मित्रांनो आज आपण आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या रेशन कार्डवर किती धान्य मिळायला हवे आणि ते खरोखर आपल्याया मिळत का हे आपण मोबाइल मध्ये चेक करू शकतो. आपल्याला जे अन्नधान्य गव्हर्मेंट ने जेवढ मंजूर करून ठेवला आहे तेवढ मिळत कि त्याचा पेक्षा कमी मिळत किंवा आपल्याला डाळ, गहू, रॅकेल यांच्यापैकी काही गोष्टी मिळत आहेत आणि काही नाही हे आपण अन्नधान्य पुरवठा यांचा वेबसाइट वर जाऊन कशा प्रकारे चेक करू शकतो याची माहिती बघणार आहे.
अन्नधान्य नागरी विभागाची वेबसाइट आहे mahafood.gov.in हा ऍड्रेस गूगल मध्ये टाकल्यावर ती वेबसाइट ओपन होते. त्यानंतर त्या वेबसाइट वर उजव्या साईड ला online seva हा पर्याय दिसेल. त्यामध्ये ऑनलाईन रास्तभाव दुकाने हा option सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर AePDS सर्व जिल्हे हा ऑपशन दिसेल. यामध्ये आपल्याला किती धान्य मिळते याची माहिती मिळेल.
या ऑपशन वर सिलेक्ट केल्यावर दुसरी वेबसाइट ओपन होते. त्या वेबसाइट वर डाव्या बाजूला RC Details हा ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे एक विंडो ओपन होईल ज्यावर आपल्याला रेशन कार्ड वर असलेला १२ अंकी नंबर टाकायचा आहे. आणि submit करायचा आहे. त्यानंतर तुमचे details लोड होतात. प्रथम कुटुंब प्रमुखाचा नाव असता व नंतर घरातील बाकीचा सदस्यांची नाव असतात. आणि दुसऱ्या विंडो मध्ये त्या कुटुंबाला किती धान्य मिळणार आहे त्याची माहिती असते. सरकारने ३० kg सामान मंजूर केलेला असता त्यापैकी आपल्याला किती मिळाला त्याची माहिती खाली असते. अशा पद्धतीने आपण धान्य आपल्याला बरोबर मिळत आहे कि नाही चेक करू शकतो.
तसेच आज आपण जरा नवीन माहिती जाणून घेणार आहोत. माहिती अधिकाराचा वापर करून आपण वेगवेगळ्या विभागामध्ये कसा अर्ज करू शकतो, तिथे चाललेला कारभार हा सुरळीत चालला आहे कि नाही या विषयाची माहिती आपण घेणार आहोत. रेशनिंग व्यवस्था आज खूप गरिबांचा जवळची मानली जाते. किंवा जे काही गरीब वर्ग आहे हे दुकान खूप महत्वाचा मानला जात.
पण खूप वेळा अशा तक्रारी येतात कि महिन्याचा जे राशन आहे ते ८ च दिवस वाटलं जाणार किंवा आठवड्यातून २ दिवस दिला जाणार इतर दिवशी दिला जाणार नाही, यावेळी स्टॉक खूप कमी आला आहे म्हणून तुम्हाला पण कमी दिला जाईल, अशा तक्रारी नागरिकांकडून येतात. मित्रांनो आपण रेशन दुकान मध्ये जो भ्रष्टाचार होतो, तिथे कोणत्या प्रकारचा कारभार चालतो, तो नीट चालतो कि नाही या विषयीची माहिती आपण माहिती अधिकारांमध्ये अर्ज करून कशी मागू शकतो हे बघू. आपण जी माहिती मागवणार आहोत ती केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार हा अर्ज करनार आहोत.
माहिती अधिकाराच्या अर्जामध्ये ३ प्रकार येतात: अ, ब, क
अ: हा जनमाहिती अधिकारी आहे त्यांना द्यायचा असतो
ब: हा अपीली अधिकारी यांना द्यायचा असतो.
क : हा माहिती आयुक्त असतात त्यांना द्यायचा असतो.
हा अर्ज आपण सध्या कागदावर पण करू शकतो फक्त त्यावर आपल्याला केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार अर्ज (जोडपत्र "अ" नियम ३) हे लिहावा लागत.
प्रति,
जनमाहिती अधिकारी,
शिधावाटप नियंत्रण अधिकारी पुरवठा अधिकारी
तहसील कार्यालय/शिधावाटप कार्यालय
जर तुमचा रेशन दुकान हे महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या हद्दी मध्ये येत असेल तर तुम्ही तिथल्या पुरवठा अधिकान्यांना प्रति
मध्ये ठेऊ शकता व खाली कार्यालयाचा पत्ता टाकू शकता
१) अर्जदाराचे नाव: इथे अर्जदाराचे नाव टाकायचे आहे.
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय: शिधावाटप कार्यालय यांच्याकडून खालील माहिती मिळणेबाबत.
अ) आपल्या कार्यालय अंतर्गत किती स्वस्त धान्य दुकाने आहेत व त्यांचे नाव आणि पत्ते द्यावेत ?
ब) आपल्या कार्यालय अंतर्गत असलेल्या दुकान नंबर स्वस्त धान्य दुकानांमध्ये आलेला माहे ......सन २०११ आलेला अन्नधान्य
व तेल व रॅकेलचा विक्री झालेला कोटा या पुढील महिन्यात समायोजित झालेला कोटा आदि नोंदी असणाऱ्या रजिस्टरची सत्यप्रत द्यावी. विक्री पावती बुकाची सत्यप्रत द्यावी.
क) सन २०१० मध्ये या तक्रार वह्या मधून किती तक्रारी प्राप्त झाल्या? तक्रार आलेल्या स्वस्तधान्य दुकानदारांविरुद्ध काय कारवाई करण्यात आली ? केलेल्या कारवाईचा तपशील तक्रारदारास लेखी कळविला काय? असल्यास संबंधीत पत्रव्यवहाराच्या सत्य प्रती मिळाव्यात.
ङ) सन २०१० आणि २०११ च्या आज तारखेपर्यंत आपल्या अधिकारांतर्गत येणाऱ्या सर्व शिधावाटप दुकानदाराकडील तक्रारवहीत आलेल्या तक्रारीच्या सत्यप्रती घ्याव्यात.
ई) आपल्या कार्यालयांतर्गत असणाऱ्या घाऊक रॅकेल विकेन्यांची संख्या किती? प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागावर दुकानाचे नाव आणि पत्ता, विक्रीदर, स्थानिक दक्षता समिती सदस्याचे नाव व पत्ते, लोकसंख्या व युनिट, वितरणाचे प्रमाण, तसेच तक्रार करावयाच्या अधिकाऱ्याचे नाव पत्ता व फोन नंबर असा विस्तृत व परिपूर्ण माहिती असल्याचा फलक लावला आहेका? असल्यास असे बोर्ड प्रत्येक दुकानात लावले असल्याचे सक्षम अधिका-यांच्या निरीक्षण अहवालाची प्रत द्यावी.
५)माहिती टपालाने हवी की व्यक्तीशः माहिती मी व्यक्तिशः घेऊन जाईन /टपालाने पाठवावी.
६) अर्जदार दारिद्य रेषेखालील आहे/नाही (१० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
अर्जदाराची सही
ठिकाण: .....
दिनांक :
मोबाईल:
No comments:
Post a Comment