आंबेगाव
तालुका
पुणे
: पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर
काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचे बळी गेलेत. शिवाय
सुमारे 150 गावकरी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली
जातेय.
माळणी गावातल्या दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
एनडीआरएफच्या दोन तुकड्या मोठ्या कसोशीनं अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न
करत आहेत. १०० ते १५० अँबूलन्स घटनास्थळी आहेत. तडीनं जिल्हा पोलीस प्रशासनानं
जेसीबी आणि पोकलँडचा ताफा घटनास्थळी तैनात केला असून ढिगारा उपसण्याचं काम जोमानं
सुरू आहे. मात्र प्रचंड पाऊस आणि चिखलामुळं मदतकार्यात अडथळे येतायत. आणखी काही
जेसीबींची आवश्यकता आहे. तीन दिवस बचावकार्य चालणार असल्याची माहिती जिल्हा
प्रशासनानं दिलीय.
एक
होतं माळीण गाव...
आंबेगाव
तालुक्यातल्या माळीण गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. बुधवारी पहाटे तीनच्या
सुमारास गावकरी गाढ झोपेत असतानाच, काळानं गावावर
घाला घातला. डोंगरकडा कोसळून त्याखाली जवळपास 44 घरं जागीच
गाडली गेली... आणि सुमारे 725 वस्तीचं हे गाव होत्याचं
नव्हतं झालं. डिंभे धरणामुळं विस्थापित झालेल्या लोकांचं पुनवर्सन माळीण गावात
करण्यात आलं होतं. प्रामुख्यानं आदिवासी शेतक-यांची घरं गावात होती. पण निसर्गाचा
कोप झाला आणि हे गाव डोंगराखाली गाडलं गेलं. केवळ घरं आणि माणसंच नाहीत, तर जनावरं आणि गावचं मंदिर देखील या आपत्तीमध्ये उद्धवस्त झालं.
बुधवारी, पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. मात्र, डिंभे
धरणापासून सुमारे 40 किमी अंतरावर अत्यंत दुर्गम भागात माळीण
गाव वसलं असल्यानं सकाळपर्यंत एवढ्या मोठ्या दुर्घटनेची साधी माहितीही कुणाला
नव्हती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा पोलीस
घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काळानं कशी क्रूर झडप घातलीय, त्याचा
अंदाज आला. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली. साडे अकराच्या सुमारास पिंपरी
चिंचवडहून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या दोन तुकड्या दुर्घटनास्थळी रवाना
झाल्या. दुपारी साडेबारापर्यंत जवळपास 30 अॅम्बुलन्स,
पोकलँड, जेसीबी घटनास्थळी कसेबसे पोहोचले.
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दुर्गम भागात हे गाव वसलं होतं. मात्र मुसळधार
पाऊस, त्यामुळं झालेला चिखल आणि गावापर्यंत जाण्यासाठी पक्का
रस्ता नसल्यानं मदतकार्यात अडथळे येत होते. आसपासच्या गावातले लोक मदतीसाठी धावून
आले. त्यांच्या सहकार्यानं घोडेगाव पोलीस आणि आपत्ती निवारण टीमच्या जवानांनी
बचावकार्याला सुरूवात केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सध्या
युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
हिरव्यागार
निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीण गाव... कायमचं काळाच्या उदरात गडप झालंय. आता
उरलीय ती फक्त चिखलमाती..
माळीण
दुर्घटना का आणि कशी ?
Maharashtra TimesUpdated: 03
Aug 2014, 02:05:00 AM
आंबेगाव तालुक्यातील
माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देशच हादरला. रात्रीपासून कोसळणारा
पाऊस कधी थांबतोय, याची वाट पाहत बसलेले गाव
एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले.
मयुरेश प्रभुणे
आंबेगाव
तालुक्यातील माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देशच हादरला.
रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय, याची वाट पाहत
बसलेले गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले.
पश्चिम
घाटातील औद्योगिक प्रकल्पांसोबत डोंगरउतारावरील शेतीला (पडकई), जंगलतोडीला या घटनेसाठी जबाबदार धरण्यात येत आहे. या बाबींचा
सह्याद्रीच्या नैसर्गिक स्वरूपावर परिणाम नक्कीच होतो. मात्र, माळीणच्या घटनेसाठी त्यांना सरसकट जबाबदार ठरवणारी ढोबळ विधाने करणे
अशास्त्रीय ठरेल. अशा घाईने केलेल्या कारणमीमांसेमुळे त्यावरील नेमका उपायही
आपल्याला सापडणार नाही.
