submit claim form“वर क्लिक करा.
पीएफ कधी जमा होईल
जवळपास दोन ते तीन आठवड्यांमध्ये आपल्या बँक खात्यावर PF जमा झाल्याचा मेसेज येईल. तसेच पासबुक देखील अपडेट केले जाईल. पीएफ जमा होण्यास विलंब लागत असेल तर आपण epfo च्या विभागीय कार्यालयात फोन करू शकता अथवा आपल्या एम्प्लॉयर कडे संपर्क करू शकता.
No comments:
Post a Comment