डॉ. गोविंद गारे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
आदिवासी समाजाचे उत्तुंग व्यक्तीमहत्व विचारवंत डॉ .गोविंद गारे साहेब
जन्म : 4 मार्च 1939 (निमगिरी ता.जुन्नर,जि. पुणे
स्मृतिदिन : 24 एप्रिल2006
प्राथमिक शिक्षण -निमगीरी माध्यमिक -जुन्नर ,बी.ए. फर्ग्यूसन पुणे.
🌿पहिले - महादेव कोळी समाजातील एम्.ए.
🌿पहिले - आदिवासी समाजातील पीएच.डी. ( डॉक्टरेट )
🌿पहिले - ब्रिटीश काँन्सीलच्या फेलोसिपवर युरोपला शिकलेले आदिवासी
🌿पहिले - आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आदिवासी संचालक ( १३ वर्ष )
🌿पहिले - संह्यांद्रितील महादेव कोळी हे पुस्तक लेखक.
🌿पहिले - भारत सरकारने IAS दिलेले आदिवासी अधिकारी.
🌿एकूण पुस्तके -५२
शिक्षण : एम.ए.पि. एचडी (समाजशास्त्र)
* संशोधन पद्धती पदविका मराठी साहित्य प्राज्ञ
* डिप्लोमा इन अर्बन स्टडीज (डिप.यु.एस.)
* लंडन ,लंडन विद्यापीठ 1974 आय.ए.एस.(भारतीय प्रशासन सेवा)1982
ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक जॉ. गोविंद गारे यांचे २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे निधन झाले. त्याच्या स्मृतिदिन यानिमित्त त्याच्या महान कार्याचा घेतलेला हा आढावा...
आदिवासींच्या कल्याणासाठी जीवाचे रान करतानाच त्यांच्या नावावर सवलती लाटणाऱ्या जातींचा पंचनामा करण्याचे काम प्रामुख्याने डॉ. गोविंद गारे यांनी केले. त्यांचा धाक एवढा असे की , आदिवासींचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करतानाच संबंधितांना विचार करावा लागे. आदिवासींचे कल्याण हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते आणि त्यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत होते.
पुण्याजवळील निमगिरी (जुन्नर) या आदिवासी पट्ट्यातील गावात महादेव कोळी या आदिवासी जमातीत त्यांचा जन्म झाला. आदिवासीपण जगल्याने त्याचे चटके काय असतात हे त्यांना पुस्तकातून समजून घ्यावे लागले नाही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी समाजशास्त्र विषयाची पदवी मिळवली. डॉक्टरेट मिळवल्यानंतर सरकारच्या आदिवासी कल्याण विभागात नोकरी पत्करली.
१९६७ ते ८९ असा प्रदीर्घ काळ ते पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक होते. संस्थेत त्यांनी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची निमिर्ती केली. त्यांच्याच काळात सर्वाधिक संशोधन अहवाल तयार झाले. नोकरीत असताना 1982 मध्ये ते आयएएस झाले.
हाडाचा कार्यकर्ता असलेल्या या माणसाला नोकरशहा होणे मात्र कधीच जमले नाही. ते नेहमीच आदिवासींच्या संशोधनासाठी देशभरातील आदिमांच्या पाड्यांवर रमलेले असत. त्यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे , तर देशातील आदिवासी त्यांचा प्रदेश , जीवन , संस्कृती या विषयात ते तज्ज्ञ समजले जात. सुमारे ४५ वर्षे आदिवासींच्या संशोधनात रमलेल्या गारेंनी आदिवासींच्या प्रश्नावर ४५ ग्रंथांचे लेखन केले आहे.
त्यांच्या अनेक ग्रंथांना पारितोषिकेही मिळाली आहेत. अलिकडेच ' आदिवासींच्या नावावर सवलती लुबाडणाऱ्या जातींचा पंचनामा ' हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला होता. ' शिवनेरी भूषण ', ' आदिवासी भूषण ', ' आदिवासी सेवक ' आणि ' वीर बिरसा मुण्डा राष्ट्रीय पुरस्कार ' त्यांच्या नावावर जमा आहेत. महाराष्ट्र आदिवासी दर्शन , महासंघ वार्ता , आदिवासी संशोधन पत्रिका , या नियतकालिकांचे ते अनेक वर्षे संपादक होते.
आदिवासींबाबत सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले , तसेच विविध संघटनांमध्येही ते सक्रिय होते. आदिवासी विकास प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. थोडक्यात काय , तर जेथे आदिवासींचे कल्याण साधले जाईल अशा प्रत्येक कामात डॉ. गोविंद गारे आघाडीवर असत.
कार्य
🌿 आदिवासी समाजासाठी अनुसुचि क्षेत्र बंधन घातले.
🌿 बोगस आदिवासी विरुद्ध मोहिम उघडली.
🌿 आदिवासी समाजावर संशोधन व लेखन केले.
🌿 आदिवासी संस्कृती, कला, साहित्य, रुढी, परंपरा जीवंत ठेवण्याचे व संवर्धनाचे महान कार्य केले
🌿 पदाचा ,अधिकाराचा वापर केवळ आदिवासींच्या भल्यासाठी केला
🌿 शासनाला , आदिवासी मंत्री, लोकप्रतिनिधी यांना योग्य वेळी योग्य सल्ला दिला
प्रेसणास्थान
गोविंद गारे यांचे साहित्य वाचा.
🌿त्यांच्यासारखे लढाऊ व्हा लोकशाही मार्गने लढत रहा.
🌿जवळच्या आदिवाशी ना एकत्र करा.
🌿आपल्या जवळपासच्या बोगसांविरुद्ध मोहिम उघडा.
🌿अभ्यास करा , आदिवासी संस्कृती संवर्धन करा.
🌿शिक्षण, आरोग्य, रोजगार यासाठी एकमेकांना मदत करा.
🌿आदिवासी असल्याचा अभिमान, गर्व बाळगा.
विनम्र अभिवादन
सह्याद्रीच्या कुशीत
निमगिरीच्या मातीत
डॉ. गोविंद गारे साहेब बसलेत
आमच्या आदिवासींच्या छातीत
महान त्यांचं कर्तृत्व
महान त्यांचे विचार
तेच तर होते आपल्या
आदिवासींचे तारणहार
आदिवासींचा शोधून इतिहास
त्यांनी आपल्या समोर ठेवला
त्यांच्याच रूपाने आपल्याला
एक देवमाणूस भेटला
राणावणातून,काट्या कुट्यातून
तुडऊन काढल्या सर्व रानवाटा
गावागावात जाऊन त्यांनी
शोधला इतिहासाचा साठा
गरज आहे आपल्याला आजही
त्यांच्या त्या महान विचारांची
जाणवत राहील उणीव आपल्याला
नेहमीच त्यांच्या महान कर्तृत्वाची
डॉ.गोविंद गारे साहेबांना
💐 विनम्र अभिवादन 💐
No comments:
Post a Comment