माळीणची
भूरचना आणि भूगोल
माळीणच्या
घटनेमागील नेमकी कारणे शोधायची असल्यास तेथील नैसर्गिक स्थितीचे नेमके आकलन होणे
आवश्यक आहे. आंबेगावच्या खोऱ्यातील माळीण हे डोंगरपायथ्यावरील एक गाव. सह्याद्री
पर्वतरांगांमध्ये हा भाग येत असला, तरी प्रचंड
पावसामुळे बसाल्ट येथे मूळ रूपात नसून, त्याच्या रूपांतरित
जांभ्या खडकाचे आणि लाल मातीचे प्रमाण जास्त आहे. हा खडक सच्छिद्र असून, पावसाळ्यात त्यात पाणी साठून राहते.
उष्णकटिबंधीय हवामानात तीव्र उन्हाळा आणि मोठा पाऊस यांमुळे या खडकाची वेगाने झीजही होते. त्याला भेगा पडतात, त्याची बारीक खडी तयार होते; तसेच मृदा निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. या प्रक्रियेला हजारो वर्षे लागतात. अशा प्रकारचा खडक आणि मृदा महाराष्ट्रात कोकण, सह्याद्रीच्या माथ्यावर- माथेरान, भीमाशंकर-आंबेगावच्या खोऱ्यातील डोंगर अशा मोठ्या पावसाच्या प्रदेशात आढळते. मोठ्या पावसात या खडकाच्या भेगांत पाणी साठते. पाणी धारण करण्याची क्षमता संपल्यावर खडक डोंगरापासून निसटून खाली येतात. त्याला दरड म्हणतात. दरड कोसळू शकणाऱ्या देशातील प्रमुख क्षेत्रांत सह्याद्रीच्या या भागाचाही समावेश होतो.
घटनेच्या
दिवशीची हवामानाची स्थिती
माळीण
हे घाटाच्या पश्चिम सीमेजवळ असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जोर तुलनेने अधिक
होता. माळीण गावात पर्जन्यमापकाची सोय नाही. त्यामुळे आसपासच्या पर्जन्यमापन
केंद्रांवरून तेथील पावसाचा अंदाज बांधावा लागेल. ३० जुलैला डिंभे धरणाच्या
पर्जन्यमापकात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या ठिकाणी दररोज सकाळी आठला पाऊस
मोजला जातो. ३० तारखेच्या पहाटे आंबेगाव-जुन्नरच्या खोऱ्यात दर तासाला पावसाची
स्थिती कशी होती, हे भारतीय हवामानशास्त्र
विभागाच्या गोळेगाव-जुन्नर येथील स्वयंचलित पर्जन्यमापकावरून स्पष्ट होते. ३०
तारखेच्या पहाटे ३.३० पर्यंत त्या केंद्रावर ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
साडेचारला त्याचे प्रमाण एकाएकी वाढून १०३ मिलीमीटर झाले. त्यानंतर ११२ (साडेपाच),
१३४ (साडेसहा), १४६ (साडेसात) आणि सकाळी
साडेआठपर्यंत १५६ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पाच तासांत ७८ मिलीमीटर पाऊस हा
अतिवृष्टी मानला जातो. माळीणमध्ये पाच तासांत १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला
असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कमी कालावधीत अतिवृष्टी झाल्यामुळे माळीणच्या
डोंगरावरून पाण्याचे लोट वाहू लागले. उतारावरील भूजलाचे प्रमाण एकाएकी वाढले.
मातीची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण झाली. मातीत जमा झालेल्या पाण्याला वाहून
जाण्यास जागा न मिळाल्यामुळे मातीच्या ढिगासह पाण्याचा लोट गुरुत्वाकर्षणाने
डोंगरमाथ्यापासून घसरून खाली आला आणि वाटेत येईल त्या सर्व गोष्टींचा त्याने नाश
केला.
