आपण १ मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन" म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण "जागतिक कामगार दिन" हा सद्धार मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो त्यासाठीच त्याची पूर्वपीठीका काय आहे ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रत्यत्न करणार आहोत
दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे.
दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.
कामगार दिन कसा सुरूझाला?
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनानी निर्मिती झाली प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असाचे, असा ठराव करण्यात आला परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय
अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-
१ कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलाना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६ कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा
७ समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य कामगारांच्या प्रमुख माग या होत्या
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो या दिवशी जगातील ८० देशांमध्ये सार्बजनिक सुटी जाहीर करण्यात येते कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव करण्यात येतो
अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशांतले कामगार मेंटीनाच्या सोहल्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आतस्सीय ऐक्याचा विस्तार वाढत अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशातले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रातील कामगारोच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले १ मे दिवस आरराष्ट्रीय
ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेचाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिवसात होऊ लागला १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूचा आणि
जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि नातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच कल्या सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि
बघुत्न यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे न यासाठी आपले बल संघटीत करते."
वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशातल्या तुकडया १ गे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला औद्योगिक राष्ट्रातील कामगाराच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करू लागले आणि १ मे दिवस ओरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला साम्राज्यवादी भाडवलदारी
व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिनात होऊ लागला.१ मे दिवस ही सर्न कामगार चळवळीची परंपरा झाली.
भारतातील पहिला कामगार दिन -
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिनशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
No comments:
Post a Comment