सन २०२१-२०२२ या वर्षाकरिता आर.टी.ई.२५ % ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी दिनांक 03 मार्च 2021 रोजी दुपारी ३ वा. पासून ते 21 मार्च 2021 पर्यंत मुदत आहे.
१)
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन 2021-2022 करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे
त्यांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
२)
लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल.
परंतु पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची
तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.
३)
शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी
जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
४)
शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत.
५)
पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a) प्रवेशासाठी
लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
b) आर.टी.ई.पोर्टलवरील
हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर(Allotment
Letter )ची
प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
ऑनलाईन
अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
1) रहिवासाचा
/ वास्तव्याचा पुरावा - आधार कार्ड/पासपोर्ट/निवडणूक ओळखपत्र/वीज बिल/ टेलिफोन
बिल/घरपट्टी/पाणीबिल/वाहन चालवण्याचा परवाना
2) जातीचे
प्रमाणपत्र ( वडिलांचे) - तहसीलदार/उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी यांचे
3) दिव्यांग/अपंगत्व
प्रमाणपत्र ककुटुंबाचा उत्पन्नाचा दाखल - 1 लाखापेक्षा कमी असलेले उत्पन्न