माळीणच्या
घटनेला डोंगर उतारावरील शेती कारणीभूत असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांतर्फे केली
जात आहे. मात्र, शास्त्रज्ञ ती मानायला तयार नाहीत. माळीण
गावापासून ५० मीटर उंचीवर भातशेती केली जात होती, तर त्या
शेतीच्याही वर ९० मीटरवरून डोंगराचा भाग कोसळून खाली आला आहे. उलट पडकईसाठी
करण्यात आलेल्या पायरीसदृश सपाट भागामुळे चिखलाचा लोट गावावर येण्याचा वेग काही
प्रमाणात कमी झाला असे दिसून येत आहे. ज्या वावराच्या निर्मितीला या घटनेस
कारणीभूत धरले जात आहे. त्या वावरालाही चिखलाने व्यापले असून, तेवढा चिखल गावावर न जाता काही घरांचे रक्षण झाले. वृक्षतोड हेही एक कारण
काही जणांकडून दिले जात आहे. मात्र, माळीण, तसेच कोकणात या आधी घडलेल्या घटना पाहता एकदा मातीत क्षमतेपेक्षा जास्त
पाणी जमा झाले की, झाडांसह सगळा भाग वाहून खाली येतो असे
तज्ज्ञांचे मत आहे. माळीणच्या दरडीचा उगम झाडांच्याच भागात आहे हे लक्षात घ्यावे.
तातडीचा
उपाय काय?
मोठा
डोंगर आणि अतिवृष्टी या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे माणसाला शक्य नाही. पण
हवामान खाते किंवा प्रशासन धोक्याची घंटा वाजवेल याची वाट न पाहता. ग्रामस्थांनी
तास-दोन तास मुसळधार पाऊस सुरू राहिला, तर सुरक्षित
ठिकाणी स्थलांतरित व्हावे आणि तज्ज्ञांच्या पाहणीनंतरच पुन्हा घरी परतावे.
जीवासाठी इतके करण्याला सध्या तरी पर्याय नाही.
माळीणच्या
ज्या डोंगरावरून दरड कोसळली, त्याचे पृष्ठ मुख्यत्वे
लाल मातीचे असून, त्या मातीची खोलीही जास्त आहे. वाहून आलेला
चिखल, तसेच दरडीच्या भागाचे जवळून निरीक्षण केल्यास त्यात
खडकांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. मोठ्या पावसात या मातीत पाणी जमा होऊन
भूजलाची पातळी एकाएकी वाढते. कमी कालावधीत मोठा पाऊस झाल्यास तीव्र उतारावरील माती
आणि पाण्याचे हे मिश्रण गुरुत्वाकर्षणाने खाली घसरून येते. पाणी आणि चिकट मृदेचा
निसटून आलेला हा लोट खडकांच्या दरडीपेक्षाही दूरपर्यंत वाहून जाऊ शकतो आणि वाटेत
येईल त्या सगळ्या गोष्टींना व्यापू शकतो. माळीणची घटना ही भू- शास्त्रीय भाषेत 'मड फ्लो' (चिखलाचा प्रवाह) प्रकारची आहे.
- डॉ. रमेश बडवे,
ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ
घटनेच्या
दिवशी पश्चिम किनारपट्टीवर दीड किलोमीटर उंची पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय
होता. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सात किलोमीटर उंचीपर्यंत कमी दाबाचे तीव्र
क्षेत्र अस्तित्वात होते. उत्तरेकडे पूर्व राजस्थानमध्ये वातावरणात चक्रीय स्थिती
निर्माण झाली होती. या सर्वांच्या जोडीला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह तीव्र
होता. या स्थितीमुळे महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांत सर्वदूर मोठा पाऊस झाला.
माळीण हे घाटाच्या पश्चिम सीमेजवळ असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जोर तुलनेने
अधिक होता.
माळीण
तेव्हा आणि आज…
गेल्यावर्षीच्या
३० जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेने अनेकांना
सुन्न करून सोडले होते. साखरझोपेत असलेले संपूर्ण गाव अवघ्या काही क्षणांमध्ये
मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला. त्यामध्ये
काहींचे संपूर्ण कुटुंब गेले, तर काही घरातील कर्ते
पुरूष मृत पावले. आज एक वर्ष उलटूनही याठिकाणच्या लोकांचा जीवनगाडा रूळांवर आलेला
नाही. सध्या गावातील काही लोक निवारा केंद्रावर तर उर्वरित लोक आपल्या
नातेवाईकांकडे विखुरले गेले आहेत. जगण्याची दिशा हरविलेले माळीणचे गावकरी पाहिले
की दुर्घटनेनंतर शासनाने पीडितांच्या पुनर्वसनाच्या केलेल्या घोषणा किती पोकळ
होत्या हे दिसून येते.
माळीण तेव्हा…
माळीण आज…
दिवस
उजाडल्यापासून मावळेपर्यंत पदोपदी माळीणच्या गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे
लागते आहे. सुरूवातीच्या काळात निवारा, कुटुंब आणि
रोजगाराची साधने हरविलेल्या गावकऱ्यांच्या हातात करायला काहीच काम नव्हते.
दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांची माळीण गावापासून जवळच असलेल्या माळीण
फाट्यावर निवारा केंद्रात राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी असलेल्या मर्यादित जागेमुळे गावकऱ्यांच्या पशुपालनावर गदा आली
आहे. दरड कोसळण्यापूर्वी गावातील प्रत्येक घरात गाय, म्हैस,
बैल किंवा शेळ्या यापैकी एखादे जनावर पाळले जात असे. त्यामुळे
पूर्वी शेती वगळता जनावरे चरण्यासाठी घेऊन जाणे किंवा त्यांच्यासाठी चारा गोळा
करणे अशी कामे पूर्णपणे बंद झाली आहेत. सध्या शेतीच्या कामांमुळे गावकऱ्यांना
काहीप्रमाणात रोजगार असला तरी वर्षभरातील उरलेल्या काळात काय करायचे हा प्रश्न
गावकऱ्यांसमोर आ वासूनच उभा आहे.
रोजगारानंतर
घरांबाबत बोलायचे झाल्यास त्याबाबतही शासनाचा कारभार धीम्या गतीने सुरू आहे.
प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार माळीणजवळ असलेल्या आमडे येथील आठ एकर
जागेवर प्रत्येकी किमान ४९१ चौरस फुटांचे घर दिले जाणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही जागानिश्चिती आणि गृहनिर्माण संस्था स्थापनेच्या वादामुळे हा
प्रश्न मार्गी लागलेला नाही. संस्था स्थापन झाल्यावर प्रत्येक घरासाठी दोन लाख
रुपये याप्रमाणे सर्व मंजूर घरांचा निधी संस्थेच्या नावे बँकेत जमा केला जाणार
आहे. मात्र, सध्याच्या महागाईच्या जमान्यात दोन लाख रुपयांत
घर बांधणे शक्य नाही. त्यामुळे संस्थेला दिलेले पैसे संपल्यानंतर आम्ही काय करायचे,
असा प्रश्न काही ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यामुळे ग्रामस्थ या
संस्थेमध्ये सहभागी होण्यास कचरत आहेत. तर काही गावकरी ‘कोठेही
द्या; पण तातडीने घर द्या,’ अशी मागणी
करीत आहेत. याशिवाय, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या
सर्वेक्षणानुसार आमडे गावातील जागाही माळीणप्रमाणे धोकादायक आहे. याठिकाणची जमीन
खूप खोल खोदली तरी माती आणि मुरूमच लागतो. त्यामुळे येथे घरे बांधणे धोकादायक आहे,
असे जीएसआयच्या काही लोकांनी आपल्याला सांगितल्याचे ग्रामस्थांचे
म्हणणे आहे. जर ड्रॉ पद्धतीने घरांचे वाटप झाले, तर शेजारी
एकमेकांपासून दुरावतील आणि लोक वेगवेगळे राहू शकणार नाहीत, अशा
स्वरूपाच्या शंका व भीती माळीण ग्रामस्थ मांडत आहेत.
दरम्यान, ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली तो संपूर्ण परिसर निर्मनुष्य झालेला आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले कौलारू घरांचे माळीण आता भकास झालेले दिसते. जिल्हा
परिषदेची बंद पडलेली शाळा, अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेली
दोन घरे आणि सभोवताल गवत वाढलेला निर्मनुष्य परिसर एवढेच काय, ते माळीणचे अवशेष उरले आहेत.
माळीणच्या ग्रामस्थांना
मोठी घरे देणार
माळीण गावातील
कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७ कोटी
माळीण पुनर्वसनात
भांडीकुंडी आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी विशेष पॅकेज
डोंगरपायथ्याशी
वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करायला हवा – शरद
पवार
डोंगरी भागातील
नागरिकांच्या स्थलांतराची सूचना म्हणजे जमिनी घशात घालण्याचा डाव
धोकादायक ठिकाणच्या
घरांचे स्थलांतराचे फर्मान
माळीण दुर्घटनेमागे
नैसर्गिक कारणेच!
आता समस्या आरोग्य आणि
पुनर्वसनाची!
… इथे काल घरे
होती असे आता वाटतच नाही – राजनाथ सिंह
… आणि माळीणमधील
दुर्घटनेचा उलगडा झाला!
एका
पावसात माळीणची काय अवस्था झाली बघा!
तीन
वर्षांपूर्वी दरडीखाली गाडल्या गेलेलं माळीण गाव नव्याने वसवून, त्याचं लोकार्पण करून राज्य सरकारनं सगळ्यांचीच मनं जिंकली होती. परंतु,
पहिल्याच पावसात माळीणमधील अनेक रस्ते खचल्याचं, घरांच्या भिंतींना तडे गेल्याचं चित्र असल्यानं पुनर्वसनाच्या कामाच्या
दर्जाबद्दल शंका निर्माण झाली आहे.
३०
जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गाव होत्याचं नव्हतं झालं होतं. डोंगरकडा
कोसळल्यानं हे अख्खं गाव मातीखाली गेलं होतं. त्यात १५१ जणांचा मृत्यू झाला होता.
या प्रकोपातून वाचलेली अनेक मंडळी निराधार झाली होती. त्यांना आधाराचा हात
देण्यासाठी प्रशासन, सरकार पुढे सरसावलं होतं आणि
एप्रिल महिन्यात सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या पुनर्वसित माळीण गावाचं
मुख्यमत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. नवी घरं, शाळा, मंदिर, रस्ते असं गावाचं
लोभसवाणं रूप पाहून सगळेच हरखले होते. पण काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने
या गावाची अवस्था बिकट होऊन गेलीय.
माळीणवासीयांनी
काढलेले खालील फोटो पाहून आपल्याला धक्काच बसेल. गावाचं हे रूप पाहून गावकरीही
हादरलेत. काही जण तर गाव सोडण्याचाही विचार करताहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा
शासन-प्रशासनाकडे वळल्या आहेत.
List of all towns and
Villages in Ambegaon Taluka of Pune district, Maharashtra. Complete details of
Population, Religion, Literacy and Sex Ratio in tabular format.
# Town State Population
1 Manchar Census Town Maharashtra 18,876
# Villages Administrative Division Population
1 Adivare Ambegaon 429
2 Aghane Ambegaon 144
3 Ahupe Ambegaon 1,107
4 Amade Ambegaon 242
5 Ambedara Ambegaon 611
6 Ambegaon Ambegaon 65
7 Amondi Ambegaon 2,051
8 Apati Ambegaon 164
9 Asane Ambegaon 1,068
10 Awasari Bk. Ambegaon 6,267
11 Awasari Kh Ambegaon 4,441
12 Bhagadi Ambegaon 640
13 Bharadi Ambegaon 1,841
14 Bhawadi Ambegaon 1,308
15 Bhorwadi Ambegaon 1,052
16 Borghar Ambegaon 2,102
17 Chandoli Bk. Ambegaon 3,859
18 Chandoli Kh. Ambegaon 1,843
19 Chaptewadi kanas Ambegaon 453
20 Chas Ambegaon 2,345
21 Chikhali Ambegaon 776
22 Chinchodi Ambegaon 510
23 Chincholi Ambegaon 1,311
24 Devgaon Ambegaon 832
25 Dhakale Ambegaon 636
26 Dhamani Ambegaon 2,814
27 Dhondmal Shindewadi Ambegaon 1,152
28 Digad Ambegaon 112
29 Dimbhe Bk. Ambegaon 748
30 Dimbhe Kh. Ambegaon 758
31 Don Ambegaon 439
32 Eklahare Ambegaon 2,054
33 Falakewadi Ambegaon 355
34 Gadewadi Ambegaon 687
35 Gangapur Bk. Ambegaon 2,033
36 Gangapur Kh. Ambegaon 1,566
37 Gavdewadi Ambegaon 2,572
38 Gawarwadi Ambegaon 287
39 Ghodegaon Ambegaon 8,591
40 Girawali Ambegaon 2,179
41 Gohe Bk. Ambegaon 3,010
42 Gohe Kh. Ambegaon 1,060
43 Jadhavwadi Ambegaon 1,057
44 Jambhori Ambegaon 1,228
45 Jarkarwadi Ambegaon 3,258
46 Jawale Ambegaon 1,530
47 Kadewadi Ambegaon 670
48 Kalamb Ambegaon 5,861
49 Kalambai Ambegaon 24
50 Kalewadi Darekarwadi Ambegaon 2,007
51 Kanase Ambegaon 1,164
52 Karegaon Ambegaon 1,454
53 Kathapur Bk. Ambegaon 2,075
54 Khadakamala Ambegaon 987
55 Khadaki Ambegaon 3,065
56 Khadakwadi Ambegaon 1,910
57 Koldara Gonawadi Ambegaon 965
58 Kolharwadi Ambegaon 735
59 Koltavade Ambegaon 319
60 Kolwadi Kotamdara Ambegaon 1,749
61 Kondhare Ambegaon 258
62 Kondhaval Ambegaon 836
63 Kurwandi Ambegaon 2,435
64 Kushire Bk. Ambegaon 192
65 Kushire Kh. Ambegaon 340
66 Lakhangaon Ambegaon 2,024
67 Lauki Ambegaon 924
68 Loni Ambegaon 2,599
69 Magholi Ambegaon 148
70 Mahalunge Padawal Ambegaon 3,483
71 Mahalunge Tarf Ambegaon Ambegaon 89
72 Mahalunge Tarf Ghoda Ambegaon 254
73 Malawadi Ambegaon 1,373
74 Malin Ambegaon 704
75 Mapoli Ambegaon 238
76 Mengadewadi Ambegaon 1,764
77 Menubarwadi Ambegaon 230
78 Mondalewadi Ambegaon 831
79 Mordewadi Ambegaon 2,965
80 Nagapur Ambegaon 1,887
81 Nanavade Ambegaon 555
82 Nandur Ambegaon 1,127
83 Nandurkichi Wadi Ambegaon 640
84 Narodi Ambegaon 3,376
85 Nhaved Ambegaon 346
86 Nigdale Ambegaon 790
87 Nighutwadi Ambegaon 4,709
88 Nirgoodsar Ambegaon 4,999
89 Pahaddara Ambegaon 795
90 Panchale Bk. Ambegaon 246
91 Panchale Kh. Ambegaon 151
92 Pargaon Tarf Awasari Bk. Ambegaon 6,487
93 Pargaon Tarf Khed Ambegaon 3,504
94 Patan Ambegaon 212
95 Peth Ambegaon 5,415
96 Phaladewadi Ugalewadi Ambegaon 1,261
97 Phalode Ambegaon 464
98 Phulvade Ambegaon 1,859
99 Pimpalgaon Tarf Ghoda Ambegaon 1,237
100 Pimpalgaon Tarf Mahalunge Ambegaon 4,924
101 Pimpargane Ambegaon 427
102 Pimpari Ambegaon 399
103 Pinglewadi Landewadi Ambegaon 1,036
104 Pokhari Ambegaon 1,480
105 Pokharkarwadi Ambegaon 728
106 Pondewadi Ambegaon 1,498
107 Rajewadi Ambegaon 852
108 Rajpur Ambegaon 642
109 Ramwadi Ambegaon 440
110 Ranjani Ambegaon 3,800
111 Ranmala Ambegaon 1,092
112 Sakeri Ambegaon 274
113 Sakore Ambegaon 1,550
114 Sal Ambegaon 762
115 Savarli Ambegaon 133
116 Shewalwadi Ambegaon 1,572
117 Shewalwadi landewadi Ambegaon 4,083
118 Shindemala Ambegaon 1,296
119 Shingave Ambegaon 4,083
120 Shinoli Ambegaon 3,802
121 Shirdale Ambegaon 292
122 Shriramnagar Ambegaon 380
123 Sultanpur Ambegaon 357
124 Supedhar Ambegaon 687
125 Takewadi Ambegaon 1,024
126 Tale Ghar Ambegaon 1,073
127 Talekar Wadi Ambegaon 522
128 Tamblemala Ambegaon 1,145
129 Tavharewadi Ambegaon 1,032
130 Terungan Ambegaon 427
131 Thakar Wadi Ambegaon 2,235
132 Thakarwadi Ambegaon 675
133 Thorandale Ambegaon 1,813
134 Thugaon Ambegaon 1,119
135 Tirpad Ambegaon 462
136 Vachalmala Ambegaon 974
137 Vachape Ambegaon 141
138 Vadgaon Kashimbeg Ambegaon 2,617
139 Vadgaon Pir Ambegaon 1,381
140 Valati Ambegaon 3,585
141 Varasawane Ambegaon 140
142 Vitthalwadi Ambegaon 797
143 Walunjwadi Ambegaon 1,026
No comments:
Post a Comment